Posts

Showing posts from July, 2025

सहकार पुरस्कार प्रस्ताव दि.१८ पर्यंत मागविले

      छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका) –   सहकार विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थाना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील सहकार महर्षी पुरस्कार - १, सहकार भूषण - २१, सहकार निष्ठ -२३ अशा एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मराठवाडा विभागातील सर्व सहकारी सुतगिरणी, हातमाग-यंत्रमाग सहकारी संस्थांनी  आपले सहकार पुरस्कार प्रस्ताव संस्थेचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या संबंधित सहायक, उपनिबंधक यांचेकडे सोमवार दि.१८ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन  प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी केले आहे. ०००००

इमाव विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश वेळापत्रक

      छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका) -    इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रबाई फुले आधार योजनेसाठी   https://hmas.mahait.org   शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक निश्चित झाले आहेत. बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी, अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम ए एम एस सी असे पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- अर्ज करावयाचा कालावधी दि.१ ते १७ ऑगस्ट, अर्ज छाननी -   दि.१८ ते २१ ऑगस्ट, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम व प्रसिद्ध करणे दि.२२ ऑगस्ट, पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि.४ सप्टेंबर, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे दि.५ सप्टेंबर, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत दि.१५सप्टेंबर पर्यंत ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका)-   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी संगिता सानप तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. ०००००

जलपूजन करुन जायकवाडी धरणातून विसर्ग सुरु ; गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करू-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ (जिमाका) – गोदावरी खोरे हे सर्वात मोठे खोरे असून तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळूनहे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पैठण येथील जायकवाडी प्रकल्प येथे केले.   जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या   हस्ते जलपूजन करुन विसर्ग सुरु करण्यात आला. नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.   कार्यक्रमास आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. हिकमतदादा उडान,आ. विठ्ठलराव लंघे, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक,मुख्य अभियंता राजीव मुंदडा, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार,शाखा ...

‘दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’ जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

Image
      छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   शिक्षकांनो जिल्ह्यातील दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे. त्यांना जगायचे कसे, संकटांना सामोरे कसे जायचे हे शिकवा.  संस्कारक्षम विद्यार्थी घडवा.  असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेत केले.      कन्नड   येथे आज   महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, शिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती चव्हाण, विस्तार अधिकारी जे व्ही चौरे, गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर यावेळी उपस्थित होते. नाचनवेल केंद्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे औक्षण करून स्वागत केले. दीपप्रज्वलनानंतर शिवराय केंद्र हतनूर येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केले. तर गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, विस्तार अधिकारी लईक सोफी यांनीही यावेळी उपस्थित शिक्षिकांशी संवाद साधला. कार्यक्रमास तालुक्...

उद्या (दि.१ ऑगस्ट)पासून ‘महसूल सप्ताह’

  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका) -   राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच महसूल विषयक जनजागृती करणे,असा आहे. यानिमित्त दि.१ ते ७ दरम्यान आयोजीत कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समांरभ होणार आहे. शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबाना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम रविवार दि.३ ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करनु त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व ...

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविले

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) - अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेची सविस्तर माहिती व जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३चर्च पथ, पुणे – ०१ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण आर. एम. शिंदे यांनी केले आहे. ०००००

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 'रेड रन' स्पर्धा

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका) -   महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवक व युवतीसाठी रेड रन स्पर्धा (दि.२९) घेण्यात आली.     मंगळवारी सकाळी ७ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापीठ गेट येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.एम. मुदखेडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज चौक येथुन परत याच मार्गाने क्रीडा विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, येथे समारोप करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकूमार रामटेके, कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉ.सोनाली क्षिरसागर, क्रीडा संचालक सरस्वती भूवन डॉ.दयानंद कांबळे, प्रशिक्षक क्रीडा विभाग सुरेंद्र मोदी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पवार उपस्थित होते. रेड रन स्पर्धेत सहभागी युवक - युवती   मधुन...

जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार ००००० बिडकीन येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी पुढाकार

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)-   बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर  मोटर्स प्रा. लि.यांच्यात आज सामंजस्य करार झाला. टोयटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करुन जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाटकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डॉ. आर.डी. कांबळे, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, संगिता राठोड, टोयटा क...

जिल्ह्यात प्रगत टपाल तंत्रज्ञान (IT 2.0) प्रणाली ४ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार; देखभाल, दुरुस्तीसाठी २ ऑगस्ट रोजी सेवा स्थगित

  छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)-   भारतीय टपाल विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये सोमवार दि.४ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केले जाणार असल्याने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कोणत्याही डाक कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ग्राहकांनी  दि.२ ऑगस्ट रोजी  असलेल्या सेवा बंद बाबत सहकार्य करावे व आपल्या टपाल व्यवहारांचे नियोजन करावे. प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली (IT 2.0) संदर्भात माहिती देण्यात आली की, या प्रणालीचा उद्देश ग्राहकांना अधिक जलद, सुलभ व कार्यक्षम सेवा पुरविणे असून, ही प्रणाली भविष्यातील गरजांनुसार डिजिटली सक्षम व स्मार्ट सेवा देईल. ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून ही प्रणाली विकसि...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)-   आगामी सणांच्या पार्श्वभुमिवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी    प्रवीण फुलारी यांनी हे आदेश निर्गमित केले असून    दि. १२ ऑगस्ट पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महसूल सप्ताहानिमित्त बुधवार दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान भरगच्च कार्यक्रम

