Posts

Showing posts from October, 2024

पत्रपरिषद:निर्भय; निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन दाखल करणे व त्याची छाननी प्रक्रिया होत असून निवडणूकीच्या पुढच्या टप्प्यांची तयारी सुरु आहे. मतदान हे निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहेच, त्यास सर्व मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, माध्यमे या सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची यावेळी उपस्थिती होती. ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आणि ३२७३ मतदान केंद्र             पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील निवडणूक पूर्व तयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आता ३० ऑक्टोंबर २०२४ अखेर १६ लाख ६३ हजार १८६ पुरुष १५ लाख ३९ हजार ४२१ महिला व १४४ इतर असे एकू...

सर्व्हेक्षण पथकांमार्फत पैशांच्या वापराबाबत करडी नजर ; आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले निर्देश

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):- निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असू शकते,अशा संभाव्य ठिकाणी विविध सर्व्हेक्षण पथकांमार्फत करडी नजर ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.             विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्या, या हेतूने जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणी होत आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन त्यांचे कामकाजही सुरु झाले आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन   व सोभान सुत्रधार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, खर्च निरीक्षण नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.             निर्देश देण्यात...

प्रतिबंधात्मक आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)-   आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच   पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

वाहनांमधून होणाऱ्या संशयित वाहतुकीवर लक्ष ठेवा- विकास मीना

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका):- उमेदवारी अर्ज भरण्याचे कामकाज आज पूर्ण होत आहे. आता उमेदवारांच्या प्रचार कार्यासही वेग येईल. त्यातच दिवाळी सारखा सण आहे. त्यामुळे खाजगी, सार्वजनिक वाहनांमधून होणाऱ्या वाहतुकीवर व त्यातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने   आचारसंहिता   कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी सर्व पाहणी पथकांची बैठक घेतली. दुरदृष्य प्रणालीने ही बैठक संपन्न झाली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद   लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती. श्री. मीना यांनी निर्देश दिले की, आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथके, फिरती पथके व व्हिडीओ निरीक्षण पथके यांनी आपले काम हे गुणवत्तापूर्ण करावे. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांबाबत तपासणी करण्याची दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, बॅंकेची वाहने यासारख्या वाहनांचा वापर करुन संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच खाजगी वाहतूक...

निवृत्तीवेतनधारकांनी जीवनप्रमाण दाखला द्यावा;ऑनलाईन सुविधाही उपलब्ध

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका):- जिल्हा कोषागाराअंतर्गत सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी येत्या दि.१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आपला जीवनप्रमाण दाखला संबंधित बॅंकेत प्रत्यक्ष हजर राहून द्यावा.  ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी   http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचे ठसे देऊनही जीवनप्रमाण दाखला देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ.बुरकुले वरिष्ठ कोषागार कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय यादी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बॅंकेस पाठविण्यात आली आहे. निवृत्तीवेतन सुरु ठेवण्याकरीता दि.१ ते ३०नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याच्या ठसा उमटवावा. पुनःर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती...

कारागृहबंद्यानी निर्माण केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध या उद्देशाने दि.२९ ऑक्टोंबर  ते १० नोव्हेंबर दरम्यान बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश सुभाष कुऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मध्यवर्ती कारगृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, उपअधीक्षक संदीप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगअधिकारी प्रदीप रणदिवे, तुरुंग अधिकारी सतिष हिरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारागृहातून सुटल्यावर बंदी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, म्हणून बंद्यांना बंदीवासात विविध व्यवसायांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करुन बंदी कारागृहातून सुटका झाल्यावर कारागृहात घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करु शकतो. कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य सुधारणा व पुनवर्सन असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. बंदीवासात तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्र...

निवडणूक निरीक्षक दाखलःप्रशासनाचा घेतला आढावा; नागरिकांनाही भेटणार

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नेमलेल्या निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात खर्च निरीक्षकही दाखल झाले आहेत. दरम्यान आज या सर्व निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगातर्फे जिल्ह्यात विधानसभा निवडणुक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले निरीक्षक काल रात्री शहरात दाखल झाले. त्यात बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य),     श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर) तसेच कायदा सुव्यवस्थेसाठी राजपालसिंग यांचा समावेश आहे.   यासर्व निरीक्षकांनी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊन झालेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठ...

ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई

  छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी  पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना  भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये  मनाई करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी निर्गमित केला आहे. हे आदेश दि.३१ ऑक्टोंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत लागू राहतील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने कर ण्यात येणाऱ्या कारवाई यास अपवाद असेल.या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारींसाठी सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल फ्रि क्रमांक उपलब्ध

  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या  सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५०   या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.     विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आदर्श आचारसं‍हितेचा भंग होत असल्‍यास नागरीक   cVIGIL   अॅपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी दाखल करु शकतात. क्षेत्रिय पथकाद्वारे प्राप्‍त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार १०० मिनिटात निकाली काढण्‍यात येते. त्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहायही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बंदुक/पिस्‍तुल प्रदर्शन करणे ,   दारु वाटप ,   पैसे वाटप ,   सरकारी मालमत्‍तेचे विद्रुपन ,   बनावट बातमी ,   मतदारांची वाहतुक ,   भेटवस्‍तू वाटप ,  ...

आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन नाही

छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला असून त्यानुसार दि.२५ नोव्हेंबर पर्यंत  निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी या कालावधीत येणाऱ्या सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन होणार नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. ०००००

लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व मतदानाच्या अधिकारात- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्था आहे. आपल्याला मिळणाऱ्या विविध सोई, सुविधा आपले शिक्षण, रोजगार प्राप्त करण्याचा हक्क लोकशाहीमुळे व त्यात दिलेल्या मतदानाच्या अधिकारात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे, सहा. नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, प्राचार्य रोहिणी कुलकर्णी, प्रा. भगवान कांबळे आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थी जिवनात विद्यार्जन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.   तसेच लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करणे हे सुद्धा आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यंनी आपल्या भवतालच्या सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षरोपण अशा विविध विषयांत विद्यार्थ्यांनी कार्यरत असणे आवश्यक आहे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्...

सणासुदीच्या पार्श्वभुमिवर उलाढाली व देवाणघेवाणीवर कडक नजर; निवडणूक आयोगाचे खर्चनिरीक्षक दाखलःयंत्रणांचा घेतला आढावा

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत दिवाळीसारख्या सणासुदीचा कालावधी येत आहे. त्या पार्श्वभुमिवर होणाऱ्या उलाढाली व देवाणघेवाण यावर कडक नजर ठेवावी,असे निर्देश जिल्ह्यात दाखल झालेल्या निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. आज या निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व लेखाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय खर्च निरीक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.             नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, दाखल झालेले खर्च निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन व सोभान सुत्रधार यांच्यासह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक   डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपसंचालक तथा   वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी तसेच सर्व नोडल अधिकारी व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.             खर्च निरीक्षकांनी सर्व यंत्रणाप्रमुख व नोडल अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कामकाजा...

विधानसभा निवडणूकीत पैशांचा वापर निदर्शनास आल्यास थेट आयकर विभागाला कळवा

  छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने थेट जनतेला आवाहन केले आहे. अशाप्रकारे रोख रकमेचा वापर, वाटप रकमेची वाहतुक अशा बाबतीत नागरिकांनी आयकर विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईलअसेही कळविण्यात आले आहे.याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी काळ्या पैशाच्या वापराची माहिती गोपनियरित्या द्यावी. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०३५५, १८००-२३३-०३५६ वर माहिती द्यावी तसेच ९४०३३९०९८० या व्हॉट्सॲप क्रमांकावर उपलब्ध असलेली छायाचित्रे, व्हिडीओ पाठवावीत. तसेच nagpur.addidit.inv@incometax.gov.in व nashik.addidit.inv@incometax.gov.in   या इमेलवरही माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्या व्यक्तिचे नाव गुप्त ठेवले जाईल,असे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे. ०००००

प्रतिबंधात्मक आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)-   आगामी काळातील सण, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.२ नोव्हेंबर पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्स्होभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच   पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

आदर्श आचारसंहिता पालनासाठी दक्ष रहावे-विकास मीना

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितापालनासाठी सर्व पथक प्रमुखांनी ,सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कारवाई करावी,असे निर्देश आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी  विकास मीना  यांनी  आज दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षामध्ये आज जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदार संघनिहाय आचारसंहिता नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महानगरपालिका अपर आयुक्त   रणजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, श्रीमती उपासे यांच्यासह   जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.             यावेळी सुचना देण्यात आल्या की, आचार संहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ पथके यांनी   बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ...

वेतन देयके आज(दि.२३) व उद्या (दि.२४) कोषागारात सादर करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी आपापल्या अधिनस्त वेतन देयके ही बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ रोजी कोषागारात सादर करावीत असे आवाहन उपसंचालक तथा  वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी केले आहे. वेतन देयके व सण अग्रिमाची देयके या कालावधीत दाखल करावीत. दि.२६ ते २९ या कालावधीत कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार असुन त्याआधी आपापल्या कार्यालयाची वेतन देयके कोषागारात जमा करावी असे उपसंचालक कुलकर्णी यांनी कळविले आहे. ०००००

१०७-औरंगाबाद(मध्य) विधानसभा स्वीप उपक्रम: लोकशाहीमुळे मिळालेल्या अधिकार आणि कर्तव्यांबाबत युवकांनी जागरुक असावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):-   आपल्या आयुष्यात व सामाजिक  जीवनात मिळणाऱ्या विविध सोई, सुविधा आपले शिक्षण, रोजगार यासारख्या बाबी प्राप्त करण्यात तसेच आपल्याला मिळालेले अधिकार आणि कर्तव्य हे सगळे लोकशाहीमुळे मिळालेले असून त्यासंदर्भात युवकांनी जागरुक असावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. विधानसभेच्या १०७-औरंगाबाद (मध्य) मतदारसंघांतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. प्रभा खैरे, डॉ. विनोद मुंदडा, आयएमएच्या डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. श्रीनिवास गडाफ, डॉ. सुरेश सारवडे, स्वीप अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थी जिवनात विद्यार्जन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्याच प्रमाणे आपल्या जीवनासाठी आपल्या समाजासाठी लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करणे हे सुद्धा आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युव...