Posts

Showing posts from May, 2026

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (National fertilizer sale framework) प्रकल्पांतर्गत IFMS व Agristack   प्रणालीचे संयुक्तीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे क्यू आर कोड द्वारे खत खरेदी करता येणार आहे. या खत वितरण प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी राज्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे,असे कृषी संचालक पुणे यांनी कळविले आहे.             यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, केंद्र शासनाने Fertilzer sale application system ( FSAS) हे मोबाईल ॲप तयार केले आहे.   या ॲपद्वारे QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी QR code द्वारे खत   बुक केल्या नंतर QR code तीन दिवस वैध राहणार असून शेतकरी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतात. यामुळे खताचे online booking केल्याने रांगेत उभे राहावे लागणार नाही. आवश्यक खताचे booking केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्या...

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

    छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३   प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उड्डाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.३० मे ते दि.२८ जुलै दरम्यान प्रतिबंध करण्यात येत आहे,असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहे. या देशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलन्म २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत; ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

    छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.२१, २२ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी दि.३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारीत निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. त्यासाठी पक्षकार, वकील ह्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/iqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकवर अर्ज भरता येणार आहे. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावरुनही अर्ज भरता येणार आहे. या लोकअदालतीत पक्षकारांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. दि.३१ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याती...

शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु

  छत्रपती संभाजीनगर , दि . २७ ( जिमाका )- अनुसूचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, आर्थिक मागास प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org   या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे. त्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि.१५ जुलै २०२६ ही मुदत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट १००० मुलांचे शासकीय वसतीगृह , किले अर्क, छत्रपती संभाजीनगर आणि विद्यार्थिनींनी आपले अर्ज गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह, पदमपुरा येथे सादर करावे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अर्ज मुलींचे शासकिय वसतिगृह(जुने), गारखेडा परिसर येथे जमा करावे. तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज तालुकास्तरावरील वसतीगृहात जमा करावे,असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे. ०००००

‘इंटर्नशिप’साठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर , दि . २७ ( जिमाका )- भारत सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक संस्थांमधून इंटर्नशिपद्वारे कामाची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. त्यासाठी युवकांनी  माय भारत या पोर्टलवर नाव नोंदवावे.   mybharat.gov.in    या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी श्रीमती मेघा सनवाल यांनी केले आहे. ०००००

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक : शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Image
  छत्रपती संभाजीनगर , दि . २७ ( जिमाका )- खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक कृषी निविष्ठा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. पेरणीच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या शेतकऱ्यांपर्यंत सुव्यवस्थित नियोजन करुन पोहोचवा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले. कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी निविष्ठा उत्पादक, विक्रेते, वितरक, वाहतुकदार आदी बैठकीस उपस्थित होते. खतांच्या मागणीसाठी पथदर्शी प्रकल्प सहसंचालक वानखेडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना खतांची मागणी मोबाईलवरुन नोंदवून घरपोच खते देण्याबाबत पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांनी आपले आयडी तयार करावे. आयएफएमएस असे या पोर्टल/ ॲपचे नाव असून याद्वारे शेतकरी मोबाईलद्वारे आपली मागणी नोंदवू शकतील,असे त्यांनी सांगितले. हा प्रथदर्शी प्रकल्प आपल्या जिल्ह्यात राबवावयाचा असून त्यासाठी निविष्ठा विक्...

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी कत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश

Image
  छत्रपती संभाजीनगर दि,२६ (जिमाका) प्राण्यांचे अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात चेकपोस्ट तयार करावेत ,या चेक पोस्टवर भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी दिले.   पोलीस विभाग, पशुसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, परिवहन, महसूल आणि महानगरपालिका विभागाच्या अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त कार्यवाही करावी, तसेच शासन मान्यताप्राप्त कत्तलखान्यामध्ये    अचानक भेट देऊन   तेथील कामकाज, स्वच्छता व इतर बाबी विषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती ’ च्या (SPCA) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस     मा.न्यायधीश( परिविक्षाधीन) गायत्री रांझे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम अतिरिक्त पोलिस आयुक्त, अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक, एस. व्ही शहाणे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार कुंथले, उप शिक्षणाधिकारी श्रीमती गीता तांदळे, डॉ .रमण इंगळे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अहेमद असरार,सहायक आयुक्त पशुसंवर्धन ,डॉ. शा...

जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांत सुधारणा; जिल्हा व राज्य समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम, २०२६ अधिसूचित केले असून राज्य व जिल्हास्तरीय जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन देखरेख समित्यांमध्ये आता आयुष विभागाच्या अधिकृत प्रतिनिधींचा समावेश करणे अनिवार्य करण्यात आले आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे. ‘आयुष’मध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या शाखांचा समावेश आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. ए. रघु यांच्या पत्राच्या संदर्भाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालक (तांत्रिक) डॉ. सुनीता गोरेईन यांनी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सुधारणेचा मुख्य उद्देश पारंपरिक औषधोपचार पद्धतींतील सर्व आयुष रुग्णालये, महाविद्यालये तसेच खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक शास्त्रोक्त, काटेकोर आणि सुस्थितीत करणे हा आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश झाल्यामुळे आयुष डॉक्टर व संस्थांच्या अडचणी आणि व्यवहारिक प्रश्न प्रश...

