Posts

Showing posts from February, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दान वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी ‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बॅंक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याद्वारे वाचन चळवळीलाही बळकटी मिळेल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बुक बॅंक’ उपक्रमांतर्गत १००० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून बुक बॅंक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल अधिकारी- कर्मचारी यांनी स्वतःच्या देणगीतून १००० पुस्तके खरेदी करुन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आश्विनी लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, नीलम बाफना, लतिफ पठाण तसेच अन्य महसूल अधिकारी- कर्मचारी उप...

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर/ जालना, लातूर /बीड अंतर्ग येत असलेल्या सर्व शासकीय / अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता १० वी ते १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी या परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी नामवंत प्रशिक्षण संस्थांमध्ये मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन द्यावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी चेतना मोर्रे यांनी केले आहे. सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा तसेच EMRS / मराठी माध्य शाळा / जिल्हा परिषद/ नगरपालिका व महानगर पालिकांमधील माध्यमिक शाळां मध्ये इयत्ता १० वी नंतर ११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २ वर्ष कालावधी मध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आय. टी. आय. मधील अभ्यासक्रमा च्या प्रवेशा करीता (JEE/NEET/CET) जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या...

मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषेची समृद्धी व वैभव जोपासणे हे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. या भाषेची समृद्धी व वैभव जोपासणे प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तिचे कर्तव्य आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.             ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत या कार्यक्रमास युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी रवी कोरडे, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.             साहित्यिक   रवी कोरडे म्हणाले की, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारसंपदेची वाहक आहे. कुसुमाग्रज यांच्या साहित्यकार्याचा उल्लेख करत त्यांनी मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची आठवण करून दिली. मराठी ही प्राचीन, समृद्ध आणि अभिमानास्पद भाषा आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातृभाषेचा सन्मा...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना १६० जणांचे अर्ज पात्र; दि.६ मार्च रोजी सोडत

  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत थेट कर्ज योजेनअंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्याअंतर्गत दिलेल्या मुदतीत ३११ कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले.त्यातील १६० अर्ज छाननी अंतर्गत पात्र झाले आहेत. तर   १५१ कर्ज मागणी अर्ज अपात्र आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक प्रणिता बोराडे यांनी कळविले आहे. पात्र अर्जांपैकी प्रत्यक्ष लाभार्थी निवडीसाठी दि.६ माच रोजी सोडत पद्धतीने निवड केली जाणार आहे.             १६० पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष ६५ व महिला ९५ अर्ज आहेत.   या योजनेचे जिल्हा कार्यालयास ५० प्रकरणांचे उद्दिष्ट असून अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या मान्येतेनुसार चिठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) निवड करावयाची आहे. त्या करीता शुक्रवार   दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह खोकडपुरा, शिवाजी हायस्कुलच्या शेजारी छत्रपती संभाजीनगर येथे लाभार्थी निवड ...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका) - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळविले आहे.             महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व ग्रामिण भागात नागरिक शेतकरी, विद्यार्थी , महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा-१ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचे नियोजन या प्रमाणे- मंडळस्तरावर पूर्वतयारी दि.५ मार्च पर्यंत, दि.७ ते १४ मार्च मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.१० ते १७ एप्रिल मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.८ ते १५ मे नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ. ५०० सजा व १३६९ गावांमध्ये हे अभियान राबव...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्च रोजी

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो. मार्च महिन्यात सोमवार दि.२ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला आहे.हा लोकशाही दिन सोमवार दि.२ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. तक्रारदारांनी आपले अर्ज प्रथम तालुका लोकशाही दिनात सादर कर्वे. त्यानंतर एक महिन्यांनी टोकन पावती जोडून जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल करतांन अर्ज विहित नमून्यात असावा. तक्रार, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावर दाखल केल्याची पोहोच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, यापूवी लोकशाही दिनात दाखल केलेले अर्ज स्विकारले जात नाहीत. तरी तक्रारदारांनी आपली तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. ०००००

वन विभागात माजी सैनिकांची भरती

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- राज्याच्या वन विभागात माजी सैनिक / माजी सैनिक महिला यांची भरती   दि.१६ ते २० मार्च दरम्यान भरती कार्यालय मैदानावर होणार आहे. ही भरती फक्त महाराष्ट्रातील   माजी सैनिक/ माजी सैनिक महिलांसाठी मर्यादीत आहे. या संधीचा संबंधितांनी लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे. 00000

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- पैठण येथे होऊ घातलेल्या नाथषष्ठी यात्रोत्सवात भाविकांना स्वच्छता, सुरक्षा व सेवा द्यावी. त्यासाठी प्रशासनाने सज्ज असावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज पैठण येथे नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभुमिवर पूर्वतयारी बैठक घेतली.   पैठण येथे दि. ५ मार्च रोजी प्रथेनुसार 'तुकाराम बीज' मुहूर्तावर संत एकनाथ षष्ठी यात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. दि. ९, १० व ११ मार्च दरम्यान षष्ठी, सप्तमी व अष्टमी पर्वावर यात्रा उत्सव साजरा होणार आहे. उत्सवाचे यंदा २२७ वे वर्ष आहे.             उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उप-अभियंता श्रद्धा निंबाळकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, जलसंपदा वि...

