Posts

Showing posts from October, 2025

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका) - सणासुदीच्या काळात खाद्यतेलात भेसळ करण्याचे प्रकार वाढत असतात. अन्न व औषध प्रशासन विभागाने माहे ऑगस्टपासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४२ हजार २९४ किलो भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. यासोबतच भेसळयुक्त भगर, तिखट (मिरची पावडर), मसाले आदी पदार्थांचे साठेही जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये इतकी आहे,अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली आहे. सणासुदीच्य पार्श्वभुमिवर दि.११ ऑगस्टपासून ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरु केली. ‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा’, या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात खाद्यतेल ४२२९४ किलो किंमत ८४ लाख ४५ हजार ५३७ रुपये, भरग,मिरची पावडर, मसाले इ. अन्न पदार्थ ५१२२ किलो साठा किंमत ६ लाख २३ हजार ४३६ रुपये.   असा एकूण ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ग्राहकांनी घ्यावयाची काळजी तेलाचा डबा घेतांना त्यावर असलेली बेस्ट बिफोर ची तारीख पहावी. डबा सिलबंद आहे की नाही याची खात्री करावी. कोणत्या ब्रॅंडचे तेल आहे हे...

लोकशाही दिन सोमवारी (दि.३)

  छत्रपती संभाजीनगर, दि.३१ (जिमाका)-   दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. नोव्हेंबर महिन्यासाठी लोकशाही दिन हा सोमवार दि.३ रोजी दुपरी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपले अर्ज, निवेदने    सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार वैयक्तिक असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका) -    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ५- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरु झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात पदवीधर मतदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज वाटप व स्वीकृती करण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी ५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ यांनी कळविले आहे. दि.३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधर मतदार हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्र.१८ कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्राप्त केल्यापासून दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी ३ वर्षे पूर्ण होणारा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, नावात बदल असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र व भरलेला फॉर्म नं.१८ वरील सर्व कागदपत्रांसह तहसिल कार...

‘महाज्योती’चा आज (दि.१) कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा

  छत्रपती संभाजीनगर, दि.३१ (जिमाका)-   इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या वतीने  शनिवार दि.१ नोव्हेंबर रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. न्यु तिरुमला मंगल कार्यालय, पुंडलिकनगर रोड, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर माग्स वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र पेटकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार यांनी केले आहे. ०००००

कुंभमेळा २०२७ विकास आराखडा: सुविधांचा विकास आणि पर्यटनातील लौकीक वाढवा- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका) - कुंभमेळा २०२७ च्या निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर , बेरुळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करतांना आपल्या जिल्ह्यात शाश्वत सुविधांचा विकास व्हावा व पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचे देशभरात नाव होऊन लौकीक वाढवावा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.             छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव कुंभमेळा २०२७ विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे,   राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. ...

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रा: देशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका) - स्वातंत्र्य लढा व  स्वातंत्र्यानंतर अखंड भारत निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या दृढनिश्चय आणि समर्पित योगदानाचे स्मरण करीत आपण प्रत्येक जण देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटीबद्ध राहू या, असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.             लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा समारोप शहागंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.             राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फु...

गंगापुर विधानसभाः मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत- मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे

  छत्रपती संभाजीनगर, दि. ३०(जिमाका) -   जिल्ह्यातील १११ गंगापूर विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याचे संकेतस्थळ येथे उपलब्ध आहेत. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह दि.३१ ऑक्टोंबर ते दि.१५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म ७ भरुन द्यावा, अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.             यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व तहसिल कार्यालय गंगापूर येथे १११ गंगापूर विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारींबाबत चौकशी व कारवाई करण्यासाठी दि.१० रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली व भारतीय लोक प्रतिनिधीत्व अधि...

शेतकऱ्यांसाठी ‘कापूस किसान मोबाईल ॲप’

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)-   कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कपास महामंडळ (CCI) तर्फे ‘कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू करण्यात आले आहे. हे ॲप कापूस हंगामात २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार असून, शेतकऱ्यांना नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेसाठी मदत करेल. या ॲपमध्ये नोंदणी, स्लॉट बुकिंग तसेच आवश्यक मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे दिलेल्या आहेत. प्रक्रियेविषयी अधिक माहिती व मार्गदर्शक व्हिडिओसाठी शेतकऱ्यांनी www.youtube.com/@KapasKisan- Official या अधिकृत यूट्यूब लिंकला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्लॉट बुकिंग प्रक्रिया : स्लॉट बुकिंग सुविधा 7 दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहणार असून, प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल आणि नवीन तारीख खुली होईल. उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी राहणार नाही. महाराष्ट्र राज्यातील अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी स्लॉट बुकिंगची वेळ दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित चे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी दिली आहे. ०००००

हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)-   हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी , मुंबई ) जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत सन   २०२५-२६   या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजने अंतर्गत ९ कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट, बीज भांड्वल योजनेअंतर्गत ९  कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट,  थेट कर्ज योजने   ( थेट कर्ज योजना रु.१ लक्ष पर्यंत ) अंतर्गत४4 कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट व एनएसएफडीसी योजने अंतर्गत १४ कर्जप्रकरणांचे उद्दिष्ट आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक समाजातील गरजूंनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत   जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे करावा. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची संगणकीय रेंडमायझेशन प्रणालीद्वारे अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजने अंतर्गत निवड करण्यात येणार आहे. उर्वरित निवड न झालेले अर्ज रद्द करण्यात येईल याची नोंद घ्या...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.३१) आयोजीत पदयात्रेत सहभागी व्हा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) -लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शुक्रवार दि.३१ रोजी एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.             यानिमित्त दि.३१ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाठकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, डॉ, महेश लढ्ढा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी (दि.३१) पदयात्रा भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त   शुक्रवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी पदयात्रा आयोजीत करण्यात आली आहे, ही पदयात्रा सकाळी ७.३० वा. जिल्हाधिका...

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

    छत्रपती संभाजीनगर दि.29 (जिमाका) -   धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव दि.14 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी   https://mdd.maharashtara. gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनुदानासाठी पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे- 1.      शासन मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या किमान 70% आणि अपंग शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किमान ...

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले

    छत्रपती संभाजीनगर दि.29 (जिमाका) –   अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025 - 26 साठी या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.14   नोव्हेंबर पर्यंत आपले   प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल   करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय   व आवश्यक कागदपत्रांची यादी   https://mdd.maharashtra. gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे- १.        या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून नोंदणी करुन ३ वर्ष पूर्ण झालेल्या मदरसांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. २.        ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madarasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.   ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.29 (जिमाका) -   आगामी सणांच्या पार्श्वभुमिवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)   व 37 (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. 14 नोव्हेंबर पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 00000    

खरडलेल्या जमिनी व बुजलेल्या विहीरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरीत पाठवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) -अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडल्या व विहीरी गाळाने बुजल्या व खचल्या. या जमिनींची व विहिरींची दुरुस्ती करता यावी यासाठी शासनाने अर्थसहाय्य देऊ केले आहे. ही कामे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणार असून त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील अर्थसहाय्य प्रस्ताव त्वरीत पाठवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची आज दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. दोन्ही प्रकारच्या नुकसानीत अनुज्ञेय अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) शासन निर्णय अनुक्रमे दि.१० व दि.१३ ऑक्टोंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.             त्यानुसार खरडलेल्या जमिनी लागवड करण्यायोग्य दुरुस्त करुन देण्याचे कामे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतून करावयाची आहेत. त्यासाठी लहान व सीमांत शेतकरी (कमाल मर्यादा २ हेक्टर) यांच्या जम...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना; प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची बॅंकांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्वरीत निपटारा करुन त्याचे निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दिले.             प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बॅंकांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. बैठकीस कृषी उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.             प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना सन २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत   सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात प्रथम आला आहे,असे कृषी उपसंचालक दीपक गवळी यांनी सांगितले.        ...

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विविध अशासकीय पदांवर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे,असे सैनिक सेवापूव प्रशिक्षण संस्थेचे संचालक निवृत्त कर्मल मकरंद देशमुख यांनी कळविले आहे.             या भरतीत भरावयाची पदे सुतार, शिपाई, ग्राऊंडमॅन, मसालची, सफाईगार,   वाहनचालक, डिटीपी ऑपरेटर,   व   सहायक लिपिक या पदासाठी भरती होणारी पदसंख्या प्रत्येकी एक (१) आहे.             सुतार, शिपाई, ग्राऊंडस्मॅन, मसालची, सफाईगार, वाहन चालक यापदांसाठीचे   उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असावे. तसेच माजी सैनिक व इतर नागरिक अर्ज करू शकतात. वाहनचालक पदासाठी कार्यालयीन कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर डीटीपी ऑपरेटर या पदासाठी इयत्ता १२ वी पास उमेदवार व मराठी , इंग्रजी भाषेचे टायपिंग ज्ञान आवश्यक आहे. सहायक लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता   असून संगणक हाताळ...

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ ; भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) -दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्याभरात प्रत्येक कार्यालयात लोकसेवकांचे व नागरिकांचे प्रबोधन करावे, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लोकसेवकांनी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.             दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक   सुरेश नाईकनवरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संगिता राठोड, संगिता सानप तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.             दक्षता जनजागृती सप्ताह सध्या राबविण्यात येत आहे. यानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात ॲन्टीकरप्...

तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी ६ नोव्हेंबरला; सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) -जिल्ह्यातील विविध व्यक्ति- संस्था यांच्याकडून मंत्री महोदयांकडे निवेदने, तक्रारी देत असतात ही सर्व निवेदने, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयांमध्ये एकाच दिवशी विशेष कॅम्प आयोजीत करुन तक्रारींचा निपटारा करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागांना दिले आहेत.             या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संगिता राठोड, संगिता सानप तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.              जिल्ह्यातील प्राप्त तक्रारी, निवेदनांचे निराकरण करण्याबाबत निपटारा तक्रारींचा हा उपक्रम राबविण्याचे जिल्ह...