Posts

Showing posts from December, 2025

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक प्रशिक्षणाचा भाग म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या अधिकाऱ्यांच्या पथकाने आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. जिल्हाप्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकची प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आली. याअधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी स्वामी यांनी संवाद साधत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय उपक्रम तसेच जिल्ह्यातील औद्योगिक,ऐतिहासिक व पर्यटन विषयक बाबींची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते. पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक विजय जाधव, शिवाजी गायकवाड तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी जितेंद्रकुमार, सुयशकुमार, कोमल पुनिया, लक्ष्मीनारायण वर्मा, मोह. हरीस मीर, सोनेट जोस, हर्षिता गोयल, अनुप नायक, अमितेज पंगतेय, रितिका राथ यावेळी उपस्थित होते.

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची गरज आहे. त्यात सहभागी होणारे हे बाल वैज्ञानिक देशाची प्रगती साध्य करण्यासाठी मोठे योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज गणोरी ता. फुलंब्री येथे केले.             ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद प्रशाला गणोरी, तालुका फुलंब्री येथे पार पडले. समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनास शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा म्हेत्रे खैरनार, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक दिलीप सिरसाठ, श्रीमती सुनीता वाघ तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, फुलंब्री तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   ...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- शेतापर्यंत रस्त्यांची निर्मिती करणारा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण विभागात कालबद्ध पद्धतीने राबवून येत्या पावसाळ्याच्या आत विभागात अनेक भागात शेतांपर्यंत रस्ते तयार व्हावेत या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.             मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम राबविण्याबाबत व त्यासाठी सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आज विभागीय कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, हिंगोलीचे विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व भुमि अभिलेख अधीक्षक, उपजिल्हाधिकारी   आदी उपस्थित होते.         ...

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ पुस्तिकेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती शी.वै. मिसाळ, सांख्यिकी अधिकारी न.ज.कदम, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती नि.न. भिडे यावेळी उपस्थित होते. नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने हे समालोचन दरवर्षी प्रकाशित होत असते. त्यात सर्व शासकीय कार्यालये, संलग्न कार्यालये, संस्था, समित्या यांच्या वर्षभरातील कामगिरी संदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.   0000

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकार

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- ज्या आस्थापनांवर २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापनांनी   ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.             या आस्थापनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये,‍ अंगिकृत उद्योग/ व्यवसाय/ महामंडळे,   स्थानिक स्वराज्य संस्था,   जिल्हा परिषद / पंचायत   समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील   २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांचा समावेश होतो. अशा आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र नमुना ई-आर १ तिमाही संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबर – २०२५ अखेर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमा...

बेपत्ता इसमाची माहिती कळविण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका) – बेगमपुरा परिसरातील रहिवासी असलेले सय्यद जाहेद निजामोद्दीन वय ४४वर्ष, व्यवसाय पान शॉप  हे दि.१९ डिसेंबर २०२५ पासून बेपत्ता  असल्याची फिर्याद त्यांचे पत्नी श्रीमती जकीया भ्र.जाहेद सय्यद यांनी सिटी चौक पोलीस ठाणे येथे दिली आहे. बेपत्ता इसमाची माहिती कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.             बेपत्ता इसमाची पूर्ण माहितीः- नाव- सय्यद जाहेद निजामोद्दीन, , व्यवसाय पान शॉप, रा. अरब खिडकी, मस्जिद, बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर मो. नं. 9822112259 वर्ण- सावळा, बांधा – मध्यम, उंची – 5 फुट 6 इंच, नाक – सरळ, डोळे – काळे, चेहरा – गोल, केस – पांढरे बारीक, दाढी- केस पांढरे वाढलेली, भाषा – मराठी, हिंदी, बोलतो, अंगात – आकाशी रंगाचा नेहरु शर्ट व पँन्ट, मिलिंद हायस्कूल येथून दहावी पर्यंत शिक्षण झालेले, उजव्या हाताचे मनगटावर जुने जळाल्याचे व्रण, शारीरिक व मानसिक स्थिती चांगली, सोबत काही एक मौल्यावान चिजवस्तू नाही, मोबाईल सोबत नाही. या वर्णनाचा इसम कुणास आढळल्यास त्याबाबत सहायक फौजदार   सईदख...

‘स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- जिल्ह्यातील अंगणवाडी स्मार्ट करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, अंगणवाडी विकास, बाल भिक्षेकरी निर्मूलन, बाल मृत्यू प्रतिबंधक अभियान, कुपोषण मुक्ती अभियान, बालविवाह रोखणे अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ, बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, तालुका बालविकास अधिकारी मनिषा कदम, जी.आर. अंधारे, संतोष जाधव, श्रीमती कल्पना देशमुख तसेच सर्व तालुका बालविकास अदिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील लाभार्थी गरोदर महिलांची नोंदणी, त्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती देण्यात आली.जिल्ह्यातील अंगणवाडी ह्या स्मार्ट करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत. त्यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असावा. सर्व शासकीय विभागांनी समायोजनातून हा उपक्रम राबवावा. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम त...

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- माथाडी कामगार कायदा तसेच अन्य कामगार कल्याण कायदे व योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा व याबाबत दर आठवड्याला अहवाल सादर करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.  जिल्हा कामगार अधिकारी सुरेंद्रसिंग राजपूत,  वखर महामंडळाचे अंकुश भाटेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक  के. एस. पवार, कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुभाष लोमटे, शेख हारुन, संतोष तळेकर आदी उपस्थित होते. कामगारांची विविध आस्थापनांवर निवड होऊन त्यांच्या वेतनावरील लेव्ही कामगार मंडळाकडे वेळेत जमा न करणे, कामगारांच्या नियुक्त्यांसंदर्भात विविध प्रश्न, कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास दंड आकारणी करणे अशा विषयांबाबत चर्चा करण्यात आली. कामगार संघटनांनी यासंदर्भात त्यांचे प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, वखार महामंडळांनीही माथाडी कायद्याप्रमाणे काम करावे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन व अन्य लाभ मिळावे यासाठ...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि: २३ (जिमाका) - जिल्हा देशात सलग चार वर्ष प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या उपक्रमात प्रथम क्रमांकावर असून हा प्रथम क्रमांक कायम ठेवण्यासाठी   योजनेचे प्रलंबित प्रस्ताव डिसेंबर अखेर मंजूर करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.              जिल्हास्तरीय बँकर समितीच्या   आढावा बैठकीचे   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक प्रेषित मोघे,   कृषी विभागाचे उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, रिझर्व बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अमित मिश्रा, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगर, सुचिता कोतकर ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. जे. पाटील तसेच सर्व बँकेचे समन्वयक या बैठकीसाठी उपस्थित होते.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आधारित विविध ...

‘अमृत’ संस्थेतर्फे मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रशिक्षण वर्ग सुरु

छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था ‘अमृत ’ च्या वतीने मोबाइल फिल्म-मेकिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरु झाला असून शनिवारी (दि.२०) हा वर्ग सुरु झाला             मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन काम करता यावे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मोबाईल वापरून चित्रीकरण करणे, प्रकाश योजना, चित्रचौकट, ध्वनी याबाबत मूलभूत माहिती, संकलन,कथा निवेदन, पटकथा लेखन, तसेच सोशल मीडियासाठी रील्स आणि शॉर्ट फिल्म्स तयार करणे याबाबत सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी नहुष बडगे आणि आश्लेष जामरे हे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी ...

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि: २३ (जिमाका) - समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांची संवाद संवेदनशील आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गतिशीलतेने काम केल्याने सुशासन होईल असा विश्वास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला.  जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. या  कार्यशाळेत निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, यांच्यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख.व अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.                         विभागीय   आयुक्त जितेंद्र पापळकर   म्हणाले की, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही .यासाठी नागरिकांशी ...

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण:प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- ग्राम,तालुकास्तरावरील अधिकारी – कर्मचारी हेच प्रशासनाचा चेहरा असतात. आपल्या संभाषणानुसार आपली वैयक्तिक नव्हे तर प्रशासनाचीही प्रतिमा जनमानसात तयार होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य अवश्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.             छत्रपती संभाजीनगर, पैठण व फुलंब्री येथील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची   एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर हे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नीलम बाफना, तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, श्रीमती योगिता खटावकर, उमेश पाटील,   ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी, सतिष भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणेला...

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

               छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १२ दिवसांचा व  निवासी स्वरुपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. हे प्रशिक्षण कोलाड जि. रायगड येथे दिले जाणार असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने   शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी इच्छूक स्वयंसेवकांच्या बॅचेस कोलाड, जि.रायगड येथे पाठविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णत: मोफत असून प्रत्येक आपदा मित्राकरीता वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसाद संच (ERK), तीन वर्षाकरीता ५ लाखांचे विमा संरक्षण   तसेच येणे - जाणे आणि निवास व भोजनाची व्यवस्था पूर्णत: विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या व यापूर्वी नामनिर्देशने सादर करण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.३० डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावी. आवश्यक कागदपत्रे: १.आधार कार्ड. २.T.C. किंवा Nationality ३...

राष्ट्रीय लोकअदालतः ३६२६ प्रकरणात तडजोड

  छत्रपती संभाजीनगर, दि. १५(जिमाका)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी (दि.१३) करण्यात आले. त्यात २८५६ प्रलंबित प्रकरणे व ७७० दाखलपूर्व असे एकुण ३६२६  प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ४४ कोटी ४३ लक्ष ८५ हजार ९८३ रुपयांची तडजोड झाली,अशी माहिती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी दिली आहे.             राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय येथे शनिवारी प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.             जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश रा.अग्रवाल अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे अधिकारी, वित्तीय संस्था, वकील व बँकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. राष्...