Posts

Showing posts from February, 2025

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- उन्हाळा कालावधी जवळ येत असतांना काही गावांमधून पाणी टंचाईची माहिती मिळत आहे. तेव्हा तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन टंचाई नियोजनासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर जिल्हा मुख्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके सहभागी झाले होते.             पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी. पाण्याची उपलब्धता, त्याचे स्रोत, मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता इ.बाबत पाहणी करावी. त्यानुसार आठ दिवस आधी प्रस्ताव पाठवावा. याच कालावधीत पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीही करावी. या सोबतच र...

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना; देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया  उद्योग योजनेअंतर्गत सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजूरी महाराष्ट्रात देण्यात आली तर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८९५ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा उच्चांक आहे.             राज्य नोडल अधिकारी कृषी संचालक (कृषी प्रक्रिया व न्नियोजन) कृषी आयुक्तालय विनयकुमार आवटे यांच्या कार्यालयाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात २२०१० प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यातील सर्वाधिक प्रकल्प १८९५ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे.अशाप्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. त्या खालोखाल अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे अशी क्रमवारी आहे. अशी आहे योजना             शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा अथवा गावात, लहान खेड्यात करता येण्यासारख्या व्यवसायांकरीता कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग हा उत्तम पर्याय आहे. त...

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषीत केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात येत्या मार्च महिन्या अखेर ज्या ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात सहकारी संस्था कार्यान्वित नाही तेथे संस्था कार्यान्वित करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ हे अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             जिल्हा सहकार विकास समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, क्षेत्रिय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन शा. ना. साळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी मनिषा हराळ मोरे, जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश महाडीया, सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अजय मोटे, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध के.एम. शहा, सह निबंधक डॉ. ए.बी. काशीकर तसेच अन्य विविध विभागांचे अधिकारी उप...

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवारी (दि.२८)

Image
          छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टॅंड रोड, मालजीपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये   रत्नप्रभा मोटर्स, नवभारत फर्टीलायझर्स लि, एक्सेल प्लेसमेंट, एलीगंट कोटिंग्स प्रा.लि., संजिव ऑटो पार्ट प्रा.लि, सवेरा फार्मासिटीकल प्रा.लि., एन आर बी बेअरींग लि., इंडूरंन्स टेक्नॉलॉजी ली., सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., भुवन व्हील्स प्रा. ली. (सोहम ऑटो), औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.ली., बी जी ली -ईन ईलेक्ट्रीकल लि., फोर्ब्स प्रेसीशन टूल्स ॲड मशिन पार्ट्स, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि.   टि के प्रीसीशियन प्रा.लि. इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांचे प्रतिनिधी ६०३ वेगवेगळ्या रिक्तपदांकरीता मुलाखती घेतील. यासाठी कोणत्याही ...

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- उत्पादन, वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची संख्या, त्यात गुंतलेल्या व्यक्तिंची गणना करण्यासाठी आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४ लाख ४१ हजार ४९० कुटुंबांची गणना या अंतर्गत होणार असून १०० कुटुंबासाठी एक याप्रमाणे प्रगणकांची नेमणूक होणार आहे.             यासंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक (दि.२४) पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी शिवनाथ साबळे, महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी बी.व्ही.सोनवणे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश लढ्ढा, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी लक्ष्मिकांत थोन्टे, शरद दिवेकर आदी उपस्थित होते.             बैठकीत माहिती देण्यात आली की, या गणनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले असून त्याद्वारे ही गणना होणार आहे. जिल्ह्यात ४ लाख ४१ हजार ४९० कुटुंबांची गणना होणार आहे. त्यासाठी प्रति १०० कुटुंबास एक या प्रमाणे ४४१६...

सोमवारी (दि.३ मार्च रोजी) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी    जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. मार्च महिन्यासाठी   सोमवार दि. ३ मार्च २०२५ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन    आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. ३ रोजी दुपारी १२ वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक    व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- शाश्वत सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात खाम नदी पुनरुज्जीवनासह आरोग्य, जलसंधारण व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांना नुकतेच (दि.१८) प्रवीण अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पर्यावरणीय स्थिरता , सुलभ आरोग्यसेवा आणि धोरणात्मक भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांमुळे भविष्य-सज्ज शिक्षण वाढवण्याची बांधिलकी अधोरेखित केली.             स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एसटीएल) चे उपाध्यक्ष अग्रवाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होत असलेल्या उपक्रमांना भेट दिली. यात खाम नदी संवर्धन प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. टोणगाव येथे आरोग्य सेवा उपक्रम , मोबाइल आरोग्य युनिट्स आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय हस्तक्षेपसेवा, टेलिमेडिसिन आणि जलद निदानांचा लाभ देण्यात येत आहे.   त्याचप्रमाणे कुंभेफळ रोबोटेक्स इंडियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या रोबोएज कार्यक्...