तंबाखू विरोधी दिनानिमित्त रविवारी (दि.३१) विविध कार्यक्रम

    छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- जागतिक तंबाखू विरोधी दिन रविवार दि.३१ मे रोजी नियोजीत आहे.यानिमित्त जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी कळविले आहे.यानिमित्त विविध जनजागृती उपक्रमांना   दि.१ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. तथापि, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती, विविध स्पर्धांमधून जनजागृती, ग्रामस्तरावर बैठकांमधून चर्चासत्रे, मौखीक आरोग्य तपासणी, जिल्ह्यातील सर्व कार्यालये तंबाखूमुक्त घोषीत करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि.३१ रोजी तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन या दिवसाची सांगता करण्यात येणार आहे. यासंदर्भात १८००११२३५६ या टोल फ्री क्रमांकवर अधिक माहिती व समुपदेशन उपलब्ध आहे,असे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. मुदखेडकर यांनी कळविले आहे. ०००००

निवडणूक आचारसंहिताःदि.१ जून रोजीचा लोकशाही दिन रद्द

    छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. दि.१ जून रोजी   जून महिन्याचा पहिला सोमवार येत आहे. तथापि, विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीची आदर्श आचार संहिता जारी असल्याने सोमवार दि.१ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही,असे उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे. ०००००

प्राचीन हस्तलिखिते, दस्तऐवजांची माहिती नोंदविण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- प्राचीन ज्यांचा कालावधी ७५ वर्षांपेक्षा अधिक जुना आहे अशा कालावधीतील हस्तलिखिते, पत्र, पोथ्या, दस्तऐवज आदींची माहिती डिजीटल स्वरुपात ज्ञानभारतम या पोर्टल किंवा ॲपवर नोंदवावी असे आवाहन धर्मादाय उपायुक्त यु.एस. पाटील यांनी केले आहे.सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे नोंदविण्यात आलेल्या सार्वजनिक न्यास तसेच इतर नागरिक यांच्याकडे अशाप्रकारे ७५ वर्षांपेक्षा अधिक जुने हस्तलिखिते, पत्र, पोथ्या आदी दस्तऐवज यांची डिजीटल स्वरुपात ज्ञानभारतम पोर्टल, ॲप वर नोंद करावी व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयास त्याची माहिती कळवावी,असे आवाहनही करण्यात आले आहे. ०००००

छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास बंदी; जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश.

  छत्रपती संभाजीनगर, दि,२६(जिमाका) - औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ ची आचारसंहिता लागू झाली असून, या काळात रहदारीस अडथळा ठरणारे किंवा अपघात घडू शकणारे राजकीय प्रचार साहित्य लावण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.   छत्रपती संभाजीनगरचे जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१) (घक) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.   हे आदेश दिनांक २५ मे २०२६ पासून ते २५ जून २०२६ पर्यंत (निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) लागू राहतील.   सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ते आणि त्यांच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाला, उमेदवाराला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावण्यास आणि घोषवाक्ये लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या प्रचार साहित्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आह...

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सुविधा बांधकामास राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची मंजुरी भाविकांना मिळणार विविध सुविधा

Image
  छत्रपती संभाजीनगर: दि,२६(जिमाका) प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील   श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सुविधा मध्ये वाढ करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील नियंत्रित क्षेत्रात (Regulated Area) भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या G+1 मजली भव्य बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA)अधिकृत मंजुरी दिली आहे. सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सक्षम प्राधिकारी कार्यालय (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांनी २५ मे २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत मंजुरी पत्र (Form IV) निर्गमित केले आहे. नवी दिल्ली येथे दि. २० मे २०२६ रोजी    झालेल्या राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या ५१९ व्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यांनी याबाबत सादरीकरण केले होते. यावेळी अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विनोद अग्रवाल, पुरातत्त्व सर्वेक्षण   विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, संचालक कर्नल एस. मारवाह, महासंचालक यदुवीर रावत, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, कार्यकारी अभियंता स्मिता प...

औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक; जिल्ह्यात मनाई आदेश जारी

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६,(जिमाका) औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक सुरळीत, निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी   जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी   छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ मे २०२६ ते २५ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता, जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात 'हे' नियम पाळावे लागणार असून निवडणुकीची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीला, तसेच मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधींना मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन किंवा वायरलेस सेट वापरण्यास आणि फोटो काढण्यास सक्त मनाई असेल.   बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी वगळून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगता येणार नाहीत. तसेच, केवळ परवानगी...

शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज वाटप करावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करावी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका) -खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पीक कर्ज शेतकऱ्यांना वेळेत वाटप करण्याची दक्षता सर्व बँक शाखानी   घ्यावी, शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणी साठी बँकांनी मदत करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले.   पिक विमा, आवास योजना,   गाय गोठा अनुदान , लाडकी बहीण या योजनेच्या   शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असे निर्देश जिल्ह्यातील सर्व बँक प्रतिनिधींना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समिती सदस्यांची बैठक   जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.   जिल्हा परिषदेच्या   अपर मुख्य कार्यकारी अधिकारी   वासुदेव सोळंके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, बँक ऑफ महाराष्ट्रचे उप अंचल प्रबंधक श्री जीवन पाटील,अमित मिश्रा आरबीआय मुंबई,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे समृत जाधव,   जिल्...

जलशक्ती अभियान पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोटक्षेत्रनिहाय विकास करावा, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम.जी. नांद्रे, सहा. पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर.डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ –मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ देता कामा नये. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे ...

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

    छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतिने मंगळवार दि.२६ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिल्लोड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मेटलमन ऑटो लि., यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा.लि., नहार ग्रुप इंडिया, व्हेरॉक इंजिनिअर लि. वाळूज, अशा चार आस्थापनांकडून १८६   रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींना पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या चार प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाचा ...