Posts

Showing posts from September, 2023

मतदार सर्व्हेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हे दाखल

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – मतदार सर्व्हेक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 राबवण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक, कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय काम सांभाळून उर्वरित वेळेत घरोघरी जाऊन ज्या मतदारांचे वय 80 वर्षपेक्षा जास्त आहे त्यांची भेट घेणे. तसेच मयत, स्थलांतरीत, नव मतदार यांची माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु काही शाळा तसेच कार्यालयांनी या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील हेतूपुरस्कर कार्यमुक्त केले नाही. अशा बीएलओ तसेच संबंधित कार्यालय प्रमुख व इतर यांच्यावर तहसिलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे यां...

ज्येष्ठ नागरिक दिन रविवारी(दि.1 ऑक्टों) साजरा करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – शासन निर्णयानुसार 1 ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये 1 ऑक्टोंबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे. भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतुद आहे. ज्येष्ठ नागरिकाचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा.समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे,   वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण याआधीच जारी केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये रविवार दि.1 ऑक्टोंबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून...

माहिती अधिकारात अर्जदाराने मागितलेली माहिती नेमकेपणाने द्यावी - अभया शेलकर

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका)- शासकीय कामकाज पार पडत असताना जनमाहिती अधिकारी आणि सहायक जनमाहिती अधिकारी तसेच अपिलीय जन माहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती, अभिलेख नेमकेपणाने उपलब्ध करुन द्यावेत. असे मार्गदर्शनपर व्याख्यानात ॲङ अभया शेलकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना निमित्त विशेष व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माहिती अधिकाराचे अंमलबजावणी करत असताना. विविध नियमांचा पालन करुन वेळेच्या मर्यादेत माहिती उपलब्ध करुन द्यावी. कलम 8 प्रमाणे कोणती माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने देऊ नये. तसेच काय खबरदारी घ्यावी. उदाहरणासह मार्गदर्शन केले. माहिती उपलब्ध करुन देताना अर्जदारांची ओळखीचा पुरावा म्हणून कोणकोणती कागदपत्रे तपासवी याबाबत ही त्यांनी सांगितले. या माहिती अधिकार व्याख्याने साठी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 00000

मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिद्ध

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 104- सिल्लोड, 105- कन्नड, 106- फुलंब्री, 107- छत्रपती संभाजीनगर मध्य, 108- छत्रपती संभाजीनगर (पश्चिम), 109- छत्रपती संभाजीनगर (पूर्व), 110-पैठण,111-गंगापूर,112-वैजापूर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यात आली आहे. मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राच्या बाबतीत मतदान केंद्राचे विभाजन करुन अथवा मतदार इतर मतदान केंद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झाले आहे. मतदान केंद्रांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दि.22 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या प्रारुप यादीच्या बाबतीत कोणाचेही कोणतेही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत   सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हानिवडणूक...

जिल्हा परिषदेच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा अनूसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील लाभर्थ्यांनी अर्ज करावेत

     छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20 टक्के उपकरातुन सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागसवर्गींयाना वैयक्तिक व सामुहिक लाभ देणे करीता ग्रामीण क्षेत्रातील लाथर्थ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. सदर योजनांचे पात्र लाभर्थ्यांकडून 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र मागासवर्गीय लाभर्थ्यांनी संबंधित पंचायत समितीशी मुदत कालावधीत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहे. जिल्हा परिषेद शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनीना सायकल वाटप, मागासवर्गीयांना इलेक्ट्रिक मोटार संच पुरविणे, मागासवर्गीयांना ऑईल, इंजिन, केरोसिन पंप पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्र पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणे, मागासवर्गीय महिला लाभर्थ्यांना झेरॉक्स मशिन पुरविणे, मागासवर्गीय लाभर्थ्यांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीय लोखंडी स्टील पुरविणे (गवती छप्पन बदलुन टिनपत्रे पुरविणे) मागासवर्गीय लाभर्थ्यांना संगणक लॅपटॉप पुरविणे, मागासवर्गीयांना मिरची कांड...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षेचे आयोजन

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत रविवार दि.1 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-2022, संयुक्त पेपर क्रमांक 1 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत 4 उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी एकूण 1 हजार 224 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. परीक्षेसाठी एकूण 149 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे यांनी दिली आहे. परीक्षेसंदर्भात संघ लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सुचनाः- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने प्रवेशपत्र व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड या प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकीत प्रत सोबत आणावी. परीक्षा कक्षामध्ये पेपर सुरु होण्याच्या एक तास अगोदर प्रवेश देण्यात येईल. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, ओळ...

शोर्य दिनानिमित्त वीर माता-पिता, माजी सैनिक यांचा सन्मान

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – शोर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 29 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी   छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील हॉलमध्ये करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम दुपारी 12 वा. संपन्न होईल.   या कार्यक्रमामध्ये वीरनारी, वीरमाता, वीरपिता, ज्येष्ठ माजी सैनिक, विधवा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. वीरनारी, वीरमाता, वीरपिता, ज्येष्ठ माजी सैनिक, विधवा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 00000

गड किल्ले स्वच्छता अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व पर्यटन विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि. 02 ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 350 किल्ल्यांची स्वच्‌छता करुन छत्रपती   शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदना करण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 13 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक, व जिल्हा व्यवसाय   शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हे जिल्ह्यातील 12 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियानातून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन करणार आहेत. या अभियानामध्ये जिल्ह्यातील इच्छुक स्वंयसेवी संस्था सहभाग घेऊ शकतात. सोयगाव तालुक्यात फर्दापूर, वेताळवाडी, वैशागड, सुतोंडा या किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविणार आहे. सिल्लोड येथी अंजिठा सराय, अंजिठा, कन्नड तालुक्यात अंतुर, लोंझा व पेठका, फुलंब्री तालुक्यात लहुगड, छत्रपती संभाजीनगर तालुक्य...

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन

  छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – 27 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. माहिती अधिकार कायद्याविषयी, त्यांची अंमलबजावणी, करीत असताना येणाऱ्या प्रश्न व उपाययोजना विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा. ॲङ अभया शेलकर या माहिती अधिकार अधिनियम यावर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानास सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाचे प्रभोदय मुळे यांनी केले आहे. 00000  

जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘गाथा मुक्ति संग्रामाची’ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण

  छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण मराठवाड्यात करण्यात येत आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मराठवाड्यातील सर्व तालुक्यात “ गाथा मुक्ति संग्रामाची ” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. दि.27 सप्टेंबर 2023 बुधवारी सायं.6.30 वा. बचत भवन, पंचायत समिती सभागृह, सोयगाव समन्वयक रामेश्वर देवरे मो. 7798527273 येथे सादरीकरण होणार आहे. तसेच दि. 29 सप्टेंबर शुक्रवारी सायं. 6.30 वा. छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह, नगर परिषद, सिल्लोड येथे प्रयोग होईल. यासाठी समन्वयक प्रितेश जोशी मो. 9834522812, दि.30 सप्टेंबर शनिवारी, पंडीत गोविंदराव जळगावकर नाट्यगृह ता.अंबड जि.जालना येथे गाथा मुक्ति संग्रामाची नाटय प्रयोग होइल. समन्वयक अभिनय जाधव असून मो.नं. 9527992255 आहे. नागरिकांनी या नाट्यप्रयोगास उपस्थित राहून मुक्तिसंग्रामाचा इतिहास नाट्यस्वरुपात अनुभवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात फळबागांचे पुनरुज्जीवन शेतकरी बांधवानी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत

  छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुना फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canpoy) इ.बाबीमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याची फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब आहे.2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रु.40 हजार प्रति हेक्टर ग्राह्या धरुन त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु. 20 हजार प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय रा...

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि.3 ऑक्टोंबर) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू 2 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी येत असल्याने मंगळवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा निवेदने स्वत: उपस्थित राहून दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे. 00000

पालकमंत्र्यांची आढावा बैठक पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका)- पैठण शहरात अतिक्रमणधारकांना हटविण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करावे असे,निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे रोहोयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पैठण तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली   घेण्यात आला.   मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ,क्रीडा संकुलाच्या सोयीसुविधा,स्मशानभूमी जागा उपलब्धता इ.आढावा यावेळी घेण्यात आला.                जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, उपविभागीय अधिकारी अधिकारी पैठण सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, नगरपालिका पैठण मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, भूमी अभिलेख अधीक्षक डाहोरे, कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प जाधव, क्रीडा अधिकारी लता लोंढे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दरोली, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता खडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्...

सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादेत परवानगी

  छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका)-   ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 च्या उपनियम (3) नुसार प्राप्त अधिकारानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा तसेच अधिसूचनेनुसार घोषित केलेले शांतता क्षेत्र खेरीज इतर ठिकाणी करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2023 अन्वये ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत देण्यात आलेली परवानगी रद्द करुन दि.27 सप्टेंबर 2023 रोजीची ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशाने निर्गमित करण्यात येत आहे. 000000

मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिद्ध

  छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 104- सिल्लोड, 105- कन्नड, 106- फुलंब्री, 107- छत्रपती संभाजीनगर मध्य, 108- छत्रपती संभाजीनगर (पश्चिम), 109- छत्रपती संभाजीनगर (पूर्व), 110-पैठण,111-गंगापूर,112-वैजापूर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यात आली आहे. मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राच्या बाबतीत मतदान केंद्राचे विभाजन करुन अथवा मतदार इतर मतदान केंद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झाले आहे. मतदान केंद्रांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दि.22 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या प्रारुप यादीच्या बाबतीत कोणाचेही कोणतेही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत   सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हानिवडणूक...

