Posts

Showing posts from June, 2025

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

          छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) – गृहपाल आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह सिल्लोड, ता.सिल्लोड येथील वसतीगृहामध्ये सन २०२५-२६  या   शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अनु.जमातीमधील इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी व पदवी   प्रथम वर्ष व पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यंनी   swayam. mahaonline.gov.in   या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा. वसतीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन व निवास सुविधा मोफत असून, शैक्षणिक साहित्याकरीता डीबीटी रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. अनु.जमातीमधील गरीब होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल एस.एस.सावदेकर यांनी केले आहे. ०००००

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत

          छत्रपती संभाजीनगर, दि. २७(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी इ. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश व इतर लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागसवर्ग, विशेष मागसवर्ग व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व दि.२६ जून ते ४ जुलै पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिर्त मार्फत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज   https://bartievalidity. maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात त्वरीत सादर करावेत. अर्ज प्राप्त...

बेपत्ता महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका) – वेदांतनगर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या महिलेची माहिती कळविण्योच आवाहन वेदांत नगर पोलीसांमार्फत करण्यात आले आहे. राणीबाई सतपाल चंडलिया (वय -६० वर्षे) रा. फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि.२६ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास रिना शाम बागडी (वय ३२ वर्षे) राहते घर फुले नगर गाढे चौक स्वच्छालय जवळ येथून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वेदांत नगर येथे महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.   बेपत्ता महिलेचे वर्णन याप्रमाणे- नाव:- रिना शाम बागडी, वय ३२ वर्षे रा.फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ, रंग-गोरा, उंची-५ फूट, बांधा- पातळ, नाक-सरळ, डोळे-काळे, केस- लांब काळे, भाषा- मराठी, हिंदी, वाल्मीक स्पष्ट बोलते, शिक्षण – ९ वी, अंगात निळ्या रंगाचा टॉप, ग्रे रंगाची लेगिन्स, पायात- सॅन्डल, सोबत सिम - 9370501935         वरील वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास वेदांत नगर पोलीस स्टेशन येथे माहिती कळवावी असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल...

माजी सैनिकांसाठी पदभरती

          छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) - सैनिकी मुलामुलींच्या वसतीगृह,कारगिल स्मृतीवन व सैनिकी विश्रामगृह येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार असून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.              सैनिकी मुला- मुलींचे वसतीगृह येथे सहाय्यक वसतीगृह अधीक्षक – १   पद, सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (महिला उमेदवार-मुलींच्या वसतीगृहासाठी) - १ पद, चौकीदार - २ पद. सफाई कामगार - २ पद, स्वयंपाकी – ५ पद, माळी कामगार-२ पद.              सैनिकी विश्रामगृह येथे चौकीदार- १ पद, सफाई कामगार-१ पद,    कारगिल स्मृतीवन येथे माळी कामगार १ पद. पात्रता-   उमेदवार माजी सैनिक/ सैनिक विधवा असावे. शारिरीकदृष्ट्या सक्षम, सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक. सोबत जोडावयाची कागदपत्रे   -वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पी.पी.ओ. पासबुक, डिस्चार्ज बुक.     ...

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी अद्यावत कौशल्य प्रशिक्षण- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका)- जिल्ह्यात नजिकच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशा अद्यावत कौशल्य प्रशिक्षणासाठी विभाग सज्ज व तत्पर आहे,असे प्रतिपादन कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा बैठकीत केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहसंचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुरुषोत्तम देवतळे, उपायुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग श्रीमती विद्या शितोळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, उपसंचालक देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रदीप दुर्गे आदी या बैठकीस उपस्थित होते. जनसंवाद कार्यक्रमांतर्गत मंगलप्रभात लोढा मंत्री यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील इमारत, अभ्यासक्...

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन : युवकांनो रोजगार संधीचा लाभ घ्या- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका)- पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात आलेल्या उद्योजकांकडे असलेल्या रिक्त जागांवर आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय कांचनवाडी येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर.वराडे, मनोज पांगारकर आदी उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, कौशल्य विकास करण्याच...

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी शासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका)- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम यातील तफावत दूर करुन उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येऊन उद्योगांना कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्यावतीने आज उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाळूंज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात आज हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, मनोज पांगारकर, उद्योजक राम भोगले, मुनिश शर्मा, विनय झोटे, प्रवीण घुगे आदी उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य यातील तफावत दूर करण्याची गरज ...

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा- सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे, न्यायमूर्ती ए.एस. चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्या. नितीन सामरे, न्या. श्रीमती व्ही.व्ही. कंकणवाडी, भारताचे महाअधिवक्ता अनिल सिंग, राज्याचे अभियोक्ता अमरजित सिंग गिरासे, उच्च न्यायालय प्रबंधक एस.एस.अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वाम...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि, २६(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी साडेसात व. समता दिंडीचे आयोजन करण्यात आले.  विभागीय आयुक्त जितेंद्र  पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीची सुरुवात केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते.  भडकलगेट येथून  मिल कॉर्नर मार्गे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर दिंडी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली.समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त   दीपक खराडे, सहायक आयुक्त आर. आर. शिंदे यावेळी उपस्थित होते. दिंडीमध्ये श्री. सरस्वती कन्या प्रशाला, क्रांती चौक येथील बाल ज्ञान मंदिर, शिशुविहार माध्यमिक शाळा, श्री. शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृहाचे असे ६५० विद्यार्थी सहभागी झाले. ०००००

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे छत्रपती संभाजी नगर येथे आगमन व स्वागत

