Posts

Showing posts from August, 2025

रविवारी (दि.३१) भटके विमुक्त दिनानिमित्त कार्यक्रम

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन असून यानिमित्त  एम.जी.एम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृह येथे  सकाळी ११ वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उपस्थितीचे आवाहन सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. ०००००

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी  अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक याप्रमाणे निश्चित झाले आहे असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे. इच्छुक अर्जदारांनी   https://hmas.mahait.org   या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यास्ठी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.१ ते १८ सप्टेंबर या कालाव्दहीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.१९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि.२५ रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.६ ऑक्टोंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवर प्रवेशासाठी दुसरी यादी दि.९ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्...

‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे  गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी कळविले आहे.             म्हाडाच्या १३४१ सदनिका भुखंडाच्या जुन-२०२५ प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने नक्षत्रवाडी, अंबाजोगाई, चिकलठाणा, सातारा, देवळाई येथील विविध योजनेतील अर्ज भरण्यासाठी म्हाडाने ८ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना आता दि.८ सप्टेंबर रात्री. ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेचा भरणा करुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जांची सोडत दि.१ ऑक्टोंबर, २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे.   ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in कि...

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- अल्पसंख्या समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी  शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी सन २०२५-२६ यावर्षासाठी विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.१८ जुलैपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्यास दि.१ सप्टेंबर सायं. सव्वा सहा वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज https://fs.maharashtra.gov.in   या वेबसाईटवर उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट ऑफलाईन पद्धतीने समाज कल्याण आयतालय  पुणे येथे सादर करावी,असे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी कळविले आहे. आधी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ०००००

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा: मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- खेळल्याने शारिरीक मानसिक स्वास्थ सुधारते, खिलाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे मुलांनो भरपूर खेळा… पण मैदानावर; मोबाईलवर नव्हे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विद्यार्थ्यांना खेळण्याचा मंत्र दिला. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम सुरु करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.             हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय क्रीडा संकूलात आज प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अनिता चव्हाण, डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले, शशिकांत वडाप तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य खेळाडू आदी उपस्थित होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज...

उर्स सोहळ्याचे पावित्र्य व भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे, त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणाना दिले.         हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३९ वा उर्स महोत्सव दि.२९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यानखुलताबाद येथे होत आहे. या निमित्त प्रशासनामार्फत कराव्याच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे जाऊन आढावा घेतला.          पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रशांत अजिंठेकर, अग्निशमन अधिकारी विजय राठोड, उप कार्यकारी अभियंता यु. बी . खान,   दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शेख मुबशिरोद्दीन अमिरोद्दीन,मोहम्मद इम्रान मोहम...

शालेय विद्यार्थी पालक सभा सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्यात पालकांनी सहयोग द्यावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. मात्र सुसंस्कारीत भावी नागरिक आपण शिक्षणाद्वारे घडवित असतो. हा नागरिक घडविण्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत पालकांचा सहयोग मोलाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.             खुलताबाद पंचायत समिती सभागृहात शालेय विद्यार्थी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, गट शिक्षणाधिकारी सचिन वाघ, विलास केवट आदी यावेळी उपस्थित होते.             दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित पालकांना उद्देशून म्हणाले की, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दशसूत्री नावाचा उपक्रम सुरु केला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण देतांना शिक्षकांनी राबवाव्याच्या उपक्रमांविषयी दिशा निर्देश देण...

कडधान्य, तेलबिया खरेदीसाठी ई-पीक पाहणी आवश्यक

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- हंगाम २०२५-२६ मध्‍ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्‍या आधारभुत दरानुसार राज्‍यात नाफेड व NCCF च्‍या वतीने पणन महासंघामार्फत राज्‍यात कडधान्‍य व तेलबियांची (मुग , उडीद , सोयाबीन व तुर) खरेदी करण्‍यात येणार आहे. आधारभुत दराने खरेदी करण्‍याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्‍यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतक-यांच्‍या हितासाठी पारदर्शक , कार्यक्षम व संपुर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.केंद्र शासनाच्‍या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्‍याकरीता महाराष्‍ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्‍या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्‍या कालावधीत पुर्ण करावी , असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्‍यात आले आहे. ०००००