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर;दि.३ मार्चला मुंबई येथे पुरस्कार वितरण

छत्रपती संभाजीनगर,दि.२४(जिमाका)- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असे आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. उत्कृष्ट  जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचेही कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीएन बालस्नेही पुरस्कार २०२४ साठी  उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवड झाली आहे.सोमवार दि.३ मार्च रोजी दुपारी एक वा. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आले आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची ह्या पुरस्का...

उपराष्ट्रपती धनखड यांचे घृष्णेश्वराचे सपत्निक दर्शन; कैलास लेणीचीही केली पाहणी

Image
छत्रपती संभाजीनगर दि.२२ (जिमाका)- भारताचे  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यांच्या समवेत उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड  होते. या वेळी मंदिर प्रशासनाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपराष्ट्रपती धनखड यांनी विश्ववारसा स्थळ असलेल्या वेरुळ येथील लेणी क्र. १६ कैलास लेणेची   पाहणी केली. त्यांनी येथील वारसास्थळ आणि लेणींविषयी माहिती जाणून घेतली. या परिसरातील कलाकृती ह्या अदभूत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ०००००

संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२२ (जिमाका)- स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे जाणीव करून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल,असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरस्वती भुवन  या शिक्षण संस्थेत आज केले.             ‘जागर संविधान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सचिव श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते.             उपराष्ट्रपती म्हणाले, क्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक देशाच्या स्वातंत्र्यात झाले. विविध क्षेत्रातील धुरीणांनी भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य ...

साहित्यसंमेलन विशेष लेख: मराठी भाषा आणि पैठण नगरी

Image
             मराठी संस्कृती आणि मऱ्हाटी भाषा यांचे नाते पैठणनगरीशी अतिप्राचीन काळापासून आहे. अगदी इसवी सन पूर्व ६ व्या शतका पासून ते थेट १९ व्या शतकापर्यंत या पुरातन नगरीचे योगदान महाराष्ट्र, देश व अंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणारे आहे. स्थानिक मराठी साहित्य व ऐतिहासिक घडामोडी यांच्या नोंदी तत्कालीन पाश्चात्य प्रवाश्यांनी लिखाणात नमूद केलेल्या आहेत. यात टॉलेमी, प्लिनी व एरीयन या विदेशी लेखकांचा समावेश आहे. भारतातील मुख्य व्यापारी पेठ, वास्तुशास्त्र, कला, साहित्य, शिक्षण व राजकीयदृष्ट्या वर्षानूवर्षे केंद्रस्थानी राहिलेल्या व मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या पैठणनगरीला भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक व सत्तासंघर्षाची मोठी पार्श्वभूमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैठणच्या सातवाहन या मराठी राजघराण्याने इ.स. पुर्व २३० ते इ.स. २३० असे तब्बल ४६० वर्षे दक्षिण हिंदुस्थानवर राज्य केले. त्यांच्या राजधानीचे ठिकाण तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण होते. या घराण्याने एकुण ३० सम्राट दिले. यापैकी पराक्रमी सम्राट शालिवाहन यांनी सुरू केलेली "शालिवाहन शके" हिंदू...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आगमन व स्वागत

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज दुपारी दीड वा.सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड या ही होत्या.             विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, समाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे,   आ. अनुराधाताई चव्हाण     तसेच कुलगुरु डॉ. विजय फुलारी, पालक सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अति. पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी उपस्थित होते.             स्वागतानंतर उपराष्ट्रपती धनखड सपत्निक व राज्यपाल सी.पी. राधाकृष...

साहित्यसंमेलन विशेष लेख : कालसंवादी मराठी लोककला, प्रवाही लोकसंस्कृती!

Image
  प्राचीन काळापासून भारतीय पारंपरिक लोककलांचे विश्व समृद्ध आणि संपन्न आहे. विविधतेतील एकता हे पारंपरिक लोककलांचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. मौखिक परंपरा हे भारतीय लोककला आविष्काराचे वेगळेपण होय. हा वारसा एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द केला आहे. त्यामुळे या लोकाविष्काराचे आकलन करताना त्यातील सूक्ष्म बारकावे लक्षात घेतले असता काही नवे प्रवाह गोचर होतात. पारंपरिक लोककलांचे जनसंवाद हे सामर्थ्य हे अतिशय लक्षणीय स्वरुपाचे आहे. परंतु, ते उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे. पारंपरिक लोककलांचे आणि त्यांच्या आविष्काराचे दृढ नाते हे कलावंतांच्या जीवनाशी निगडीत आहे. देशाच्या, राष्ट्राच्या उन्नतीचेही ते एक प्रमुख साधन आहे. काय आहे लोकसाहित्य..?                               लोक हा बहुवचनी शब्द आहे. लोकांचे आपोआप घडत गेलेले जीवन, त्यांनी निर्माण केलेला परिसर, त्या अनुभवांची गाणी, गोष्टी, म्हणी, उखाणे, चाली-रिती, श्रद्धा-समजुती, देवदेवता, कला, क्...