डिजे वापरास मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  छत्रपती संभाजीनगर,दि.21(जिमाका)- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदुषण (नियंत्रण व नियमन) 2000 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गुरुवार  दि.28 पर्यंत डिजे वापरास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जारी केले आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 व रात्री 10 ते सकाळी सहा तसेच शांतता विभाग म्हणून घोषित करण्यात आलेले हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे इ. भागात  आवाजाच्या नमूद क्षमतांपेक्षा अधिक पातळी जाऊ नये असे निर्बंध आहेत. त्यात औद्योगिक क्षेत्र  दिवसा 75 डेसिबल्स, रात्री 70 डेसिबल्स, विपणन क्षेत्र दिवसा 65 व रात्री 55, रहिवासी क्षेत्र  दिवसा 55 व रात्री 45 तर शांतता विभाग दिवसा 50 व रात्री 40 डेसिबल्स इतकी आवाज मर्यादा हवी. त्याचे पालन व्हावे, यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

प्रतिबंधात्मक फौजदारी कारवाई कार्यशाळा: अचूक कारवाईसाठी संवाद-समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी पाण्डेय

Image
छत्रपती संभाजीनगर,दि.21(जिमाका)- कायदा व कलमांचा अभ्यास   करून अचूक कारवाई व्हावी यासाठी अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद आणि समन्वय आवश्यक असून समाजस्वास्थ्यासाठी हे महत्त्वाचे आहे ,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रतिबंधात्मक फौजदारी   कायदा कलम 107,108,109,110 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55,56,57 अंतर्गत करावयाच्या कारवाई संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनिष कलवानिया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती महक स्वामी,ए.एस.आय.डी.एम.भांगे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले की, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करताना   कायद्याचा निट अभ्यास केला पाहिजे तसेच पोलिसांनी एकमेकांशी संवाद आणि समन्वय ठेवणे आवश्यक आहे. हे पोलीस व नागरिकांसाठी महत्वाचे आहे. काही व...

दुध भेसळ प्रतिबंधक समितीने केली 40 ठिकाणी तपासणी

  छत्रपती संभाजीनगर, दि.21 (जिमाका) – दुध भेसळ प्रतिबंधक समितीने दि.22 ऑगस्ट ते दि.13 सप्टेंबर या कालावधीत 40  ठिकाणी तपासणी करुन 246 नमुने घेतले. त्यात 1887 लिटर संशयित भेसळ युक्त दूध व 71 किलो दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले, असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे यांनी कळविले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यात दुधभेसळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे   हे आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक अजित मैत्रे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन (शहर) डी.व्ही.पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनिषा हराळ-मोरे, उपायुक्त जिल्हा पुशसंवर्धन अधिकारी झोड आदी या समितीचे सदस्य आहेत.   या समितीअंतर्गत गठीत पथकाने धडक मोहिमेअंतर्गत दि.22 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत   शहरात व तालुक्यात   सहकारी, खाजगी दुध उत्पादक संस्था, खाजगी दुध संकलन केंद्र, खाजगी दुध शितकरण केंद्र व दुध प्रक्रिया प्रकल्प, घाऊक व किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते व स्विट मार्टस अशा एकूण 40 ठिकाणी ...

सार्वजनिक न्यास नोंदणी संस्थांनी दोन हजारांच्या चलनी नोटा मुदतीत बदलवून घ्याव्या अथवा बॅंकेत जमा कराव्या-धर्मदाय उपायुक्त

  छत्रपती संभाजीनगर, दि.21 (जिमाका) – रिजर्व बॅंकेने दोन हजार रुपये मुल्याच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बदलवण्यासाठी दि.30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत असून अर्व सार्वजनिक अन्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत नोंदणीकृत संस्थांनी त्यांच्या ताब्यातील दोन हजार रुपये मूल्य असलेल्या चलनी नोटा बदलवून घ्याव्याअथवा खात्यात जमा कराव्या,असे आवाहन धर्मदाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत न्यास, संस्था, ट्रस्ट,जिल्हाभरातील न्यास/मंदीर संस्थांचे पदाधिकारी यांनी मंदिरात दानपेटी वा इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा भरणा मुदतीच्या आत बँकेत भरणा करावा. तसेच मुदतीच्या आत दानपेटी उघडून त्यात प्राप्त   नोटा बँकेत जमा कराव्या व संभाव्य नुकसान टाळावे,असे कळविण्यात आले आहे. 00000

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान: प्रकल्प संचालक डॉ.राजाराम दिघे यांची भेट

