Posts

Showing posts from December, 2024

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमानिमित्त ग्रंथप्रदर्शन

Image
       छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम दि. ०१ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या वाचन पंधरवडा निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात विविध उपक्रमांचे (ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन इत्यादी) यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद Ë Ë घा Ë टन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे, ज्ञानेश्वर पैठणे, तांत्रिक सहाय्यक दिपक काळे, सुधाकर गायधनी, अनिल बाविस्कर, संजीव ठाकुर, श्रीमती नाटकर इ. सह परीसरातील वाचक व नागरीक उपस्थित होते. शहर व जिल्हयातील नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच जिल्हा ग्रंथालयाचे सभासदत्व देणे सुरु असून, विदयार्थी, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्...

‘अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):- महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’) पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी एक उमेदवार याप्रमाणे आयात निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवार दि.३ जानेवारी २०२५  रोजी करण्यात येत आहे.             तालुका निहाय व्यक्ती यांना आयात निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे ह्या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कसा भरावा, बाजारपेठ पाहणी, व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजार सर्वेक्षण साधने आणि तंत्र, प्रकल्प अहवाल, युनिट चे व्यवस्थापन, यशस्वी उद्योजका बरोबर संवाद, उद्योगांला भेट तसेच आयात-निर्यात करताना येणाऱ्या समस्याचे निराकरण, भारताचे परकीय धोरण, व्यापाराची तंत्रे, विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी, आयात निर्यात प्रक्रिया काय आहे यासंबंधी तज्ञ व्याख्यात्या कडून मार्गदर्शन केले जाणार आहे.      ...

जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी केली.                उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार सारंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे व कनिष्ठ अभियंता तुषार विसपुते तसेच पैठण उद्यान विकास समितीचे विजय सुते, रमेश लिंबोरे, बाळु आहेर, संतोष गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.             पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास व सुशोभिकरणाचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पर्यटकांना खुले करण्याच्या दृष्टिने कामाची प्रगती पाहण्यासाठी आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज उद्यानास भेट दिली. सुरु असलेले कामकाज तसेच या कामासंदर्भात प्रस्तावित आराखड्यातील तरतूदी याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. येथे आल्यानंतर पर्यटकांना आल्हाददायक वाटायला हवे,असेही त्यांनी सांगितले. ०००००

प्रत्येकाच्या स्मृतीकोषात शिक्षकाचे स्थान अढळ- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):- प्रत्येकाचे शिक्षक आणि त्यांच्या स्मृती ह्या बालमनावर कायमच्या कोरल्या जातात. प्रत्येक व्यक्तिच्या स्मृतीकोषात शिक्षकांचे स्थान नेहमी अढळ असते, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांची महती सांगितली. त्यामुळे शिक्षकांनी अधिक सजगतेने भावी नागरिक घडविण्याचे आपल्यावर सोपवलेले कर्तव्य पार पाडावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज पैठण येथे केले.             पैठणच्या सेंट पॉल हायस्कूल येथील सभागृहात आज ‘दशसूत्री ’ अंमलबजावणीसाठी पैठण तालुक्यातील जि.प. शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली.             उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य.) आश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सान्वी देशमुख, तहसिलदार सारंग चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.           ...

सोमवारी (दि.६ जानेवारी रोजी) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी    जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. जानेवारी  महिन्यासाठी   सोमवार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन    आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. ६ रोजी दुपारी १२ वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक    व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००  

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत यासंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी पाहणी करावी व तसा अहवाल दरमहा सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक प्र.वि. सुरसे, उपसंचालक धिऱा. खिरोडकर, सहा. संचालक श्रीमती गायकवाड, ग.बा. पाचवणे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत राऊत यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र कारखाने नियम व महाराष्ट्र कारखाने नियम २००३ अन्वये कारखान्यांचे कामकाज व कामगारांची सुरक्षा याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आवश्यक तपासण्या व कारवाई बाबत माहिती देण्यात आली. धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असून कामगार व औद्योगिक सुरक्षा अधि...

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे,असे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे.  हा निकाल परिक्षार्थ्यांना    https://gdcamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर  आपापला लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल.  तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए मंडळ येथे पहावयास मिळतील.  फेरगुण मोजणीसाठी परिक्षार्थ्यांना   दि.५ जानेवारी २०२५ पर्यंत https://sahakarayukta.maharashtra.gov.in यावेबसाईटवर आपला लॉगइन व पासवर्ड वापरुन अर्ज करता येईल.  फेरगुण मोजणीचे शुल्क भारतीय स्टेत बॅंकेच्या कोणत्याही शाखेत  प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ७५ रुपये या प्रमाणे व अधिक बॅंक चार्जेस  या प्रमाणे चलनाद्वारे भरावे. बॅंकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मदत दि.५ जानेवारी २०२५ च्या रात्री साडेदहा (२२.३०) पर्यंत रा...

