Posts

Showing posts from January, 2025

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक: प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- विभागीय क्रीडा संकुलात अनधिकृत व्यक्तिंचा प्रवेश रोखण्यासाठी डिजीटल पद्धतीने चेहरा ओळखीची पद्धत अवलंबावी. तसेच ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंना विभागीय क्रीडा संकुलात चालण्याच्या व्यायामासाठी वार्षिक १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारावे. जे केवळ त्यांच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेकरीता वापरले जावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले. विभागीय क्रीडा संकूल समितीची बैठक आज विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच विभागीय क्रीडासंकूल समितीचे सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट यांनी आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर व   विविध क्रीडा प्रकारांच्या विशेष मैदानावर सराव करण्यासाठी व न...

जिल्हा विकास आराखड्यात कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे- पालक सचिव हर्षदीप कांबळे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्हा विकास आराखड्यामध्ये उद्योगाला आवश्यक कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी प्रशिक्षण उपलब्धतेला प्राधान्य द्यावे तसेच वस्तुनिष्ठ उपाययोजनांचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करावा,असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी आज दिले. जिल्हा विकास आराखडा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भरत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, रोजगार आणि   स्वयंरोजगार   विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी   मनीषा हराळ, कृषी ,उद्योग, महिला बालविकास विभागाचे अधिकारी या   बैठकीस उपस्थित होते.   छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होत असून ‘ऑटोहब’ म्हणून ओळख निर्माण होत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्...

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी आयोजीत खुल्या मॅरेथॉनचे स्पर्धेत आज २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.   राष्ट्रपिता   महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. कुष्ठरोग दिन आणि कुष्ठरोग जनजागृती पंधरवाडाअंतर्गत   स्पर्श जनजागृती अभियान २०२५ निमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे   आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र, गौरव चिन्ह वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका डॉ.राणे मॅडम व प्रभारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. नाथराव फड, मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल चव्हाण, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र   वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती. विद्या सानप, जिल्हा पर्यवेक्षक विष्णु घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी   बाजीराव देसाईआदी यावेळी उपस्थित होते. ०००००

जिल्हा नियोजन समिती बैठक: लोकसंख्येची वाढ गृहित धरुन नियोजन करावे- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करतांना लोकसंख्येची वाढ गृहित धरावी. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन तयार करावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या १३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ. राजेश राठोड, विधानसभा सदस्य आ. अब्दुल सत्तार, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. अनुराधाताई चव्हाण, आ. संजनाताई जाधव तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्ह...

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन: शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाही  जिल्हा प्रशासन व  पशुसंवर्धन विभाग यांनी मिळून नियोजन करावे,असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष  ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आज आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर ,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी ,उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी   डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पशुसंवर्धन, सहकार व पणन   आदिवासी विकास विभाग, जिल्हाशल्यशिक्षक यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. सहकार आणि पणन विभागाने सावकारांकडे अडकलेली शेतकऱ्यांची जिल्ह्यामध्ये एकूण ११६ हेक्टर जमीन   शेतकऱ्यांना...

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमः आज (दि.३०) मॅरेथॉन दौड

  छत्रपती संभाजीनगर ,दि. २९(जिमाका)- कुष्ठरोग विषयक जनजागृती अभियान गुरुवार दि.३० ते दि.१३ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. गुरुवार दि.३० रोजी सकाळी ६ वा. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहायक संचालक कुष्ठरोग शिवकुमार हलकुडे यांनी केले आहे. कुष्ठरोग जनजागृतीपर उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे घोषणापत्र, सरपंचाचे भाषण व कुष्ठरोग प्रतिज्ञा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व उपकेंद्र व सर्व शासकीय कार्यालयामध्ये वाचन करण्यात आले. तसेच गुरुवार दि.३० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकूल ते   गजानन महाराज मंदीर ते पुन्हा क्रीडा संकूल असा या स्पर्धेचा मार्ग असेल. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ४ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २५०० रुपये व तृतीय पारितोषिक १५०० रुपये देण्यात येणार आहे. सहभा...

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि.३०)

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार दि.३० रोजी सकाळी ११ वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव दिलीप स्वामी यांनी कळविले आहे. बैठकीच्या कामकाज पत्रिकेत, दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील कार्यवाहीचा पुर्तता अहवाल, जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२५-२६ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, सन २०२४-२५ अंतर्गत माहे डिसेंबर २०२४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा विकास आराखडा २०२४-२८ वर चर्चा करणे व त्यास मान्यता देणे इ.विषयांचा समावेश असून या विषयांवर बैठकीत कामकाज होणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कळविले आहे. ०००००

कन्नड येथे पथदर्शी प्रकल्प; शहरी भागात ड्रोनद्वारे जमिन मोजणी ‘नक्शा’साठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- केंद्रशासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करुन अद्यावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(NAKSHA) उपक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यात प्रथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. कन्नड येथील तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी/ प्रशासक, भुमि अभिलेख विभाग इ. नी आपापसात समन्वय राखून आपली कामे वेळेत पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले. कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती. कन्नड नगरपालिकेत आज बैठक घेण्यात आली. नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याधर कडवकर, उपअधीक्षक भुमिअभिलेख डॉ. विजय वीर तसेच नगरपालिकेचे सर्व अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते. डॉ. वीर यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली की, ग्रामिण भागातील जमिन मोजणी व मालमत्ता कार्ड तयार करुन देण्यासंदर्भात नुकताच स्वामित्व प्रकल्प राबविण्यात आला. त्याच धर्तीवर शहरी भागातील जमिन मोजणी करुन मालमत्ता कार्ड देण्याबाबत ‘नक्शा’(NAKSHA) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्...