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि. २६(जिमाका)- सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे आज दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले.प्रशासनातर्फे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे,उच्च न्यायालय प्रबंधक एस.एस.अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, शासकीय अभियोक्ता अमरजितसिंग गिरासे तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते. यावेळी त्यांना पोलीस मानवंदना देण्यात आली. ०००००

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो उमाकांत पारधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नायब तहसीलदार केशव डकले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी  माहिती सांगितली. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अज्ञान ,अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारण यासमस्यांच्या निवारणासाठी  राजकीय आणि प्रशासनातून घेतलेला पुढाकार याबाबतचे त्यांचे प्रयत्न याबाबत माहिती दिली. तसेच कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विचार मांडणारे राजर्षी शाहू महाराज हे  लोकराजा आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करुन समाजातील सर्व स्तरातील जनतेला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शासन आणि प्रशासन लोकाभिमुख करण्याचा परिपाठ त्या...

कृषी विभागाची उपाययोजना;खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार ‘ब्लॉग’वर

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका)- शेतकरी बांधवांना खतांच्या उपलब्धतेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्यात आला आहे. तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रावर उपलब्ध खतांची माहिती या ब्लॉगवर उपलब्ध करण्यात आली आहे. आपल्या मोबाईलवरुन शेतकऱ्यांना ही माहिती सहजच पाहता येणार आहे. शेतकऱ्यांना विनामूल्य ही माहिती उपलब्ध होणार असल्याने खतांचा काळाबाजार, लिंकिंग सारख्या अपप्रवृत्तींना आळा बसेल व शेतकऱ्यांना लाभ होईल,असे विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगची लिंक याप्रमाणे- https://adochhatrapatisambhajinagar.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_24.html खतांच्या उपलब्धतेची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ब्लॉगवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कृषी सेवा केंद्र व त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात उपलब्ध खताच्या प्रकारानुसार गोणी संख्या याची आकडेवारी दिसणार आहे. आज दुपारी जिल्हाधिक...

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती; दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

    छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट – ड संवर्गात पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा दि.१ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. प्रवेशाचे ऑनलाईन प्रवेशपत्र ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे, असे नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत करण्यात आले आहे.             नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड शिपाई २८४   पदे भरती करीता दि.२२ एप्रिल रोजी वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध   करण्यात आली होती . भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्या करीता , तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरीता आय.बी.पी.एस. ( इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ) कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार आय.बी.पी.एस कडून दि.२२ एप्रिल ते १६ मे   दरम्यान ऑन लाईन पद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. आय.बी.पी.एस च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.१ ते ८ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व हॉल तिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मे...

बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

    छत्रपती संभाजीनगर, दि. २५(जिमाका) – सिटी चौक पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार सिटी चौक पोलीस स्टेशन जवळ दि.४ जून रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमास (वय अंदाजे ५० वर्षे) घाटी रुग्णालय येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.   सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक सिटी चौक पोलीस स्टेशन एस.एन.आहेरकर यांनी केले आहे. मयताचे वर्णन – अंदाजे वय ५०वर्षे, रंग सावळा, उंची ५ फूट, दाढी काळी-पांढरी वाढलेली, अंगावर काळ्या रंगाची पँट, निळ्या रंगाचा शर्ट, सडपातळ बांधा, उजव्या हातावर विंचू गोंदलेला वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.एन.आहेरकर मोबाईल क्रमांक ८०८०५३३९९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००००

बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

    छत्रपती संभाजीनगर, दि. २५(जिमाका) – सिटी चौक पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार दि.३१ मे रोजी रात्री ११ वा. ५० मि. सुमारास शहाबाजार निशान जवळ एका अज्ञात इसमास श्वास घेण्याचा व इतर आजाराचा त्रास होत असल्याने   त्यास प्रथमोपचारासाठी घाटी रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असतांना दि.९ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस हेडकॉन्सटेबल सिटी चौक पोलीस स्टेशन बी.एन.इप्पर यांनी केले आहे. मयताचे वर्णन - अंदाजे वय ५०वर्षे, शरीरबांधा – सडपातळ, रंग सावळा, पोशाख – घाटी दवाखान्यातील पांढऱ्या   व निळया   रंगाचा गाऊन, केस   काळे – पांढरे, अंगावर डाव्या हाताच्या मनगटावर जूना मार व बोटे सुजलेले, डाव्या पायाच्या टाचेला जुनी जखम, उजव्या हाताच्या पंजावर ओम असे चिन्ह गोंदलेले, उजव्या हाताच्या मनगटावर मराठीमध्ये मिराबाई व हनुमानाचे चित्र गोंदलेले. वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास पोलीस हेडकॉन्सटेबल सिटी चौक पोलीस स्टेशन बी.एन.इप्पर मोबाईल क्रमांक ९९२३१८७००७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ००००० ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्यपरीक्षा रविवारी (दि.२९)

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि. २५(जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,   मुंबई यांचे   मार्फत आयोजीत , महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा-२०२४ रविवार दि. २९ रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४वाजेपर्यंत  अशा दोन सत्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या   जिल्हाकेंद्रावर   एकूण ४   केंद्रांवर ९८४ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षेसाठी एकूण १२८   अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे , असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे. परीक्षा केंद्रांची यादी याप्रमाणे- १.     विवेकानंद कला व सरदार    दिलिपसिंह    वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर   -(२४० उमेदवार) २.     विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर  - (२४०उमेदवार ) ३.     शासकीय तंत्रनिकेतन,महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर-(२८८ उमेदवार ) ४.    शासकीय कला व विज्ञान महाविद्याल...