Posts

Showing posts from September, 2025

जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदतनिधीला

  छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका)-   मराठवाड्यातील अतिवृष्टीनेबाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देण्यास सहमती दर्शविली आहे. जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत कार्यरत १०८० अधिकारी व कर्मचारी मिळून संख्या आहे. या सगळ्यांचे मिळून एक दिवसाचे वेतन १५ लाख ११ हजार ८१३ रुपये इतकी रक्कम आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येईल,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. ०००००

श्वानदंश लस उपलब्धतेबाबत

  छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका)-   श्वानदंश लसीचा पहिला डोस घाटी रुग्णालयामार्फत तात्काळ उपलब्ध करण्यात येईल. त्यानंतरचे डोस हे नजिकच्या आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या उपलब्ध साठ्यातून घ्यावे,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता यांनी श्वानदंश लसीचा योग्य विनियोग होण्यासाठी कळविले आहे. ०००००  

आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक

  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आजी , माजी सैनिक व त्यांच्या   अवलं‍बिताच्या अडी-अडचणी सोडविण्याकरीता दर सहा महिन्यांनी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी,पोलीस अधिकारी , माजी सैनिक , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या गठीत समितीची होणारी बैठक तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावाच्या तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बैठकांचे नियोजन याप्रमाणे- मंगळवार दि.७ ऑक्टोंबर ता.सिल्लोड, वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय , सिल्लोड , शुक्रवार दि.१०ऑक्टोंबर ता. पैठण, वेळ दुपारी   १२ वा. तहसिल कार्यालय , पैठण , मंगळवार दि.१४ऑक्टोंबर ता. सोयगाव   वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय , ता. सोयगाव , गुरुवार दि.३० ऑक्टोंबर ता. गंगापूर वेळ दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय , ता.गंगापूर,             छत्रपती संभाजीनगर व संबंधित तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी बैठकीच्या रोजी वेळेवर दिलेल्या ठिकाणी हजर रहावे असे आवाहन जिल्हा ...

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रकास मुदत वाढ

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) -   इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती   सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी   अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक निश्चित झाले आहे, असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे. या वेळापत्रकास मुदत वाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धती व वेळापत्रकः- इच्छुक अर्जदारांनी    https://hmas.mahait.org     या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.३० सप्टेंबर ते २६ ऑक्टोंबर या कालावधीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.२७ ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि. ३१ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.१० नो...

कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम; झटपट नोकरीसाठी आज (दि.१) ‘जागेवर निवड संधी’ विशेष मोहिम

       छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे ‘ जागेवर निवड संधी’ (प्लेसमेंट ड्राईव्ह) चे बुधवार दि.१ ऑक्टोंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.  विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयातच हा उपक्रम राबविला जाणार असून इच्छुक तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातच बुधवार दि.१ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी २ यावेळात थेट मुलाखती घेतल्या जातील. जिल्ह्यातील युवक युवतींना विविध खाजगी कंपन्या, कारखाने उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित विविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून २२५ रिक्तपदांकरीता मुलाखती घेणार आहेत. यासाठी शैक्षणीक पात्रता १० वी, १२ वी, आयटीआय पास, डिप्लोमा व कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रतेच्या जिल्ह्या...

शासनमान्य ग्रंथांची यादी; सन २०२४ मध्ये प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका) –   राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयामार्फत वर्षनिहाय ‘शासनमान्य ग्रंथांची यादी’ प्रकाशित केली जाते. त्यासाठी सन २०२४ या कॅलेंडर वर्षात ( दि.१ जानेवारी   ते ३१ डिसेंबर २०२४) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या   प्रथम आवृत्तीच्या ग्रंथांच्या प्रत्येकी एक प्रत विनामूल्य (Complimentary copy)   दि. १५ ऑक्टोबर पर्यंत   ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई – ४००००१   येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर संबंधित ग्रंथ यापूर्वीच संचालनालयाकडे पाठविले असतील, तर पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. हेच निवेदन महाराष्ट्र शासनाच्या   www.maharashtra.gov.in   तसेच ग्रंथालय संचालनालयाच्या   www.dol.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती   प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर   यांनी दिली आहे. ०००००  

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी, ३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क: मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. तब्बल ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सर्वत्र नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून मदत व बचाव पथकांनी आतापर्यंत पुरात वेढल्या गेलेल्या ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे. जायकवाडी सह जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधून विसर्ग सुरु आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून प्रशासन सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.             जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१.२ मि.मी इतके असून आज अखेर ८१८.५ मि.मी इतके पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ११०.३ मि.मी इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले. एकूण वार्षिक १४०.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ पैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली. अतिवृष्टी झालेली मंडळे या प्रमाणे- ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी जिल...

ऑरिक सिटी वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.२९) समृद्धी जोडमार्गाचे लोकर्पण

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- ऑरिक सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त  वर्धापन दिन समारंभ व समृद्धी जोडमार्गाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.२९ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , उद्योग विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड यांनी केले आहे. लोकार्पण सोहळा समृद्धी महामार्गालगत तर मुख्य सोहळा ऑरिक हॉल, ऑरिक सिटी शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार दि.२९ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. ०००००

शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष; माहिती पाठविण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि. 26 (जिमाका) –   अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील र्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यायावत कार्यवाही करण्यात येत असून या वर्षी देखील माहितीकोष अद्ययावत करण्यासाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्यवी आस्थपनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इ.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकाराच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि.1 जुलै 2025 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून दि.17 सप्टेंबर 2025 रोजी सर्वकष माहितीकोष – 2025 बाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. जिल्हा स्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वकष माहितीकोष – 2025 नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली, फ्लोचार्ट, शासन परिपत्रक इ. शासनाच्या ...

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती; कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

    छत्रपती संभाजीनगर,दि. २६ (जिमाका)-   अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती , छत्रपती संभाजीनगर कार्यालय नवीन जागेवर स्थलांतरीत करण्यात आले आहे. नवीन जागेचा पत्ता प्रमोदकुमार गणोरकर यांची इमारत प्लॉट नं ८३५ , एन – ५ पाण्याच्या टाकीसमोर चिश्तीया चौक , सिडको , छत्रपती संभाजीनगर पिन नं. ४३१००३ येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहे , असे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती श्रीमती प्रिती बांद्रे – केळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ०००००

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमार्फत बांधकाम कामगारांना ‘गृहउपयोगी वस्तू संच’ निःशुल्क वाटप

  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)-   महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप करण्यात येते. सर्व कामकाज हे www.mahabocw.in   या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे निःशुल्क करण्यात येते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत जिवीत, सक्रिय कामगारांना मे.मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई या संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येते. संच कुटुंबातील (पती / पत्नी) करीता एकच अनुज्ञेय राहणार आहे. गृहपयोगी संचाचे वाटप निश्चित दिनांक भेट पद्धत Appoinment System नुसार होणार असून मंडळाच्या   http://hitkit.mahabocw.in/ appointment या संकेतस्थळाला भेट देऊन लाभार्थ्यांनी अपाईटमेंट घेऊन संच मिळवण्यासाठी संच वाटपाचा दिनांक व वितरण केंद्र    याची निवड करावी. कामगाराने त्याने निवडलेल्या दिनांकास मंडाळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व नियुक्ती पत्र घेऊन निवडलेल्या वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर ऑनलाईन प्रणाली प्रक्रियेनंतर कामगारांना प्रत्यक्ष ...