Image
छत्रपती संभाजीनगर,दि.२८(जिमाका)-   महसूल दिन शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी आहे. यानिमित्त जिल्ह्यात बुधवार दि.३० जुलै ते बुधवार दि.६ ऑगस्ट या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यात विविध लोकाभिमुख  उपक्रम राबवून नागरिकांना सेवा देण्यात येणार आहेत. याउपक्रमात महसूल विभागाच्या गाव ते जिल्हा पातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. महसुल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी जिल्ह्यात यावर्षी दि.३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीद्वारे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीम...

प्रत्येक तालुक्यात दि.१५ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार विवाहपूर्व संवाद केंद्र

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८ (जिमाका)- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आले आहे. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात असे केंद्र स्थापन करावयाचे आहे. त्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षक, तालुका महिला बालविकास अधिकारी, संरक्षण अधिकारी आदींची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक तालुक्यात हे केंद्र कार्यान्वित करावे. त्यासाठी संवाद केंद्रात संवाद साधणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नावे निश्चित झाले की त्यांना राष्ट्रीय महिला आयोगामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर हे कर्मचारी प्रत्यक्ष संवाद साधू शकतील. त्यासाठी कर्मचारी निवड, प्रशिक्षण आदी प्रक्रिया पूर्ण करुन येत्या १५ ऑगस्ट रोजी हे केंद्र प्रत्येक तालुक्यात कार्यान्वित व्हावे. विवाहपूर्व वाग्द...

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२८(जिमाका)-   जिल्ह्यातील पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्याबाबत शासननिर्णयात निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार स्वःताची ओळख उघड करु इच्छिणाऱ्या व नोंदीत असलेल्या ७८४ पारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्र देण्यासाठी सोमवार दि.४ ते शुक्रवार दि.८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करुन सगळ्यांना ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.   सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर तसेच सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी शासकीय वसतीगृह, घर घर संविधान अभियान, ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा आढावा घेतला. तृतीय पंथी अर्थात पारलिंगी व्यक्तिंसंदर्भात तक्रारनिवारण समितीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.१३ डिसेंबर २०१८ च्या शासननिर्णयानुसार तृतीयपंथ व्यक्तिंना ओळखपत्र...

सहकारी संस्थांना पुरस्कार; दि.३१ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८ (जिमाका)- राज्य शासनाकडून सहकारी संस्थाकरीता सहकार पुरस्कार   २०२३-२४ देण्यात येणार असून त्यासाठी दि.१८ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. आता ही मुदत दि.३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील संस्थांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे. सन २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रामार्फत ‘आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्य हे सहकारचे एक प्रमुख अंग व स्त्रोत आहे. राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने दिला आहे.   पुरस्काराचे स्वरुप सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ या गटांत एकूण ४५ संस्थाची निवड हणार असून सहकार महर्षी पुरस्कार – १, सहकार भूषण – २१, तसेच सहकार निष्ठ – २३ असे एकूण ४५   संस्थाना पुरस्कार देण्यात येणार असून, अनुक्रमे १ लाख रुपये, ५१ हजार रुपये,२५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या सर्...

सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांना कायमस्वरूपी नोंदणी करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (जिमाका) – सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गा उत्सव साजरे करणाऱ्या सर्व मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत कलम 41(क) नुसार दरवर्षी वर्गणी संकलनासाठी परवानगी घेण्याऐवजी कायमस्वरूपी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त रा.स. पावसकर यांनी केले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने मंडळांकडून वर्गणी संकलनासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येतो. मात्र, जर मंडळांनी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी केली असेल, तर त्यांना वारंवार परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.तरी सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त यांनी केले आहे. 00000

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक - पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले.

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका) -   सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा 2003 (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण) यानुसार कायद्याचे उल्लंघन होणाऱ्या ठिकाणी तसेच धुम्रपान तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री ई   सीगारचा वापर करू नये, यासाठी तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सनियंतत्रण समितीची त्रिमासिक आढावा बैठक पोलीस उपायुक्त कार्यालयात घेण्यात आली.                        या बैठकीस डॉ. जितेंद्र डोंगरे, आरोग्य विभाग, डॉ .वरद शिंदे, महानगर पालिका आरोग्य विभाग डॉ लक्ष्मी पीसरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, ग्रामीण विभागाचे पोलिस निरीक्षक श्री. शिंदे, डॉ.जावेद कुरेशी, जिल्हा सल्लागार समिती सदस्य म्हळगे बैठकीस उपस्थित होते. तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या व्यसनाधीन तेच प्रमाण वाढले असून ते नियंत्रणात...