Posts

Showing posts from April, 2026

जनगणना २०२७: स्वगणनेच्या टप्प्यास प्रारंभ प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्या- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
              छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- जनगणना २०२७ च्या पहिल्या म्हणजेच स्वगणनेच्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दि.१ ते १५ मे पर्यंत ही स्वगणना होणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी जाऊन माहिती नोंदवतील.प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्यावी. जनगणनेतील सहभाग हे आपले कर्तव्य आहे,अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले. महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यानंतर पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड   तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, होऊ घातलेली जनगणना-२०२७,...

महाराष्ट्र दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि १(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस दलाने राष्ट्र्ध्वजास मानवंदना दिली. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, अपर तहसीलदार उमेश पाटील, तहसीलदार पल्लवी लिगदे, रूपा चित्रक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून   शुभेच्छा दिल्या. ०००००

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
                छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.             महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.             जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्...

प्रतिबंधात्मक आदेश

    छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी   संगिता राठोड   यांनी हे आदेश निर्गमित केले असून   हे आदेश दि.१ मे ते १५ मे पर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.प्रवीण फुलारी, तहसिलदार दिनेश झांपले, श्रीमती चित्रक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ०००००

कर्करोग रुग्णांच्या जीवनातील आशेचा किरण शासकीय कर्करोग रुग्णालयाचा सेवा आणि उपचाराचा वाढता लौकीक

Image
              छत्रपती संभाजीनगर,दि,२९(जिमाका)- केवळ मराठवाडा विभागातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ भागातील कर्करोग रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व   कर्करोग रुग्णालयाने दर्जेदार व सुलभ उपचार देऊन लौकीक प्राप्त केला आहे. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय म्हणजे आशेचा किरण होय.    स्थापनेपासून आजपर्यंत लाखो रुग्णांना सेवा देऊन या रुग्णालयाने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.             शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे व शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या कुशल नियोजन आणि प्रशासनामुळे येथील सेवांचा दर्जा उंचावला असून रुग्ण बरे होऊन हसऱ्या चेहऱ्याने आपल्या कुटूंबात परत जातात हा त्यांच्या समाधानाचा क्षण असल्याचे डॉ. सुक्रे व डॉ. गायकवाड सांगतात.             कर्करोग आणि त्यावर मात करण्यासाठी रुग्णाला द्यावी ला...

'सुपर एल निनो': २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

            निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने 'हीट वेव्ह'चा (उष्णतेची लाट) इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.             जागतिक हवामान बदलामध्ये 'सुपर एल निनो' ही घटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्र सपाटीचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामानावर याचे विपरीत परिणाम होतात. यामुळे भारतात मान्सूनवर परिणाम होण्याची आणि उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक राज्यांत तापमान ४५ ° सेल्सीअस वर जाण्याचे संकेत आहेत.             भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मानकानुसा...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत- चेतना मोरे

    छत्रपती संभाजीनगर: दिनांक,२९(जिमाका)- सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या (ST) मुला-मुलींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी,विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असावे,   विद्यार्थ्याचे पालक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावेत. या योजनेत आदिम जमातीचे विद्यार्थी, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड केलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे.   प्रवेशासाठी जातीचा दाखला (साक्षांकित प्रत), उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याने दिलेला), आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो,जन्म तारखेचा पुरावा, वैद्यक...

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक: उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.; संपर्क समन्वय योजना तयार करुन आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश

Image
           छत्रपती संभाजीनगर , दि . २७ ( जिमाका ):- आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत असतांना सद्यस्थितीत येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार कसा करावा, याबाबत यंत्रणांनी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सर्वस्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष उभारुन सज्जता ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.  तसेच संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी आज सर्व यंत्रणांना दिले .               जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली . जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली . जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अति. पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग,   निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगिता राठोड, शास...