Posts

Showing posts from April, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण व मानवंदना

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत होऊन मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा : लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करु या- विभागीय आयुक्त मधुकर अर्दड

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान करुन आपण आपली लोकशाही अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले.             महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते.             विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. नंतर शानदार संचलन होऊन मानवंदना देण्यात आली.           ...

उमेदवारांच्या खर्च नोंदवहीच्या तपासणीचे वेळापत्रक

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत प्रचाराच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची किमान तीन वेळा तपासणी केली जाते. भारत निवडणूक आयोगाने नेमलेले खर्च निरीक्षक ही पडताळणी करतील. १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठीचे वेळापत्रक खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी दिले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार, शुक्रवार दि.३ मे, मंगळवार दि.७ मे व शनिवार दि.११ मे असे तीन दिवस सकाळी १० वाजेपासून समिती सभागृह, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ही तपासणी होणार आहे. खर्च तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांचे खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे. सोबत येतांना खर्चाची नोंदवही ( पांधरा, लाल, पिवळा या तीन रंगांचे पृष्ठ असलेली) नमुना १४, खर्चाची मुळ प्रमाणके, निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी बॅंकेत उघडलेले स्वतंत्र बॅंक खात्याच्या पासबुकची प्रत व मागील दिवसापर्यंतचे बॅंक स्टेटमेंट, विविध परवानगीची पत्रे, अन्य कागदपत्रे (असल्यास) सोबत घेऊन यावी,असे आवाहन नोडल अधिकारी खर्च जिल्हा कक्ष शेखर कुलकर्णी यांनी केले आहे. ०००००

महिला मतदार;मतदान करणार : परिपूर्ण लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका):- परिपूर्ण लोकशाहीसाठी त्यात महिलांचा सहभाग आवश्य आहे. महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना आपल्या कुटूंबातील आपल्या परिसरातील लोकांनाही मतदान करण्यास प्रेरित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.             १०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मेळावा आज सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता.   सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, तहसिलदार रमेश मुनलोड, माविम प्रकल्प संचालक चंदनसिंग राठोड, गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे आदी मान्यवर उपस्थित होते.              जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राच्या विकासात महिलांचा सहभाग कितपत आहे यावर अवलंबून आहे. महिलांना अबला समजू नये,त्या सबला आहेत. बुद्धी, शक्ती,आर्थिक ...

१९- औरंगाबाद लोकसभा पूर्वपीठीकेचे प्रकाशन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या पूर्वपीठीकेचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी तथाजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन सभागृहात हे प्रकाशन करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी  देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,  पत्रकार दत्ता कानवटे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास आदी यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीतील १९७७ ते २०१९ पर्यंतचे उमेदवारनिहाय मिळालेले मतदान, निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूज, सोशल मिडीया, माध्यमांसाठीची आचारसंहिता, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदारांना उपयोगी पडणाऱ्या ॲप ची माहिती देण्यात आली आहे.

मनाई आदेश लागू

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दि.१५ मे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू  करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. त्याअन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणे, पाच किंवा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पूर्वपरवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक ग्रामिण यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील,असेही अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी स्पष्ट केले आहे. ०००००  

जालना लोकसभा निरीक्षकांनी घेतला आढावा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- १८ जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय जालना लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक राजेशकुमार यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री व सिल्लोड हे विधानसभाक्षेत्र १८ जालना या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. या क्षेत्रातील निवडणूक तयारीचा आढावा आज निरीक्षक राजेशकुमार यांनी घेतला.             जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अपर जिल्हाधिकारी जालना श्रीमती मैत्रेयवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, पैठण, फुलंब्री व सिल्लोड येथील सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.             विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र, त्यांची तपासणी, त्य...

सूक्ष्म निरीक्षकांनी गृह मतदान आणि मतदान केंद्रावरील मतदानाची सुयोग्य नियोजन करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- सूक्ष्म निरीक्षकांनी टपाली मतदान प्रक्रिया ही   निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे पूर्ण करून अहवाल सादर करावे, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर   सूक्ष्म निरीक्षकाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रमात दिले.             जिल्हा नियोजन समिती सभागृहांमध्ये सूक्ष्मनिरीक्षक व टपाली मतदानातील सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास   निवडणूक निरीक्षक (सामान्य) कांतीलाल दांडे, निवडणूक निरीक्षक (पोलीस)   राजशेखर एन., उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, टपाली मतदान नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील,   जिल्ह्यातील सर्व सुक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्र अधिकारी,या प्रशिक्षणास उपस्थित होते. सूक्ष्म निरीक्षकाबरोबरच मतदान केंद्र अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व सूक्ष्म निरी...

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक:पेरण्या सुरु होण्याआधी पीक कर्ज, बियाणे,खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ; ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- खरीपाच्या पेरण्या सुरु होण्याआधी शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे व खतांचा पुरवठा झाला पाहिजे या पद्धतीने सर्व नियोजन करावे.शेतकऱ्यांना पिक विमा साक्षर केले पाहिजे तसेच वेळेत पीक कर्ज उपलब्धता करण्यासाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहिम राबवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले.             जिल्ह्यात ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीसाठी नियोजन आज सादर करण्यात आले. त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच ३ लाख ९५ हजार ५५ हेक्टरवर कापूस तर १ लाख ७२ हजार १५३ हेक्टर क्षेत्रावर मका या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे, खते, किटकनाशके यांच्या उपलब्धताही पुरेशी असल्याचे नियोजन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सादर केले.             जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम २०२४ पूर्व आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधि...

सतर्कतेने करावे चारा वितरणाचे नियोजन- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ११.८७ लाख मे.टन चाऱ्याची उपलब्धता; पशुसंवर्धन विभागाची माहिती

  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- दुष्काळाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता पुरेशी आहे. पुरवठ्याच्या दृष्टिने जिल्ह्यात चारा वितरणाचा भौगोलिक समतोल साधला जाईल असे नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व भागात पशुपालकांना आपल्या पशुंसाठी चारा सहज उपलब्ध होईल असे नियोजन सतर्कतेने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.             जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दुष्काळी परिस्थितीतील चारा उपलब्धता व नियोजन याबाबत आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत चारा टंचाई वर मात करण्यासाठी तालुकानिहाय सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून सद्यस्थितीत ११. ८७ लाख मे.टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे व तो आगामी तीन ते चार महिने पुरेल,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ६ लाख ३३ हजार २ इतके पशुधन असून त्यात लहान जनावरे १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२आ...