Posts

शाळा परिसर तंबाखूमुक्त करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि. ८ (जिमाका) -जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करा.तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय   गौडा जी.सी. यांनी आज   दिल्या. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी छाया आवरगावकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे आकाश तळवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे डी. व्ही. पाटील, कामगार अधिकारी अक्षय ठोकळ यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलीस व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस असलेल्या प्रतिबंधाची प्रभावी अंमलब...

कुणबी नोंदींची उपलब्धता जिल्ह्याच्या संकेतस्थळावर; मंडळस्तरावर शिबिरे आयोजीत करुनही देणार माहीती प्रत्येक ग्रामपंचायतीवर याद्या प्रदर्शित करा- डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- जिल्ह्यात आढळलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदींची माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन करुनही ही माहिती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली आहे.             दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर त्या त्या गावातील याद्या प्रदर्शित कराव्या असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे दिले आहेत.             मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा जात नोंदींची माहिती जुन्या दस्तऐवजांवरुन सापडल्या आहेत. त्यांची संख्या जिल्ह्यात ५११३ आहे. तालुकानिहा या नोंदी याप्रमाणे, सोयगाव ३१, पैठण-१८४, वैजापूर-६८७, सिल्लोड- ३५७, गंगापुर-७६१, खुलताबाद-३४१,   फुलंब्री-२६१, छत्रपती संभाजीनगर-१०३९ व कन्नड-१४५२ इतक्या आहेत. या सर्व नोंदी व त...

पैठण तालुक्यात शासकीय वाळूडेपोतील वाळूसाठ्याचा ई-लिलाव

  छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- पैठण तालुक्यातील मौजे ब्रम्हगाव (चतुर्थ फेरी) व मौजे हिरडपुरी (प्रथम फेरी) येथील शासकीय वाळू डेपोमधील शिल्लक वाळूसाठ्याची ई-निविदा व ई-ऑक्शन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली आहे.             लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी दि. ८ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करता येईल.   ऑनलाइन ई-अक्शन प्रक्रिया दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. लिलावाच्या सविस्तर अटी व शर्ती, हातची किंमत तसेच अन्य माहिती http://mahatenders.gov.in व https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री व तहसील कार्यालय, पैठण येथे उपलब्ध आहे,असेही कळविण्यात आले आहे. 00000

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका) - राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी विजय राऊत यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांची चौकशी करा- खा. संदिपान भुमरे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका) - प्रत्येक घरी पाणीपुरवठा करणाऱ्या ‘जलजीवन मिशन ’ या योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा अपूर्ण कामांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा,असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.             जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. संदिपान भुमरे हे होते. तर सह अध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विधान परिषद सदस्य सुहास शिरसाट, विधान सभा सदस्य आ.अब्दुल सत्तार, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके तसेच सर्व लोक प्रतिनिधी सदस्य, विभागप्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.          ...

टपाल तिकीट संग्रहाला चालना देण्यासाठी दीनदयाळ स्पर्श योजना; वार्षिक १६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती

    छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटांचा संग्रह व अभ्यास अर्थात ‘फिलाटेली’ (Philately) या ज्ञानवर्धक छंदाची आवड निर्माण व्हावी, टपाल तिकिटांमधील अभिरुची व संशोधनाला प्रोत्साहन मिळावे,   याकरीता भारतीय डाक विभागाच्या वतीने ‘दीनदयाळ स्पर्श योजना २०२६-२७’ राबविण्यात येत आहे.               या योजनेंतर्गत लेव्हल-१ फिलाटेली लेखी प्रश्नमंजुषा (Philately Written Quiz) परीक्षा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहारासाठी वापरली जाणारी साधने नसून त्यातून देशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, कला, विज्ञान, वारसा, सामाजिक जीवन, राष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींची माहिती मिळते. विद्यार्थ्यांनी टपाल तिकिटांचा संग्रह करण्याबरोबरच त्यांचा अभ्यास करावा आणि फिलाटेलीच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी करावी, यासाठी भारतीय डाक विभागाकडून या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना ...

सुधारित बीजभांडवल,जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना;दि.३० पर्यंत अर्ज मागविले

    छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारित बीजभांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. परिपूर्ण भरलेले अर्ज   दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी ही अखेरची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी कळविले आहे. ०००००