एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : महाडीबीटी लाभार्थ्यांना पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत आहे. महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी पद्धतीने ३३६ लाभार्थ्यांची निवड झालीआहे, तरी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या कागदपत्रे अपलोड करावी , असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत १४ व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर ३३६ लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेडनेट/हरितगृह - २१ , कांदाचाळ – ९२ व प्लास्टिक मल्चिंग - १३० याप्रमाणे सोडतीमध्ये निवड झाली आहे. नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी , कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि पोर्टलवर कागदपत्रे तत्काळ अपलोड करून घ्यावीत. सर्वसाधारण , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर...