Posts

Showing posts from November, 2024

संविधान अमृत महोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान; अधिकारांसोबत कर्तव्यांबाबतही जागरुक रहावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- भारतीय संविधानास  ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या वर्षात ‘ घर घर संविधान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. आज यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन  करण्यात आले. प्रत्येक भारतीयाने संविधानाबाबत आदर बाळगावा व संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांबाबत जागरुक राहून कर्तव्य पालनही करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, डॉ. व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही अथक परिश्रम आणि सखोल अभ्यासाअंती तयार करण्यात आलेला एक दस्तऐवज आहे. या संविधानाद्वारे आप...

सोमवार (दि.२ डिसेंबर रोजी) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी    जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. डिसेंबर महिन्यासाठी   जिल्हास्तरीय लोकशाही दिन    सोमवार दि. २ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक    व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

पशुगणनेस प्रारंभ; २५६ प्रगणकांची नेमणूक

  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- २१ वा पशुगणना कार्यक्रम दि.२५नोव्हेंबर २०२४  ते २८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्याकडे पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले आहे.   पशुसंवर्धन विभागात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहिम राबवली जाते. मागील २० वी पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. पशुगणनेचा हा कालावधी चार महिन्यांचा असून ग्रामीण भागात तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची व शहरी भागात चार हजार कुटुंबामागे एक   असे जिल्ह्यात एकूण २५६ प्रगणकांची व ४९ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व प्रगणकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे लॉग इन आयडी पासवर्ड तयार करण्यात आले आहेत. पशुगणना ऑन लाईन मोबाईल ॲप द्वारे करण्यात येणार आहे.             या मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निध...

मतमोजणीसाठी निरीक्षक दाखल

  छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निरीक्षक दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त निवडणूक निरीक्षक व त्यांचे निवासाचे ठिकाण याप्रमाणे- १०४- सिल्लोड- बिद्यानंद सिंह. ॲनेक्स इमारत, सिंधफणा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. १०५- कन्नड- श्री. सुधाकर, ॲनेक्स इमारत, बिंदुसरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. १०६-फुलंब्री- विजेंद्र हुडा, अजंता इमारत, कक्ष क्रमांक १ अ, सुभेदारी विश्रामगृह. १०७-औरंगाबाद (मध्य)- तलत परवेज इक्बाल रोहिला, मुख्य इमारत, मांजरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. १०८-औरंगाबाद(पश्चिम)- श्रीमती कोर्रा लक्ष्मी, मुख्य इमारत, तेरणा कक्ष, सुभेदारी विश्राम गृह. १०९-औरंगाबाद(पूर्व)-अनिलकुमार यादव, ॲनेक्स इमारत, गिरजा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. ११०- पैठण- उज्ज्वलकुमार सिंग, ॲनेक्स इमारत, पेनगंगा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह. १११-गंगापूर- आतिषकुमार, अजंता इमारत, कक्ष क्रमांक ५ अ, सुभेदारी विश्रामगृह. ११२-वैजापूर- अभयकुमार पांडे, अजंता इमारत, कक्ष क्रम...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणीच्या तयारीची पाहणी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रावर निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी १०७-औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदार संघांच्या मतमोजणी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.             १०७-औरंगाबाद (मध्य) चे मतमोजणी केंद्र शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, १०८-औरंगाबाद(पश्चिम)चे मतमोजणी केंद्र शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर, तर १०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी केंद्राची रचना, तेथील सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष, टपाली मतांच्या मोजणीची व्यवस्था, स्ट्रॉंगरुम, मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रुम ते मतमोजणी कक्ष अशी केली ज...

मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.   विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे- १०४- सिल्लोड- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड ता. सिल्लोड. जि. छत्रपती संभाजीनगर. १०५- कन्नड- इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर. १०६-फुलंब्री- गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर. १०७-औरंगाबाद (मध्य)- शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. १०८-औरंगाबाद(पश्चिम)- शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर. १०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. ११०- पैठण- प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर. १११-गंगापूर- इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर. ११२-वैजापूर- टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, ...

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण : अचुक,पारदर्शक प्रक्रिया राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आज मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.             जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित या प्रशिक्षणात त्या त्या विधानसभा क्षेत्रात मतमोजणी कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदी सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, टपालीमतपत्रिका नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले की, मतमोजणी साठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदान यंत्रे स्ट्रॉंगरुम मधून बाहेर आणण्याआधी कुलूप सिल उघडतांना निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे.   य...

पत्रपरिषदः जिल्ह्यात सरासरी ६९.६४ टक्के मतदान; मतमोजणीसाठी सज्जता

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण ६९.६४ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.             आज आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.             मतदान प्रक्रिया आटोपून, सर्व मतदान यंत्रे इ. सहसाहित्य स्ट्रॉंग रुम मध्ये जमा करण्यात आले. हे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माध्यमांना माहिती देण्यात आली. जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय (सन २०२४ मध्ये) मतदान टक्केवारी याप्रमाणे- १०४- सिल्लोड-८०.०८ टक्के, १०५- कन्नड-६९.३१ टक्के, १०६- फुलंब्री-७२.२२ टक्के, १०७-औरंगाबाद मध्य-५९.३५ टक्के, १०८-औरंगाबाद पश्चिम-६०.५८ टक्के, १०९-औरंगाबाद पूर्व-६०.६३ टक्के, ११०-...

आरोग्य विभागातर्फे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा

  छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- कुटुंब नियोजन ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून (दि.२१)  ते बुधवार दि.४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी विषयी जनजागृती करणे, लोकांना पुरुष नसबंदीचे महत्व पटवुन देणे, स्त्रीयांप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी ही पुरुषांची सुद्धा आहे, या विषयी माहिती देऊन  समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.             हे अभियान दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दि.२१ ते दि.२७ नोव्हेंबर दरम्यान लाभार्थ्यांशी संपर्क साधणे. त्यांना पुरुष नसबंदीचे महत्व पटवून देणे व प्रवृत्त करणे, योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करणे.ज्यांनी यापुर्वी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.अशा लाभार्थ्यांमार्फत मोहीमेचा प्रचार व प्रसार करुन माहीती देण्यात येईल.             दुसऱ्या टप्प्यात दि.२८ नोव्हेंबर ते दि.४ डिसेंबर ‘सेवा आठवडा’ म्हणुन राबविण्यात ...

विद्यार्थ्यांच्या जातीप्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम

  छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गुरुवार दि.२८ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे,असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी कळविले आहे. या शिबिराचा लाभ खालील विद्यार्थी गट घेऊ शकता- १.       अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एसईबीसी यासारख्या राखीव प्रवर्गातील   सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी किंवा १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी.ज्यांना १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचे आहेत. २.       ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर एम.बी.ए., एम.सीए.ए., एल.एल.बी.(तीन वर्ष), बी.एड. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे. ३.       तंत्रनिकेत अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्...

मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.  मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. त्याअन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्तिंव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तिस प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास  प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००  

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

  छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि. २० रोजी मतदान होणार आहे.  मतदान निर्भय व निष्पक्ष होण्यासाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करुन खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात   मतदानासाठी नियुक्त कर्मचारी व मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात   मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, लाऊड स्पिकर, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट वापरणे. मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतदान केंद्रातील प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे. मतदान केंद्र परिसरात शस्त्र बाळगणे, परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त वाहनांचा वापर करणे, वाहनांद्वारे मतदारांची ने आण करणे (परवानगी दिली असल्यास ती वाहनाच्या दर्शनी भागात लावावी), निवडणूक प्रचार करणे, ज्वलनशील स्फोटक पदार्थ , हत्यारे बाळगणे इ. कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग झाल्यास भारती...

मतदान व मतमोजणीच्या दिवशीचे आठवडी बाजार बंद

  छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि.२० रोजी मतदान व दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.  याकालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान निर्भय निष्पक्ष व मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी  बुधवार दि.२० रोजी व शनिवार दि.२३ रोजी असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. या दिवशी भरणारे बाजार हे अन्य दिवशी भरवावे असेही आदेशात नमूद केले आहे. ०००००

मतदानासाठी व्हील चेअरची आवश्यकता असल्यास मागणी नोंदवा

  छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करिता बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ज्या दिव्यांग अथवा ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर व्हील चेअरची सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी www.eci.gov.in   या वेबसाईटवर जाऊन त्यावरील सक्षम या ॲपवर आपली मागणी नोंदवावी असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप भोगले यांनी केले आहे.   ०००००

मतदानाचा टक्का वाढणे लोकशाहीला पोषक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- मतदानाचे प्रमाण जितके अधिक तितके ते निकोप लोकशाहीसाठी पोषक असते तर कमी मतदान होणे हे लोकशाहीच्या निकोपतेला हानी पोहोचविते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण साऱ्यांनी मतदान करावे व इतरांनाही  मतदानाचे कर्तव्य बजावण्यास सांगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.             शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत महिला मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे   विभागप्रमुख डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. प्रभा खैरे, डॉ. मंगला बोरकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. वैशाली उणे,डॉ. विनोद मुंदडा, डॉ. बजाज, डॉ. भारत सोनवणे, प्रशासकीय अधिकारी डी.पी. गोधणे आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येकांनी त्याग,बलिदान केले. आपल्याला भारतीय राज्य घटनेने मतदानाचा अधिका...

मतमोजणी केंद्राचे ठिकाणांना निवडणूक आयोगाची मान्यता

  छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात करावयाच्या मतमोजणी केंद्रांचे प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठविण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी कळविले आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे- १०४- सिल्लोड- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड ता. सिल्लोड. जि. छत्रपती संभाजीनगर. १०५- कन्नड- इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर. १०६-फुलंब्री- गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर. १०७-औरंगाबाद (मध्य)- शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. १०८-औरंगाबाद(पश्चिम)- शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर. १०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. ११०- पैठण- प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजव...

अखेरच्या ७२ तासांत राबवावयाच्या कायदा सुव्यवस्था उपाययोजनांचा आढावा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- विधानसभा निवडणूक प्रचार कालावधी दि.१८ रोजी सायंकाळी ६ वा. संपणार आहे. त्यानंतर दि.२० रोजी मतदान होणार आहे. त्याआधी ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखून मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रमाणित कार्य उपाययोजनांचा आढावा आज घेण्यात आला.             जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात बैठक झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवडणूक निरीक्षक बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य),     श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर), निरीक्षक(पोलीस) राजपालसिंग (भा.पो. से.), निरीक्षक (खर्च) कोटापट्टी वाम्शी क्रिष्णा   व सोभान सुत्रधार , उपजिल्हा निवडणूक अधिकारी   देवेंद्र कटके तसेच केंद्रीय सुरक्षा बलाच्या तुकड्यांचे अधिकारी उपस्थित होते.  ...