Posts

Showing posts from June, 2024

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व ‘सारथी’तर्फे ८०० जणांचे संगणक प्रशिक्षण पूर्ण; २०० जणांना नियुक्ती

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) व छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सारथी - डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम ( CSMS-DEEP) अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील ८०० विद्यार्थ्यांनी विनामूल्य संगणक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्यापैकी २०० हून अधिक जणांना आतापर्यंत नोकरीची नियुक्तीही मिळाली आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक निलेश झाल्टे यांनी दिली.             आज या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.             महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या केंद्रा मार्फत ‘ वीर बाजी पासलकर - संगणक शिकता शिकता कमवा ’ या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ३३०० हून अधिक मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजात...

बालकांशी निगडीत सामाजिक समस्या निराकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
     छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- बालकामगार, बाल विवाह, बाल भिक्षेकरी, बाल मृत्यू इ. सारख्या बालकांशी निगडीत सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी सर्व संबंधित विभागांनी मिळून कालबद्ध कार्यक्रम राबवावा व या समस्यांचे निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. बैठकीस बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष श्रीमती आशा शेरखाने, बाल न्याय मंडळ अध्यक्ष एस.एस. जाधव, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, मनपा अति.आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पोलीस उपअधीक्षक (ग्रामिण) पी.एम.शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन चिंद्रे, श्रीमती सुवर्णा जाधव, परिविक्षा अधिकारी व्ही.बी. विघ्ने तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.             कोविड मुळे पालक गमावलेले बालक, बाल भिक्षेकरी, बाल कामगार, मानवी हक्क, अनाथ प्रमाणपत्र, प्रायोजकत्व, प्रतिपाल...

दिंडी मार्गावरील ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- आषाढी निमित्त जिल्ह्यातून पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावरील सर्व ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             जिल्हास्तरीय सुरक्षित अन्न व आरोग्यदायी आहार सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहाय्यक आयुक्त अन्न अजित मैत्रे, दयानंद पाटील तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.             बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कारवाईत ३३७ अन्न नमुने घेण्यात आले. त्यापैकी २४४ नमुने प्रमाणित होते तर २६ नमुने कमी दर्जाचे होते.९ नमुने मित्थ्या छाप व ६ असुरक्षित होते. ५२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना होणारे अपघातात अवयव निकामी झाल्यास वा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यात २०२४-२५ साठी आतापर्यंत ४९ प्रस्ताव दाखल असून सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले.             जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसंदर्भात बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती अरुणा भुमकर आदी उपस्थित होते.             जिल्ह्यात प्राथमिक विभागाचे २४ व माध्यमिक विभागातील २२ व २० ऑटोबर २०२३ पूर्वीचे तीन असे एकूण ४९ प्रस्ताव आहेत. सर्व प्रकरणांची पडताळणी करुन प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आले. या सर्व प्रस्तावांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंजूरी दे...

जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक : लखपती दिदी; ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत केंद्रीय ग्रामविकास विभागाचा 'लखपती दिदी' हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून याद्वारे बचत गटांशी निगडीत महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात वर्षभरात ७३ हजार ७४१ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.             'लखपती दिदी', या योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे अशोक सिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, 'आत्मा'   प्रकल्प उपसंचालक ए.यु.कुलकर्णी, सहा. आयुक्त मत्स्यविकास डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन चिंद्रे, श्रीमती सुवर्णा जाधव,जिल्हा कौशल्य विकास अधिकारी वराडे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.    ...

आरोग्य विभागाची वारी, पंढरीच्या दारी: पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूराला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांना आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्यासाठी ' आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी '  हा उपक्रम आरोग्य विभागाने सुरु केला आहे. दि.२२ जून ते २८ जुलै पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.  या उपक्रमाद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टर्स व सुश्रुषा कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.                 जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ जी.एम.कुडलीकर यांनी हे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . वैद्यकिय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहाय्यिका व आरोग्य सेविका , आरोग्य सहाय्यक व ...

नगरपरिषदांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यातील नगरपरिषदांनी आपापले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करुन  लोकांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मुख्याधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.             वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, या नगरपरिषदा व फुलंब्री व सोयगाव या नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. गंगापूर न.प. मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे,वैजापूर न.प. मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, फुलंब्री नगर पंचायत मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, कन्नड न.प मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, सिल्लोड न.प. मुख्याधिकारी   सय्यद रफिक,   पैठण न.प. मुख्याधिकारी संतोष जागळे आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी यांनी या सर्व नगरपरिषदांच्या भागातील   कर वसुलीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपरिषदांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मालमत्तांचे सर्व्हेक्षण करुन ...

सर्वंकष कृषी विकास उपाययोजनांवर भर द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२४ (जिमाका)- शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याच्या प्रयत्नात जमिनीचा पोत बिघडून भविष्यात जमिनीच्या उत्पादकतेत घट होतो, जल, मृद संधारण उपाययोजनांच्या अभावी माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढते, ह्यामुळे शेतीचा ऱ्हास होऊन नुकसान होते, हे टाळण्यासाठी सर्वंकष कृषी विकासाच्या उपाययोजनांवर भर द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, आत्मा प्रकल्प उपसंचालक ए. यु. कुलकर्णी, सहा. आयुक्त मत्स्यविकास डॉ. मधुरिमा जाधव, सहा, आयुक्त पशुसंवर्धन आर.डी. इंगळे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लढ्ढा आदी विविध विभागांचे अधिकारी सहभागी होते.             गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, आत्मा नियामक मंडळ, प्रध...