  छत्रपती संभाजीनगर, दि.21(जिमाका)- स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड (STL) व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून जिल्ह्यातील 21 ग्राम पंचायतीमधील 36 गावांमध्ये जल शक्ती अभियानच्या धर्तीवर महाराष्ट्र ग्राम करण्याचे काम सुरु आहे. प्रकल्प संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी या प्रकल्पातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यांचेसमवेत अभियान व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, विस्तार अधिकारी विजयकुमार पंडित यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, छावणी परिषद, सामाजिक वनीकरण स्टरलाईट टेक्नॉलाजी लिमिटेड, महानगरपालिका यांच्या संयुक्त भागीदारीतून खामनदी येथील घनदाट वृक्ष लागवडची पाहणी केली. तिसगाव, गांधेली गावतील सरपंच, ग्राम विकास अधिकारी पी.आर.रिंढे, ए.आर.गायकवाड व गावकरी यांच्याशी पाणी, शेती, रोजगार, घरकुल, महिला बचत गट, शाळा, अंगणवाडी, आरोग्य सेविका, PHC ई.विषयावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पामध्ये प्रामख्याने समुदाय संस्थाचे बळकटीकरण, गाव स्तरावरील पाण्याची सुरक्षितता आणि शाश्वतता, जल संधारण पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जुन्या जल संरचनाचे पुनर...

खुलताबाद उर्स कालावधीत वाहतुक मार्गात बदल

  छत्रपती संभाजीनगर, दि.21(जिमाका)- खुलताबाद शहरात दि.21 सप्टेंबर ते दि.5 ऑक्टोबर या कालावधीत  जर-जरी-जर बक्ष उर्स असून या उर्ससाठी लाखो भाविक खुलताबाद येथे येतात. त्यामुळे खुलताबाद शहरानजिक सोलापुर धुळे रा.म.क्र.52 वरील रहदारी सुरळीत सुरु राहण्यासाठी दि.21चे रात्री 12 ते दि.5 ऑक्टोबरचे रात्री 12 वाजेपर्यत यामार्गाने जाणारी सर्व जड अवजड वाहतुकीच्या मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. फुलंब्री-मार्गे खुलताबाद-कन्नड कडे जाणारी सर्व जड वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापुर फाटा, माळीवाडा, कसाबखेडा फाटा, नांदगाव मार्गे धुळे कडे जातील. फुलंब्री कडुन उर्सासाठी येणारी सर्व जड वाहणे काटशेवरी फाटा, ममनापुर, भडजी, सराई मार्गे खुलताबाद शहरात येतील. छत्रपती संभाजीनगर मार्गे येणारी सर्व जड वाहतुक ही, शरणापुर फाटा, माळीवाडा, कसाबखेडा फाटा, नांदगाव मार्गे धुळे कडे जातील. छत्रपती संभाजीनगर शहरातुन उर्सासाठी येणारी सर्व हलके वाहने हे छ.संभाजीनगर, दौलताबाद, दौलताबाद घाट मार्गे खुलताबाद शहरात येतील. तसेच या कालावधीत सर्व जड वाहनाची वाहतुक दौलताबाद टी पॉईट पासून दौलताबाद घाट, कागजीपुरा...

डाक विभागात जीवन विमा एंजट पदासाठी अर्ज मागविले

  छत्रपती संभाजीनगर, दि.21 (जिमाका) – डाक विभागात जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा एजंटांच्या नेमणूका थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत. पात्रतेचे निकष याप्रमाणे- वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष, किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष, सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वंयरोजगारास इच्छुक. व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इ. बाबी आवश्यक. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक असेल ही रक्कम राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तात्पूरता परवाना देण्यात येईल. त्यानंतर आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परवाना कायम स्वरूपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. इच्छुकांनी जालना प्रधान डाकघर, जालना – 431 203 येथे जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यांसाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत...

वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता

  छत्रपती संभाजीनगर,दि.21(जिमाका)- समाजकल्याण विभागातर्फे मुलींसाठी वसतीगृह चालविले जाते. त्यासाठी महानगरपालिका हद्दीत  भाडेतत्वावर सुसज्य व वातानुकुलीत सोयी-सुविधायुक्त इमारतीची आवश्यकता आहे,असे सहाय्यक आयुक्त डी.एच. राजमोड यांनी कळविले आहे. पदमपुरा येथे 250 विद्यार्थींनीसाठी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जुने छत्रपती संभाजीनगर 75 विद्यार्थिनींसाठी   वसतीगृहाकरीता,गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह नवीन छत्रपती संभाजीनगर 100 विद्यार्थिनींकरीता जागेची आवश्यकता आहे. महानगरपालिका हद्दीत पाण्याची, लाईट ची व्यवस्था, शहरातील महाविद्यालयास जाणे-येण्याचा मार्ग असलेली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारती भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. अशी इमारत उपलब्ध्‍ असलेल्या मालकांनी इमारतीच्या कागदपत्रासह सर्व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डी.एच.राजमोडे समाज कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.   00000