महिला वाहन चालक प्रशिक्षक प्रशिक्षण

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका) - महिलांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी महिलांना टॅक्सी, बस चालक प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्यातर्फे ब्रिजस्टोन इंडीया संस्थेच्या सहकार्याने १० महिलांसाठी ३० दिवसांचे अनिवासी विशेष वाहन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि.२८ रोजी सुरु होणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचा अभ्यासक्रम थेअरी व प्रॅक्टीकल असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे.प्रशिक्षणाचा पत्ता हॉटेल कलासागर, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्यापुढे, पुणे मुंबई महामार्ग, कासारवाडी, पुणे ४११०३४. जिल्ह्यातील इच्छुक महिलांनी संपर्क करावा,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे. आवश्यक पात्रताः- किमान २ वर्षे जुने लहान व मोठी चारचाकी वाहने चालविण्याचा परवाना, किमान १० वी पास किंवा आयटीआय, इंजिनिअरिंग पदविका, मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी असल्यास प्राधान्य. ०००००

मराठी भाषा गौरव दिन ते महिला दिन; शासकीय महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका) - मराठी भाषा गौरव दिन (दि.२७ फेब्रुवारी) ते आंतरराष्ट्रीय महिला दिन (दि.८ मार्च) चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धात अधिकाधिक महिला अधिकारी- कर्मचारी यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. या सप्ताहात ऑनलाइन निबंध स्पर्धा, चारोळी/घोषवाक्य लेखन, स्लोगन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रत्यक्ष स्वरुपात कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा,फॅन्सी ड्रेस,रँपवॉक,अन्नपूर्णा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १)          निबंध स्पर्धा (ऑनलाइन – ०२/०३/२०२६)- मी कर्तृत्ववान – कर्तृत्वाचा प्रवास             माझ्या जीवनातील प्रेरणादायी स्त्री पात्र             कामकाजात मराठी भाषेचे महत्त्व           ...

‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका )- ‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ या गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा आज जिल्हा परिषद शाळा, सातारा येथे अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.             जिविका फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात येत असून क्रेडिटॲक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या सहकार्याने अंमलात आणला जात आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील एक प्रमुख पण टाळता येण्यासारखा कर्करोग आहे. योग्य वेळी जनजागृती व किशोरवयात HPV लसीकरण केल्यास भविष्यात या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. या मोहिमेंतर्गत ५,००० HPV लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.             जिल्हा परिषद शाळा सातारा येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, क्रेडीट ॲक्सेसचे मुख्य कार्यकारी अधि...

आरोग्य यंत्रणांचा आढावा जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४८५ ग्रामपंचायती ह्या क्षयमुक्त जाहीर झाल्या आहेत. उर्वरीत ३९० ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.             जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विविध समित्यांची बैठक आज पार पडली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली डकले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी लिपारे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सारिका लांडगे, डॉ. जयश्री लहाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक मुंडे उपस्थित होते तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीने सहभागी झाले होते. ...

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका )- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             प्रशिक्षणा दरम्यान संबंधित विषयाचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक ज्ञान व उद्योजकीय ज्ञान देण्यात येईल. उद्योग उभारणी, शासकीय कर्ज /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा, लायसन्स याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.             प्रशिक्षणार्थ्यांची निवड प्रवेश मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील असावा, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, एक महिना कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण व दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान प...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर कडे प्रयाण

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका )- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी ४ वाजून १० मि. च्या सुमारास वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ  येथे हेलिकॉप्टरने शेगाव जि. बुलडाणा येथून आगमन झाले.येथून त्यांचे नागपूर कडे भारतीय वायु सेनेच्या विशेष विमानाने प्रयाण झाले.  राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी निरोप  दिला. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर,तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते. 00000

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत

Image
  छत्रपती संभाजीनगर , दि.२५(जिमाका)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी १० वा १०  मि. च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झाले.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट , महापौर समीर राजुरकर , खा. डॉ. कल्याणराव काळे , आ. प्रदीप जयस्वाल , आ. अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर , जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.   त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शेगाव जि. बुलडाणाकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. ०००००