टॅंकरमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘जलसमृद्ध गाव अभियान’ ; जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका):- जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान दि.५ जून पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यंदा टंचाईत ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला अशा गावांमध्ये विहीर, बोअरवेल जल पुनर्भरण तसेच छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून संरक्षित करणे ह्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.पर्यावरण दिन ५ जून पासून ह्या अभियानाला सुरुवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप कार्यकारी अभियंता एम.एम. ख...