Posts

Showing posts from March, 2024

मनाई आदेश लागू

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- अगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दि.१५ एप्रिल पर्यंय्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू  करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. त्याअन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणे, पाच किंवा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पूर्वपरवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक ग्रामिण यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील,असेही अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी स्पष्ट केले आहे. ०००००

नाथषष्ठी यात्रा: सर्व विभागांनी समन्वय राखून यात्रेकरुंना सुविधा द्याव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- पैठण येथे होणाऱ्या नाथषष्ठी यात्रोत्सवात सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखून  यात्रेकरुंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्या व यात्रा सुखद करावी ,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. पैठण येथील यात्रोत्सवाबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. दि.३० रोजी जिल्हाधिकारी स्वतः मुक्कामी जाऊन यात्रास्थळी थांबणार आहेत.   या आढावा बैठकीस जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी स्वामी यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सहभागी झाले होते. तसेच पैठण येथून उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, यात्रेकरुंना कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, त्यांचे जाणे येणे हे विनाअडथळा पार पडावे यासाठी वाहतुकीचे मार्ग, पार्किंगची व्यवस्था याबाबत काळजी घेण्यात यावी. तसेच दिंडीच्या वाहनांना जाण्या...

मतदान केंद्रावर पाळणाघर सुविधा पुरविण्यात महिला बालविकास विभागाची भुमिका महत्त्वाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विशेषतः ज्या स्तनदा माता, लहान बाळ असणाऱ्या माता आहेत. त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणा घर सुविधा द्यावयाची आहे. हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पार पाडावयाची आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. मतदान केंद्रांवर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात   आली होती. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मतदान केंद्रावर मतदान करतांना कडेवर असलेले बाळ सांभाळून रांगेत उभे राहणे गैरसोईचे होऊ शकते. त्यासाठी तितका वेळ त्यांच...

महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचत गटांचे अध्यक्ष, सचिव सदस्य उपस्थित होते. तसेच ‘स्वीप’ चे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त पांढरे, स्वप्निल सरदार, गटशिक्षण अधिकारी श्रीमती थावरे यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.                         जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला मतदारांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. मतदानामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये किंवा सुविधा अभावी मतदान करता आले नाही; ही सबब र...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोषागार तपासणी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- आर्थिक वर्ष समापनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा कोषागाराची पाहणी करुन तपासणी केली. जिल्हा कोषागार अधिकारी, सहा. कोषागर अधिकरी संजय धिवर, सचिन अन्नपूर्णे, गणेश केकर्जवालेकर तसेच अन्य सहकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या समापनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कोषागाराच्या सुरक्षा कक्षात सर्व जमा खर्च पाहणी केली. कोषागारात ठेवल्या जाणाऱ्या मुद्रांकादींच्या साठ्याची तपासणी केली. तसेच त्यांच्या नोंदी तपासल्या. जिल्हा कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांना सर्व नोंदी दाखवल्या व माहिती दिली. ०००००

प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने  सार्वजनिक बैठका, प्रचार सभा, प्रचार फेरी इ. कार्यक्रम आयोजित होत असतात. अशा वेळी स्थानिकस्तरावर परवानगी देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यक्षेत्रातील  सर्व पोलीस ठाणे, सर्व शाखांचे प्रभारी अधिकरी, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त , सर्व पोलीस उपायुक्त यांना अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी निर्गमित केले आहेत. अधिकार प्रदान करण्याचा कालावधी दि.१० जून २०२४ पर्यंत अंमलात राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००  

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांचे मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधिनियमान्वये करावयाच्या विविध बाबींसाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. खाजगी इमारत, भिंत इ. चा निवडणूक प्रचार वापरास पूर्व परवानगी आवश्यक निवडणूक प्रचारासाठी   कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंत इ. चा वापर संबंधित मालकाच्या परवानगी शिवाय   तसेच संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय   वापर करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपकाच्या वापरास निर्बंध निवडणूक प्रचारादरम्यान ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहे. त्यात संबंधित पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर करण्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३३ (एन) अन्वये निर्बंध असून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ति यांन...

चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- परिवहनेतर चारचाकी वाहनांसाठी सुरु असलेली MH 20 GQ  ही नोंदणी क्रमांक मालिका आता संपुष्टात येत असून  नवीन  MH20GV  ही मालिका सुरु होत आहे.  या मालिकेतील MH20GV 0001 ते 9999 ही मालिका दि.४ एप्रिल पासुन सुरु करण्यात येत आहे.  या मालिकेतून आपल्या वाहनांसाठी पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल तर  इच्छुक वाहनधारकांनी  आपला विहित नमुन्यातील अर्ज, आकर्षक क्रमांकाला लागू असलेले शुल्क रकमेचा धनाकर्ष (प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे), ओळखपत्राच्या साक्षांकीत प्रति सह दि. ४अ एप्रिल पर्यंत  दुपारी २ वाजेपर्यंत  खिडकी क्रमांक २१ वर जमा करावे. आकर्षक क्रमांकाचे वाटप हे महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्याट येईल. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास  अशा अर्जदारांनी दुसऱ्या दिवशी  दुपारी २ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात मुळ शुल्का व्यतिरिक्त  अधिक रकमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोंद...

