Posts

Showing posts from February, 2024

लोकशाही दिन सोमवारी (दि.४)

  छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिन    प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी    आयोजित करण्यात येतो.    मार्च महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. ४  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १२ वा. होणार आहे. लोकशाही दिनासाठी लोकांचे अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात स्विकारण्यात येतील. नागरिकांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यानंतर दोन प्रतित तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या अर्जाची पोहोच पावतीही    सोबत जोडावी.    जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना अर्ज विहित नमुन्यात असावा.    तक्रार-निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. लोकशाही दिनी अर्ज दाखल करतांना न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक बाबी आणि लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज   याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे. ०००००

अनाथ बालकांना प्रमाणपत्र; महिला व बालविकास विभागात स्वतंत्र कक्ष

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका):- महिला व बालविकास विभागातर्फे अनाथ बालकांणा आवश्यक सर्व कागदपत्रे दाखले देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दि.५ मार्च पर्यंत ही मोहिम सुरु राहिल.  या काळावधीत अनाथ बालकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड इ. उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जाधव यांची इमारत, प्लॉट नं. ९ खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे त्यासाठी एक समर्पित कक्ष  स्थापन करण्यात आला आहे. अनाथ बालकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी या समर्पित कक्षातील  परीविक्षा अधिकारी  विजय विघ्ने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे (९५१८९५८३५५), श्रीमती सुप्रिया इंगळे, दीपक बजारे (९३७०००३५१७) यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांनी केले आहे. ०००००

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात आज कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी श्रमदान करुन स्वच्छता मोहिम राबविली.

Image
 

शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती मे, जून पर्यंत अधिक तीव्र होत जाणार. या कालावधीत शासनातर्फे दुष्काळी उपाययोजना केल्या जातात याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. दुष्काळी उपाययोजना राबवितांना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी झेलम जोशी, एच.पी. देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारोती बनसोडे, ज्ञानेश्वर हनवते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली. जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी सद्यस्थितीत ५० महसूल मंड...

निवडणूक पूर्वतयारीःनोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ; स्वतःला प्रशिक्षीत करुन ‘अपडेट’ व्हा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व माहिती पुस्तकांचा व सर्व नियमांच्या माहितीचा अभ्यास करा. पुस्तकातील मार्गदर्शनानुसार स्वतःला प्रशिक्षीत करुन ‘अपडेट’ व्हा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे,   उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,   अति.आयुक्त मनपा रणजीत पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्वाच्या कायद्यातील तरतूदीनुसार निवडणूका होत असतात. तथापि, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सविस्तर व अत्यंत सखोल पद्धतीने नियमावली तयार केलेल्या आहेत. या सर्व सुचना व निर्देश हे वेळोवेळी अद्यावतही केले जातात.   त्या सर्व नियमांचा अभ्यास करा. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांन...

महासंस्कृती महोत्सवास प्रेक्षकांची गर्दी ;अवधूत गुप्तेंच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अवधूत गुप्तेंच्या संगिताच्या तालावर सादर झालेल्या गीत श्रवणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने संगीत श्रवणाचा आनंद घेतला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘महासंस्कृती’ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२३) अवधूत गुप्ते यांचे सादरीकरण झाले. त्यासमवेत स्थानिक कलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, पैठण -फुलंब्रीच्या   उपविभागीय अधिकारी   श्रीमती बाफना , उपविभागीय अधिकारी   राठोड, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, नायब तहसीलदार बारवाल, विजय चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सहकुटुंब   उपस्थित होते. प्रारंभी स्थानिक कलावंट शेखर भाकरे   आणि रामदास धुमाळ यांच्या कलापथकाने विविध कलाप्रकार सादर केले. शेखर भाकरे यांनी   वासुदेव ,बुर्गुंडा हा कलाप्रकार सादर केला . त्याद्वारे त्यांनी शासनाच्या विविध योज...

संत रविदास यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ००००००

आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने- उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- सहकारी बॅंक चालवण्यासाठी संचालक मंडळाने सतत सजग राहणे आवश्यक आहे. बॅंकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून रिजर्व बॅंकेने कायदेही कडक केले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने आहेत,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. आंबाजोगाई पिपल्स कॉ.ऑप बॅंकेच्या १७ व्या व छत्रपती संभाजीनगर येथील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे,आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप जयस्वाल , विजया रहाटकर, बॅंकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तसेच संचालक मंडळ सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. आपल्या संबोधनात श्री. पवार म्हणाले की, रिजर्व बॅंकेचे नियम हे बॅंकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठीच आहेत. संचालकांचे थोडेही दुर्लक्ष करणे हे संस्था डबघाईला जाण्याचे कारण ठरू शकते.   लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणं, पतपुरवठा करणं आणि कर्ज वसुली करणं हे संस्था उत्तम चालल्याचे लक्षण आहे. आंबाजोगाई पिपल्स को ऑप बॅंक यादृष्टिने उत्तम कार्य करीत असल्याचे दिसून येते असेही श्री. पवार यांन...

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ०००००  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण; अहिल्यादेवींचा राज्यकारभार प्रेरणादायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा  प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले. गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज   झाले. आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंह राजे होळकर,'राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान' चे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.   उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात महिलांचा सन्मान केला.   त्याच भोसले घराण्यात पुढे महाराणी तारामती व होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार महिलांनी उत्तम राज्यकारभार केला. त्यांचा राज्यकारभार आजही प्रेरणादायक आहे.   ते पुढे म्हणाले क...

प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि. २३  (जिमाका):- राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ति ह्या दिव्यांग आहेत. त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल. त्याची सुरुवात विभागीय मुख्यालयांपासून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. सतिष चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली...

बालगृहासाठी इमारत भाड्याने हवी; इच्छुकांकडून प्रस्ताव मागविला

  छत्रपती संभाजीनगर, दि.22 (जिमाका):- अधीक्षक, शासकीय मुलांचे बालगृह (वसतीगृह) जालना ही संस्था छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत करण्यात आली  आहे. या बालगृहास बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम -2015 अन्वये व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची व काळजी व संरक्षण) नियम 2018 चे नियम 31 भौतिक सोयीसुविधा (6) च्या निकषानुसार इमारत 8745 चौ.फुट इमारत बांधकाम क्षेत्र त्यात स्नानगृहे -5, प्रसाधनगृह-8 पिण्याच्या व वापराच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सुस्थितीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व प्रवेशितांच्या दृष्टीने सुरक्षित आवारात उपलब्ध असलेली सुसज्य इमारत शासकीय संस्थेस बांधकाम विभागाच्या चटई क्षेत्राच्या दरानुसार भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. अशी सर्व सोयीयुक्त इमारत उपलब्ध असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट नं.9 श्री.जाधव यांची इमारत खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी बातमी प्रसिद्ध झाल्यापासुन 15 दिवसापर्यंत संपर्क साधावा. तसेच इमारत भाडे बाबतचा प्रस्ताव सादर करावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा एच.जाधव  (संपर्क क्रमांक – 9405530815) य...

आपत्ती व्यवस्थापन व औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम वेळापत्रक-2024

  छत्रपती संभाजीनगर, दि.22 (जिमाका):- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण अंतर्गत द्वितीय टप्प्यात आपत्ती व्यवस्थापन औद्योगिक सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रभोदय मुळे यांनी हा कार्यक्रम दिला आहे.  दिलेला प्रशिक्षण कार्यक्रम याप्रमाणे-                दि.26 रोजी  सकाळी 10 वा. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि, एम.आय.डी.सी. वाळूज, एफ.डी.सी. लिमिटेड बी-8, एम.आय.डी.सी.वाळूज, अजंता फार्मा लिमिटेड, बी-5/6/4,पैठण, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लि गट नं.13 आणि 14 वाळूज एम.आय.डी.सी. रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज एमएच लि एम.आय.डी.सी. शेंद्रा, बजात ॲटो लि. एम.आय.डी.सी. वाळूज,                दि.27 रोजी सकाळी 10 वा. लुपिन लॅबोरेटरीज लि अे.28/1 एम.आय.डी.सी. चिकलठाणा, व्हेरॅक इंजिनियरींग प्रा. लि., हिंदुस्तान पेट्रोलियम को.लि. एम.आय.डी.सी. चिकलठाणा,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हादौरा

  छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- उपमुख्यमंत्री अजित पवार  हे शुक्रवार दि.२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी पावणे आठ वा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी आठ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व आढावा बैठक. सकाळी साडेनऊ वा. पत्रकार परिषद, स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय. मोटारीने गंगापूर कडे प्रयाण, सकाळी पावणे अकरा वा. फैसल चाऊस यांचे निवासस्थान पोस्ट ऑफिसजवळ गंगापूर येथे आगमन व राखीव. नंतर जामगाव टी पॉईंट गंगापूर कडे प्रयाण सकाळी सव्वा अकरा वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभास उपस्थिती, सकाळी पावणे बारा वा. जाहीर सभा, स्थळ- सोमाणी मैदान बस स्टॅण्डजवळ.  दुपारी सव्वा वा. संजय जाधव यांचे निवासस्थान, न्यू बसस्टॅण्ड जवळ येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण, दुपारी ३ वा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा. सायं. ५ वा. सुभेदारी वि...

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हादौरा

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम  हे शुक्रवार दि.२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ६ वा.२५ मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी पावणे सात वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी १० वा. अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक- स्थळःशासकीय विश्रामगृह, दुपारी १ वा. औषधविक्री आस्थापनांच्या सुनावण्या- स्थळ शासकीय विश्राम गृह, दुपारी तीन वा. अन्न उत्पादक आस्थापनेस भेट, सायं ४ वा. औषध उत्पादक आस्थापनेस भेट. सायं. पावणे सहा वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.२४ रोजी सकाळी ८ वा. मोटारीने वाशिमकडे प्रयाण. ०००००

महाराष्ट्र ॲग्रीबिझीनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत आज शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींची राज्यस्तरीय कार्यशाळा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- शासनामार्फत आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यीत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रीबिझीनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत शुक्रवार दि.२३ रोजी शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वा. संत एकनाथ रंगमंदिर सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार हे राहणार आहेत. तर राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे , सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव   तथा मॅग्नेटचे अध्यक्ष राजेशकुमार, आशियाई विकास बॅंकेचे प्रोजेक्ट लीड क्रिशन रौतेला, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, पणन संचालक डॉ. केदारी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पाचा उद्देशः राज्यातील निवडक फळे व भाजीपाला पिकातील   मूल्यसाखळ्या विकसीत करुन   उत्पादकांना त्यांच्या शेतमाला...