१२ वी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुविधा

  छत्रपती संभाजीनगर दि.२१(जिमाका) – इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मुला, मुलींचे वसतीगृह सुरु करण्यात आले असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाचे वेळापत्रक हे सर्व शासकीय वसतिगृह व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण येथे सूचना फलकावर लावण्यात आले आहे. प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून दि.२२ जून ते २५जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन द्यावयचे आहेत. प्रवेश अर्जासोबत महाविद्यालयाचे बोनाफाईड, आधार कार्ड, बँक पासबुक, मागील वर्षाचे गुणपत्रक, मार्कशीट, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दोन फोटो रहिवासी दाखला, इ.आवश्यक कागदपत्रे यांच्या छायांकीत प्रतिसह प्रवेश अर्ज दि.२५ जुलै रोजी सायं. ५ वा.पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी सर्व शासकीय वस्तीगृह सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयास संपर्क साधावा. १...

पैठण येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर

  छत्रपती संभाजीनगर दि.२१(जिमाका) – कौशल्य रोजगार, उद्योजकता व नवीन नेतृत्व महाराष्ट्र यांच्या विभागातंर्गत पैठण विधानसभा मतदार संघातील छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबीर गुरुवार दि.२० रोजी पिताबंरी मंगल कार्यालय पैठण येथे आयोजित करण्यात आले. उद्घाटन विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १० वी व १२वी उत्तीर्ण व परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी करणे, नविन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.अनिल जाधव, योगेश जोशी, संजय गौरशेटे, दीपक वाकडे,योगेश उगले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी ३५० विद्यार्थी हजर होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाही  समपुदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य एन.एन. आहेरकर, उपप्राचार्य एम.एस.माळी, तसेच अन्य गटनिदेशकांनी परिश्रम घेतले. ०००००    

आंतरराष्ट्रीय योग दिवस: जीवनशैली म्हणून ‘योगा’चा अंगिकार करावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२१ (जिमाका)- उत्तम, संतुलित, निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास हा सर्वोत्तम मार्ग आहे. योगाचा दैनंदिनी म्हणून आपल्या जीवनात अंतर्भाव करावा. योगा चा जीवनशैली म्हणून अंगिकार व्हावा, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी योगाचे महत्त्व सांगितले.             विभागीय क्रीडा संकूल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. भागवत कराड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई,उदय कहाळेकर, योगप्रशिक्षक श्रीमती मोना राजपूत, उत्तम काळवणे आदी उपस्थित होते. कै. कलावती चव्हाण हायस्कूल, गीता हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. तसेच मान्यवरांसह उपस्थितांकडून योगाभ्यास करुन घेण्यात आला.             पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना यांनी या उपक्रमात सहभाग दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिन पुरी, श...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा राज्यभरात ९२ हजार जणांना लाभ; बँकांनी लाभार्थ्यांचे प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत-अध्यक्ष नरेंद्र पाटील

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२० (जिमाका)- अ ण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून राज्यात ९२ हजार १४४ लाभार्थ्यांना उद्योगासाठी ७ हजार ३३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६०३ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला असून  महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी  राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी बँकांनी पात्र लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे कालमर्यादेत मार्गी लावावेत, अशी सूचना महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आज येथे केली.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण पाटील, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, महामंडळाचे जिल्हा सम...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे ३०० महिलांना हिमरू शाल निर्मितीचे प्रशिक्षण; यशस्वी उद्योजक व्हा-जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले प्रोत्साहन

Image
       छत्रपती संभाजीनगर दि.२० (जिमाका)- येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे ३०० महिलांना हिमरू शाल निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामहिलांना आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षित महिलांनी यशस्वी उद्योजक व्हावे,अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांना प्रोत्साहन दिले.             महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहात आज हा कार्यक्रम पार पडला. विभागीय संचालक दत्तात्रय थावरे,संचालक बी.टी.यशवंते, जिल्हा प्रकल्प अधिकारी भारती सोसे तसेच विलास भुमरे   आणि प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.               या प्रशिक्षण कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर,पैठण, विहामांडवा येथील एकूण ३०० महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले.   त्यांना आज प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.             जिल्हाधिकारी ...

विशेष लेखः- हिवताप प्रतिरोध आणि उपाययोजना

Image
  जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविला जातो. त्यानिमित्त हिवताप प्रतिरोधासाठी राबवावयाच्या उपाययोजनांची माहिती देणारा हा विशेष लेख. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हिवताप, डेंग्यू , चिकनगुन्या या सारखे किटकजन्य आजारांचा प्रसार होतो. डासाची मादी ही साचलेल्या पाण्यात अंडी घालते.   साधारण ८ ते १० दिवसात नवीन डास जन्माला येतो. चावण्याने बाधीत व्यक्तिंच्या शरीरातील   जंतू हे डासांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तिच्या शरिरात जातात. तेथे त्या रोगजंतूंची वाढ होऊन हिवताप, डेंग्यु, चिकुन गुन्या असे आजार फैलावतात. हे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना   याबाबत माहिती खालील प्रमाणे- हिवताप हा परजीवी किटकांमुळे होतो. अॅनाफिलिस मादी डास चावल्यामुळे होतो. चिकनगुन्या व डेंग्यु हे एडिस इजिप्टाय या दुषित डासाच्या दंशामुळे होतात व हे आजार विषाणूजन्य (व्हायरल) आहेत. ·          हिवतापाची लक्षणेः-थंडी वाजुन ताप येणे , डोके दुखी , एक दिवस आड ताप , उलटी होणे. ·       ...