‘सिमी’संघटना बेकायदेशीर घोषित; कारवाईसाठी अधिकार वापराची मुभा

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- केंद्रशासनाने एका अधिसुचनेद्वारे स्टुडंटस इस्लामिक  मुव्हमेंट ऑफ इंडीया (सिमी) या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे.याबाबत दि. २९ जानेवारी २०२४ रोजी केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक  एस.ओ. ३५४ अन्वये  बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम १९६७ च्या कलम ३ च्या उपकलम (१) द्वारे घोषित केले आहे.  तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम  १९६७ च्या कलम ४२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करतांना केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक एस. ओ. ४७५ (ई) दि.५ फेब्रुवारी २०२४ अन्वये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम ७ आणि ८ अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणार अधिकार वापरतील, असे निर्देश दिले आहेत, असे अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे. ०००००

लोकसभा निवडणूक २०२४ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक; संयुक्त नाकेबंदी करुन आचारसंहिता अंमलबजावणीचे नियोजन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला.   लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जळगाव जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नाशिक जलज शर्मा, बीड दीपा मुधोळ मुंडे, अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, बुलडाणा डॉ. किरण पाटील, धाराशिव डॉ. सचिव ओम्बासे   तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे   पोलीस अधीक्षक, संलग्नित तालुक्यांचे तहसिलदार   तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,आदी अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी संलग्नित असलेल्या जालना, जळगाव, धाराशिव, बीड, बुलडाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमधील निवड...

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक  पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला.  महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अपर आयुक्त रणजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.   बैठकीत नोडल अधिकाऱ्यांच्या सोबविलेल्या जबाबदाऱ्यानुसार कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात आचारसंहिता, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक साहित्य मागणी- वितरण, वाहतुक व्यवस्था, संगणक कक्ष, कम्युनिकेशन प्लॅन, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र, खर्च निरीक्षण, मतपत्रिका, डमी , टपाली मतपत्रिका, मिडिया, संपर्क कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षक, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा (शहरी व ग्रामिण) मतमोजणी, वेबकास्टिं...

प्रतिबंधात्मक कारवाई महसूल-पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तथापि, ही कारवाई करतांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.   निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील सर्व उपविभागीय,तहसील कार्यालयातील, पोलीस स्टेशन मधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.           जिल्हाधिकारी   स्वामी म्हणाले की, कायद्याने दिलेल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करून   कोणावरही अन्याय होईल असे वर्तन पोलीस प्रशासन किंवा महसुल दंडाधिकारी कार्यालयाकडून होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक   ...

टंचाई आढावा संवेदनशीलतेने राबवा उपाययोजना -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूकीचे कामकाज सुरु असतांना जिल्ह्यात निर्माण होत असलेली टंचाईची परिस्थिती हाताळून राबवावयाच्या उपाययोजना ह्या संवेदनशीलतेने राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यंत्रणेस दिले. जिल्ह्यातील टंचाई स्थिती, त्यावरील उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकानिहाय आढावा दुरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्हा मुख्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, निलेश घोडके, तहसिलदार पल्लवी लिगाडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी सहभागी झाले होते. टंचाई स्थितीबाबत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सध्या २३८ गावे, ४५ वाड्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.   १६८ गावांमध्ये १९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात २२.५४ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्प १६ आहेत त्यात ९.१० टक्के जलसाठा आहे, तर लहान प्रकल्प ९७ आहेत त्यात १३.६५ टक्के जलसाठा आहे. असे एकूण ११४ प्रकल्पांमध्ये २०.७९ टक्के जलसाठा आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, टंचाई ...

प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या प्राधिकार पत्रांसाठीची शिफारस ४ एप्रिल पर्यंत आयोगाकडे पोहोचणे आवश्यक

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदान व मतमोजणीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना द्यावयाच्या प्राधिकार पत्रांसाठीची निवडणूक आयोगाकडे शिफारस पोहोचण्यासाठी गुरुवार दि. ४ एप्रिल २०२४ अंतिम दिनांक देण्यात आला आहे. त्यापूर्वी ते जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय माहिती कार्यालये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अशा तीन पातळ्यांवरुन आयोगाकडे छाननी करुन आयोगाकडे पाठविले जाणार आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक भारत निवडणूक आयोगाने दिनांक १६ मार्च , २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे . सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामधील लोकसभेच्या ४८ जागांकरिता ५ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे . सदर निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान दिनांक १ ९ एप्रिल, २०२४ ( शुक्रवार ) , दुसऱ्या टप्प्याचे मतदान दिनांक २६ एप्रिल, २०२४ ( शुक्रवार ) , तिसऱ्या टप्प्याचे मतदान दिनांक ०७ मे , २०२४ ( मंगळवार ), चौथ्या टप्प्याचे मतदान दिनांक १३ मे , २०२४ ( सोमवार ) आणि पाचव्या टप्प्याचे मतदान दिनांक २० मे , २०२...