Posts

Showing posts from October, 2023

आज व उद्या मद्यविक्री बंद

  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)-   जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  दि.३१ ऑक्टोंबर व दि.१ नोव्हेंबर असे सलग दोन दिवस  जिल्ह्यात  मद्य व बियर विक्रीचे किरकोळ अनुज्ञप्ती  विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सोमवारी (दि.६ नोव्हें.) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)-   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात येत्या सोमवारी म्हणजेच दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा.  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले अर्ज दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे.  तक्रार अर्ज दाखल करतांना अर्ज हा विहीत नमुन्यात असावा. तकार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाची पोहच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनात  न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व, अपिल, सेवा विषयक बाबी, लोकशाही दिनात यापूर्वी केलेले अर्ज हे स्विकारले जाणार नाहीत. तरी नागरिकांनी आपले तक्रारी अर्ज स्वतः उपस्थित राहून दाखल करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे थेट रोख लाभासाठी ७ नोव्हेंबर रोजी स्वस्त धान्य दुकानात शिबिर

  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)-   जिल्ह्यातील एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी प्रत्‍येक तालुक्‍यातील रास्‍त भाव दुकानाचे ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे, या शिबिरास शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा अधिनियम , २०१३ अंतर्गत समाविष्‍ट न झालेल्‍या एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्‍यांना जानेवारी २०२३ पासुन अन्‍नधान्‍याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रोख रक्‍कम (Direct Benefit Transfer-DBT) थेट खात्यात हस्तांतरीत केली जाते.त्‍याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी प्रत्‍येक तालुक्‍यातील रास्‍त भाव दुकानाचे ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी संबंधित एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरीऱ्यांनी विहित नमुन्यात आपले अर्ज करावे. कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे आधार कार्ड,कुटुंबातील महिला सदस्‍याचे बॅंक खाते असलेल्‍या पास...

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)-   देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही देण्यात आली. ०००००

सोमवारी (दि.६ नोव्हें.) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)-   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात येत्या सोमवारी म्हणजेच दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा.  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले अर्ज दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे.  तक्रार अर्ज दाखल करतांना अर्ज हा विहीत नमुन्यात असावा. तकार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या अर्जाची पोहच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनात  न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व, अपिल, सेवा विषयक बाबी, लोकशाही दिनात यापूर्वी केलेले अर्ज हे स्विकारले जाणार नाहीत. तरी नागरिकांनी आपले तक्रारी अर्ज स्वतः उपस्थित राहून दाखल करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. ०००००

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान , कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी   अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात . त्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सन -2023-24 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडुन विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत . त्यासंदर्भातील नियम , अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे . इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा . सन 2023-24 साठीच्या समान निधी योजना पुढील प्रमाणे आहेत .(Matching Schemes) 1) इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य य...

साखरेचा साठा घोषित करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, चेन किरकोळ विक्रेते, साखर प्रक्रिया करणारे इ. साठा आपल्याकडील साखर साठा घोषित करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे की, सर्व संबंधित साखर व्यापाऱ्यांनी  त्यांच्याकडील साखरेचा साठा https://esugar.nic.in   या संकेतस्थळावर नोंदवावा. तसेच दर सोमवारी साखर साठा अद्यावत करावा,असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी कळविले आहे.

शासनाची आरोग्य विषयक माहिती आता समाज माध्यमांवर

  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे यांनी आरोग्य विषयक माहिती युट्युब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या माहितीचा जनतेने लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे. आपले कुटूंब, समाज यांचे आरोग्य स्वस्थ रहावे म्हणून जनतेस विविध आजार, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय,   आरोग्याच्या विविध योजना, मोहिमा यांची अधिकृत माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क कार्यालय, पुणे यांच्यावतीने समाजमाध्यमांवर देण्यात आली आहे. या समाजमाध्यमांवर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी डॉ. शकील अहेमद यांनी केले आहे. https://youtube.com/@MahaHealthIEC https://twitter.com/MahaHealthIEC?t=Wtvk6EFx5ufAmgETsSBgQ&s=09 https://instagram.com/mahahealthiec?igshid=YmMyMTA2M2Y= https://www.faceboo.com/MahaArogyaIECBureau?mibextid=ZbWKwl ०००००

ग्रामपंचायत निवडणूकः कामगारांना मतदानासाठी तीन तासांची सवलत

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर २८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीकरीता  रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक क्षेत्रात कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना तीन तासांची सवलत देण्यात यावी,असे निर्देश कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी दिले आहेत. रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायं.साडेपाच यावेळात मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तीन तासाची सवलत द्यावी.  ही सवलत खाजगी कंपन्या, आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर इ. ना लागू राहतील,असेही कळविण्यात आले आहे. ०००००

समृद्धी महामार्गःजालना ते छत्रपती संभाजीनगर उच्चदाब वाहिनीचे काम; पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)-   हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर व गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तिनही  दिवस दुपारी १२ ते साडे तीन यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर, गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तीन दिवस दुपारी १२ ते साडेतीन यावेळात होणार आहे.     हे तीनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी १२ ते साडेतीन)   ज...

चिकलठाणा ते करमाड दरम्यान रेल्वे गेट दुरुस्ती कामासाठी वाहतूक मार्गात बदल

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):-   चिकलठाणा ते करमाड दरम्यान असलेले रेल्वे लेव्हल क्राँसिग गेट क्र.५७ चे दुरस्तीचे काम करण्याकरीता दि.२ नोव्हेंबर २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. पर्यायी मार्ग याप्रमाणे- चिकलठाणा ते बीड बायपास रोड   बीड कडे जाण्याचा     तात्पुरता वाहतुक बदल मार्ग बीडनाका झाल्टा फाटा ते कँब्रीज मार्ग वाहने जातील व येतील चिकलठाणा ते बीड बायपास रोड शहराकडे येण्याचा तात्पुरता वाहतूक बदल मार्ग बीड नाका, ते बीड बायपास मार्ग वाहने पुढे रेल्वेस्थानकाकडे जातील व येतील. 000000  

शासकीय निवासी शाळांच्या विभागीय फुटबॉल स्पर्धा सोमवारी

  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- छत्रपती संभाजीनगर विभागातील ११ शासकीय निवासी शाळांमध्ये मुलां-मुलींचे फुटबॉल सामने सोमवार दि.३० रोजी विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर  येथे आयोजित करण्यात आल्या आहेत,  अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांतील १७ वर्ष वयोगटाखालील जिल्हास्तरावर विजयी संघ या विभागीय स्पर्धेत सहभागी होतील. त्यातून दोन विजयी संघांची निवड करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील.या स्पर्धांना क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे. ०००००

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम :नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. मतदार यादी प्रकाशनानंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण , शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त पत्रकारांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे...