छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोमवार दि. २३ रोजी दुपारी १२ वा. संत एकनाथ रंगमंदिर, नविन उस्मानपुरा, पन्नालाल नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, अल्पसंख्याक विकास, औकाफ, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे राहणार आहेत. गृहनिर्माण , इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता अंबादास दानवे यांची उपस्थिती राहणार असून राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ.सतिष चव्हाण, आ.विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपूत आदी उपस्थित राह...