विवाहपूर्व संवाद केंद्रातून ७६ जोडप्यांच्या सुखीसंसाराची पायाभरणी

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- विवाहपूर्व संवाद केंद्र जिल्ह्यात दि.१ मे २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आले. विवाह ठरवितांना प्रत्यक्ष वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडीअडचणींबाबत वास्तववादी भान यावे यासाठी हा संवाद घडविला जातो. यात केवळ वधुवर नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही संवाद घडविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या या केंद्रात आतापर्यंत ७६ जोडप्यांच्या संवादातून त्यांच्या सुखी संसाराची पायाभरणी करण्यात आली.             जिल्ह्यात १ मे रोजी विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आले. विवाहेच्छु मुला मुलींमध्ये विवाह निश्चिती करतांना भावी आयुष्यातील संभाव्य प्रसंगांबाबत त्यांना पूर्व कल्पना देऊन भावी जीवनाची स्वप्ने रंगवतांना वास्तवाचे भान दिले जाते.             विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापनेमागील हीच भुमिका आहे.   याद्वारे वर-वधू, त्यांचे आईवडील, नातेवाईक   यांच्या विविध   शंकाचे समाधान होत आहे. भावी आयुष्य...

ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज मागविले

  छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (जिमाका) -     उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" देण्यात येतात. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ", "ब", "क", "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु.एक लाख, रु.पंच्याहत्तर हजार , रु.पन्नास हजार रुपये, रु.पंचवीस हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्र...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.28 (जिमाका) - आगामी सणांच्या पार्श्वभुमिवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37(3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. 11 सप्टेंबर पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

लोकशाही दिन मंगळवार दि.2 सप्टेंबर रोजी

  छत्रपती संभाजीनगर, दि.28 (जिमाका) - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. परंतु सप्टेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी खुलताबाद येथे जरी जरी बक्ष उुर्स येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक सुट्टी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार दि.2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपले अर्ज, निवेदने    सकाळी 11 ते 12 या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार वैयक्तिक असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

  छत्रपती संभाजीनगर दि.28 (जिमाका) – संघ लोकसेवा आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा – II रविवार दि.14 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा सत्र –I सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत व सत्र – II दुपारी 14 ते 16.30 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच सीडीएस – II परीक्षा -2024 परीक्षा – I सकाळी 9 ते 11 सत्र – II    12.30 ते 2.30 व सत्र –III दुपारी 4 ते 6 या कालावधीत सदरील परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे एकूण 16 परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा संपन्न होणार असून परीक्षेसाठी एकूण 4 हजार 702 उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आलेला आहे,अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे. परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थींची संख्या याप्रमाणे- 1.       शासकीय विद्यालय कला व विज्ञान महाविद्यालय,शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ (288) 2.       मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सायसन्स बिल्डिंग भाग- अ) रोजा बाग, हर्सुल रोड, (277) 3.       ...

आयकर विभागामार्फत सहकारी बँकांची परिषद

  छत्रपती संभाजीनगर, दि.28 (जिमाका) – मराठवाडा विभागातील सहकारी बँकाची एक दिवसीय परिषद (दि.26) रोजी आयकर विभागामार्फत घेण्यात आली. आयकर कायदा 1961 च्या टीडीएस बाबतीत महत्व स्पष्ट करीत सर्व बँकाना टीडीएसच्या तरतुदीचे काटेकारेपणे पालन करण्याचे आवाहन सहकार आयुक्त आयकर,नाशिक   टीडीएस रेंज श्रीमती सायली ढोले यांनी केले. या परिषदेस नाशिकच्या टीडीएस सर्कलचे आयकर उपायुक्त सदानंद कसलू, मराठवाडा अर्बन बँक्स को – ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष एस.सी.लोहिया तसेच या परिषदेसाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामधील सुमारे 75 सहकारी बँकेचे सीईओ आणि लेखा व्यवस्थापकांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेसाठी 120 बँकेतील अधिकारी उपस्थित होते. नाशिक येथील टीडीएस सर्कलचे आयकर उपायुक्त सदानंद कसलू यांनी टीडीएसच्या विविध तरतुदी बाबतीत आयकर कायदा 1961 च्या कलम 80GC अंतर्गत कपातीच्या बनावट दाव्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला. तसेच मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष एस.सी. लोहिया यांनी परिषदेला संबोधित केले. कार्यक्रमाची संकल्पना आयकर अधिकारी राहुल मोरे यांन...