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत येत्या १०० दिवस कालावधीत इ.११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना जात वैधता प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयातच देण्यात येणार आहे,असे उपायुक्त तथा सद्सय जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर डॉ. दीपक खरात यांनी कळविले आहे. इयत्ता ११वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एएसईबीसी(मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.  त्या करीता सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपले अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने  भरुन  अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी. संबंधित महाविद्यालयांनी हे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे. समिती शिबिरे...

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुन अहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोनही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी व अहवाल सादर करावा. पहिल्या टप्प्यात मार्च मध्ये पाणीपुरवठा  सुरु होईल असे नियोजन करावे,असे निर्देश इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत आज बैठक पार पडली. राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नविनीकरण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान पाटील भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजिप्राच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, मनोज पाठक मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अनिकेत कुलकर्णी, जेव्हीपीआर कंपनीचे जी.मेहंदर, खलील अहमद, राष्ट्रीय महामार...

जिल्हा विद्युत सल्लागार समिती बैठक : विद्युत वितरण बळकटीकरणाला वेग द्यावा- खा.भुमरे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- जिल्ह्यात ग्रामिण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या वीज वितरणाच्या बळकटीकरणाला वेग द्यावा,असे निर्देश खासदार संदिपान भुमरे यांनी आज दिले. जिल्हा विद्युत सल्लागार समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, वीणा सावंत, कार्यकारी अभियंता रमेश वाकचौरे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते. बैठकीत महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल अंतर्गत जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामिण, छत्रपती संभाजीनगर शहर भागातील विद्युत वितरण प्रणालीबाबत चर्चा करण्यात आली. सुधारीत वितरण क्षेत्र पणाली व विद्युत वाहिनी विलगीकरण याबाबत माहितीचे साद...

डॉ.पंजाबराव देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- देशाचे प्रथम कृषी मंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवाद करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ०००००

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक: जलजिवन मिशन कामांचा स्वतंत्र समितीमार्फत आढावा; येत्या १० जानेवारीला प्रत्यक्ष गावात पाहणी- खा.भुमरे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करावी. तसेच या समितीने येत्या १० जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यस्थिती पहावी,असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व यंत्रणा...

ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई

  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी  पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना  भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये  मनाई करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी निर्गमित केला आहे. हे आदेश दि.३१ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत लागू राहतील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने कर ण्यात येणाऱ्या कारवाई यास अपवाद असेल.या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

मधमाशी पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी 'मधुक्रांती'हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर मधमाशी पालकांनी नोंदणी करावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ , पुणे यांनी केले आहे. मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ , पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत   लघु अभियान I, लघु अभियान II   व   लघु अभियान III समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राब...

स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकतधारकांना आज (दि.२७) सनद वाटप; पंतप्रधान साधणार ऑनलाईन संवाद

  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):-   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि.२७ रोजी देशातील स्वामित्व मिळकतधारकांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार असून यानिमित्त जिल्हास्तरावर इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सक्ळी ११ वा. नियोजन सभागृहात सनद वाटप होणार आहे. जिल्ह्यात स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत ७३२ गावांच्या १ लाख १७ हजार ६६९ मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत,अशी माहिती जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख विजय वीर यांनी दिली आहे. ०००००

दिशा समितीची आज(दि.२७)बैठक

  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):-   जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक शुक्रवार दि.२७ रोजी सस्काळी ११ वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. सह अध्यक्ष खा.डॉ. कल्याण काळे हे ही बैठकीस उपस्थित राहणार आहेत.केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. ०००००

‘वाल्मी’ला गतवैभव प्राप्त करुन देणार -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतली आढावा बैठक

Image
छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):-   जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) ला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सुविधा विकास, पदभरती, विस्तार कामांसाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी व पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावू,असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज वाल्मी येथील आढावा बैठकीत केले. वाल्मी येथे संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली.संस्थेचे महासंचालक वि.बा. नाथ, जलसंधारण विभागाचे अवर सचिव नितीन दुसाने, डॉ. राजेश पुराणिक, डॉ. गारुडकर, डॉ. दुरबुडे, डॉ. बोडखे, डॉ. राठोड तसेच सर्व प्रमुख प्राध्यापक आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी वाल्मी संस्थेच्या सदस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. वाल्मीने केलेल्या कामगिरीबाबत तसेच वाल्मीच्या आगामी काळात राबवावयाच्या उपाययोजना, सुविधा विस्तार विकास इ.बाबत माहिती सादर करण्यात आली. संस्थेतील पदांच्या अनुशेषाबाबत व नव्याने करावयाच्या पदभरतीबाबत माहिती देण्यात आली. वाल्मितील सुविधांच्या विकासासाठी व नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी एकूण ५४६ कोटी रुपय...