Posts

Showing posts from July, 2024

शासकीय वाहनांचा लिलाव

छत्रपती संभाजीनगर दि.३१ (जिमाका) –   जिल्हाधिकारी कार्यालयातील जुनी टाटा सुमो वाहन क्र.MH-20-AS 222, MH-20A-AS 444 ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या परिसरात  असून ज्या स्थितीत, जेथे आहे व जशी आहे तशी या तत्वावर लिलाव पद्धतीने विक्री करावयाची आहेत. लिलावाची नोटीस आणि सविस्तर अटी व शर्ती याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या   www.aurangabad.nic.in   संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून ही माहिती कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपलब्ध आहे.दि.१ ते ९ ऑगस्ट  या कालावधीत सर्व इच्छुकांना लिलावासाठी सहभाग नोंदविता येईल. दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात लिलाव घेण्यात येईल. यासंदर्भातील पुढील सर्व माहिती, शुद्धीपत्रक, नियत तारखेतील विस्तार (काही असल्यास)   www.aurangabad.nic.in   या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल असेही उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे. ०००००

विशेष लेखः- वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’

               केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षभरात तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.   पात्रता निकष या योजनेचा लाभ   मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" अंतर्गत द्यावया...

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले

  छत्रपती संभाजीनगर दि.३१(जिमाका) – अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.१५ सप्टेंबर पर्यंत आपले  प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल  करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय  व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे- १.       या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून नोंदणी करुन ३ वर्ष पूर्ण झालेल्या मदरसांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. २.       ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madarasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.       अटी व शर्ती नुसार पात्र मदरसा चालकांन...

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

  छत्रपती संभाजीनगर दि.३१(जिमाका)- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव दि.१५ सप्टेंबर पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtara.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनुदानासाठी पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे- १.       शासन मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या किमान ७०% आणि अपंग शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किमान   ५० % असणे आवश्यक आहे...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शुक्रवारी(दि.२ ऑगस्ट) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. राज्य शासनाने महिला सशक्तीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी या सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ करुन हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. ०००००

तरंग मेळावाः४२ लाख ५० हजार रुपयांच्या मालाची विक्री

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी)  यांच्यावतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंगः शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार दि.२७ ते सोमवार दि.२९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या तीन दिवसीय मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या ४२ लाख ५० हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली. उद्घाटनप्रसंगी नाबार्डचे महाप्रबंधक प्रदीप पराते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे व्यवस्थापक   डी. एम. कावेरी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, बॅंक ऑफ महाराष्ट्र चे उपमहाव्यवस्थापक विवेक, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुरेश पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात शेतकरी बांधवांना तीनही दिवस बँकर्स, स्मार्ट योजना, पशुसंवर्धन योजना, ॲग्रो स्टार्ट अप आणि सायन्स फॉर सोसायटी, कंपनी कायदा या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर,जालना, नांदेड, बीड, सातारा, पुणे, नगर, लातूर, वाशिम, कोल्हापूर, ...

महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

    छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी व जागरुकता व्हावी यासाठी महसूल सप्ताह राबविण्यात येतो. यानिमित्त गुरुवार दि.१ ऑगस्ट पासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्यक्रमांचे वेळापत्रक याप्रमाणे- दि.१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करुन महसूल सप्ताहाचा प्रारंभ करणे. मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजना कामकाज,   दि.२ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दि.३ रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, दि.४ रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, दि.५ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, दि.६ रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा, दि.६ रोजी महसूल संवर्गात कार्यरत   सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी- कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे. ०००००

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना

    छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडीय दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा. विद्यार्थी वसतिगृहास पात्र असावा. महाराष्ट्र राज्याचा असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातप्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक, पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे त्या शहरातील तो  रहिवासी नसावा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक पी.बी.वाबळे यांनी केले आहे. ०००००

लोकशाही दिन सोमवारी (दि.५ ऑगस्ट)

    छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. ऑगस्ट महिन्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन  सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लोकशाही दिनाचे आयोज करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक  व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

राष्ट्रीय लोकअदालतः६७२४ प्रकरणे सामोपचाराने निकाली

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि.२७) आयोजित लोक अदालतीमध्ये एकूण ६७२४  प्रकरणात सामोपचार होऊन होऊन ६० कोटी ३१ लक्ष ८९ हजार ३५९ रुपये इतक्या रकमेची प्रकरणे  निकाली निघाली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय येथे शनिवारी (दि.२७) प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.पी.इंगळे यांच्या मार्गदर्शानाखाली हे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत मोटार अपघात, विघुत चोरी, धनादेश अनादर, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँ...

जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (दि.३ऑगस्ट)

  छत्रपती संभाजीनगर दि.२६ (जिमाका) – जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील. 00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: कन्नड येथे उद्या(दि.२८)लाभार्थ्यांचा मेळावा

  छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून १ लक्ष मराठा उद्योजक प्रतिपूर्तीनिमित्त रविवार दि.२८ रोजी कन्नड येथील राजरेश्वर मंगल कार्यालय येथे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपस्थित राहून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 00000

होमगार्ड नोंदणी: आज (दि.२७) पासुन ऑनलाईन अर्ज मागविले

  छत्रपती संभाजीनगर दि.२६ (जिमाका) – जिल्हा होमगार्ड विभागातील पथक कार्यालयनिहाय रिक्त असलेल्या एकूण ४६६ पदांकरीता नोंदणी प्रक्रिया दि.१६ ऑगस्ट पासून राबविण्यात येणार असून त्यासाठी दि.२७ जुलै पासून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज, रिक्त पदांची संख्या, नियम, अटी व शर्ती https://www.maharashtracding.gov.in/mahag/emrollmentform.php  या संकेतस्थळावर उपलब्धआहे. या भरती साठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. 00000

सिल्लोड येथे दि.२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान; पात्र महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री सत्तार

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावे,असे निर्देश पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज यंत्रणेला दिले.             जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात आज पालकमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, श्रीराम पाटील, केशव तायडे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.             माहिती देण्यात आली की, शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवा...

छत्रपती संभाजीनगर येथे दि.११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळावा

  छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद केन्टोन्मेंट मैदान , छत्रपती संभाजीनगर येथे दि.११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे भरती संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी कळविले आहे.             छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली,   जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दि.९ जुलै २०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन सीईई पात्रता चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्र उमेदवारांचे भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर  www.joinindianarmy.nic.in   या वेबसाईटवरुन   पाठविण्यात आले आहे.प्राप्त झालेले प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्र यांच्यासह उमेदवारांनी भरती मेळावा स्थळी उपस्थित रहावे,असे कळविण्यात आले आहे. जिल्हा- तालुकानिहाय भरती प्रक्रियेचे वेळापत्रक याप्रमाणे- दि.११ ऑगस्ट- सर्व जिल्ह्यातील उमेदवार- अग्निवीर ऑफिस असिस्टन...

मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजना: एकही बहिण लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या; गणोरी येथे नोंदणी शिबिरात जिल्हाधिकारी स्वामी यांनी साधला बहिणींशी संवाद

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- ‘ मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना’ राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे.पात्र महिलांनी शासकीय यंत्रणेच्या व्यक्तिंमार्फतच नोंदणी करावी. आपल्या गावातील एकही बहिण लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.             जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नोंदणीसाठी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात फुलंब्री तालुक्यातील गणोरी या गावात आयोजित नोंदणी शिबिरास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज भेट दिली व बहिणींशी संवाद साधला. या गावात बचत गटाच्या माध्यमातून महिलांची नोंदणी जवळपास पूर्ण   होत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.             सरपंच सरला तांदळे, तहसिलदार कृष्णा कानगुले, जिल्हा महिला विकास बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, अंगणवाडी पर्यवेक्ष...

सहकारी संस्थांची अद्यावत माहिती मागविली

छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- ‘ राष्ट्रीय सहकारी डेटाबेस’ करीता सहकारी संस्थांची अद्यावत माहिती मागविण्यात आली असून तालुक्यातील सहकारी संस्थांनी आपली अद्यावत माहिती उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाठवावी असे आवाहन तालुका उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.             राष्ट्रीय सहकारी डेटाबेस च्या संकेतस्थळावर सन २०२३ च्या परिशिष्ट अ नुसार माहिती भरण्यात आली आहे. तथापि, सहकारी संस्थांचे अद्यावत ई मेल पत्ता, अध्यक्ष व सचिव यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, संस्थेतील सभासद संख्या, महिला, अनु.जाती, जमाती सभासद यांची माहिती इ. या संकेतस्थळावर अद्यावत कराव्या अशा सुचना आहेत. तरी तालुक्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांनी अद्यावत माहिती   उपनिबंधक सहकारी संस्था तालुका छत्रपती संभाजीनगर यांचा ईमेल dres.aurangabad@gmail.com वर संस्थेच्या नावासह पाठवावी जेणे करुन ही माहिती संकेतस्थळावर अद्यावत करता येईल,असे आवाहन श्रीमती फुपाटे यांनी केले आहे. ०००००  

आजपासून (दि.२७) ‘तरंग’ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा : ४० कंपन्या होणार सहभागी; विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी)  यांच्यावतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंगः शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार दि.२७ ते सोमवार दि.२९ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंक समन्वयक मंगेश केदार यांनी दिली आहे.             मराठवाड्यातील चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. हा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील   पाटीदार भवन, अमरप्रीत हॉटेल समोर, जालना रोड येथे शनिवार दि.२७ ते सोमवार दि.२९ होणार आहे. मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांमध्ये हा उपक्रम होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.               मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापक रशी दराड, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे अध्य...

विशेष लेखः मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

  राज्यातील सर्वधर्मिय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ति ३० हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. जाणून घेऊ या …. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेविषयी.   या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असेल. या योजेनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना मिळू शकतो. पात्रताः- १.        लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. २.       वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक ३.       लाभार्थी कुटुंबाचे ...