Posts

Showing posts from December, 2023

क्षयरोग मुक्त भारत अभियान; लासूर येथे ५० दत्तक रुग्णांना पोषक आहार किट वाटप

        छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानअंतर्गत मराठवाडा ग्रामिण विकास संस्थेने  लासूर येथे ५० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पौष्टिक अन्नाचे किट दिले. लासूर स्टेशन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात गुरुवारी (दि.२८) हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते राजपूत, श्रीमती अन्नपूर्णा आदी उपस्थित होते. उपस्थित तज्ज्ञांनी रुग्णांना आहार व नियमित औषधोपचाराबद्दल मार्गदर्शन केले. ०००००  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने दि.९ रोजी निवड

        छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  विकास महामंडळ (मर्या.) मार्फत राबविल्या जानाऱ्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गत प्राप्त अर्जांपैकी पात्र प्रकरणांमधून लाभार्थ्यांची निवड मंगळवार दि.९ जानेवारी २०२४ रोजी दु.१२ वा. करण्यात येणार आहे. अर्जदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.   लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष   तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे.   पात्र अर्जांची यादी महामंडळाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. अर्जदारांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १ लाख ५५ हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली विकसित भारत संकल्प यात्रा : सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करावे- डॉ.भागवत कराड

Image
        छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ही विविध योजनांची माहिती घेऊन गावागावांत पोहोचत आहे. आतापर्यंत ही यात्रा जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ५८८ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. अजून किमान महिनाभर ही यात्रा जिल्ह्यात असून या उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे,असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे दिले. विकसित भारत संकल्प यात्रेतील उपक्रमांचा आज आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामावत तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख ११ हजार ९७० लोकांनी यात्रेला भेट दिली. या दरम्यान ५४३१ सुरक्षा बीमा खाते, ४३८२ जीवनज्योती विम...

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; सन २०२३-२४ अर्ज करण्यास मुदतवाढ

        छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यासाठी  सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार दि.४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.             यासंदर्भात   सन २०२३-२४ साठी शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली   नाही. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रास गुरुवार दि.४ जानेवारी २०२४ रोजी सायं.सव्वा सहा वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे-४११००१ येथे सादर करावेत.             अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ( जलद दुवे-रोजगार...

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधील खेळाडुंच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आज

        छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)-   समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन  विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार दि.28 रोजी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास  करणे, त्यांनासदृढ व सक्षम नागरिक बनविणे, त्यांच्यातील क्रीडा नैपुण्य विकसित करण्यासाठी हे आयोजन केले जाते.   यंदाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 100 मी . धावणे ,200 मी . धावणे ,400 मी.धावणे , रीले 4X100 मी.लांब उडी,थाळीफेक,रस्सीखेच व खो-खो,कबडी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर विभागातील 11 शासकीय निवासी शाळांमध्ये मुलां-मुलींचे विविध क्रीडा प्रकाराचे सामने   गुरुवार दि.28 छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार आहेत.   यामध्ये जास्तीत जास्त 500 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यातील विजयी संघांची निवड करुन त्यांना   राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली. या स्पर...

डाक अदालत दि.५ जानेवारी रोजी

        छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी  डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद डाक विभागाच्या सेवांबाबत  तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल अशा तक्रारींची दखल या  डाक अदालत मध्ये घेतली जाते. तरी संबंधितांनी आपली डाक सेवेबाबतची तक्रार  प्रवर अधीक्षक डाकघर, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद -४३१००१ यांच्या नावे दोन प्रतित सोमवर दि.१ जानेवारी २०२४ पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. नंतर प्राप्त तक्रारींची दखल  घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद विभाग यांनी कळविले आहे. ०००००

लोकशाही दिन सोमवारी (दि.१ जानेवारी)

        छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिन  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी  आयोजित करण्यात येतो.  जानेवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. १जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १२ वा. होणार आहे. लोकशाही दिनासाठी लोकांचे अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात स्विकारण्यात येतील. नागरिकांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यानंतर दोन प्रतित तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या अर्जाची पोहोच पावतीही   सोबत जोडावी.   जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना अर्ज विहित नमुन्यात असावा.   तक्रार-निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. लोकशाही दिनी अर्ज दाखल करतांना न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक बाबी आनि लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज   याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे. ०००००

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना; अर्ज भरण्यास मुदतवाढ

  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- पंतप्रधान शिष्‍यवृत्‍ती (PMSS)२०२३-२४ या   योजनेचे अर्ज भरण्‍याची मुदत   दि. १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्‍यात आली आहे.   जिल्‍ह्यातील सर्व माजी सैनिक, महिला यांच्या पाल्यांनी यासंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण   कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.                                                    ०००००

जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणातर्फे तालुकास्तरावर शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

        छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत  शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सोमवार दि.१ जानेवारी २०२४ पासून या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जनार्दन विधाते यांनी कळविले आहे.   शालेय आपत्ती व्यवस्थापन   प्रशिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक याप्रमाणे-   सोमवार दि.   १ जानेवारी २०२४-   न्‍यु हायस्‍कूल   ,   करमाड ,   पद्मश्री   शंकर बापू   आपेगावकर इंग्लिश   स्‍कूल ,   हिरापुर शिवार ,   वरुड काझी ,    न्‍यु हायस्‍कूल ,   लासूर स्‍टेशन ,   गंगापुर ,   राजा शिवाजी विद्या   मंदिर ,   बजाजनगर ,   गंगापुर.   मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ -   श्री. गणेश माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय ,   देवगाव रंगारी ,   कन्‍नड , ...

जिल्ह्यात पशुधनासाठी २२.३८ लक्ष मे.टन चारा उपलब्ध; जिल्हा वार्षिक योजनेतून लागवडीमुळे अतिरिक्त उपलब्धतेचे नियोजन

Image
        छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८६१० शेतकऱ्यांना  मका, न्युट्रिफिड बाजरी, शुगर ग्रेज अशा प्रकारच्या चारा पिकाचे  ६० हजार २७० किलो बियाणे दिले आहे. त्यातून ३०१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली असून  त्यामुळे अतिरिक्त १.४१ लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. पशुधनाला लागणाऱ्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत आज आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे हे होते.  तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकरी डॉ. सुरेखा माने, उप कार्यकारी अभियंता सिंचन निरंजन मनिष, कृषी तंत्र अधिकारी चिंतलवाड, जलसंधारण अधिकारी शेख आदी उपस्थित होते. बैठकीत चारा पिकाच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. पिकपेरणी अहवालानुसार जिल्ह्यात विविध स्रोतांद्वारे २२.३८ मेट्रिक टन  चारा उपलब्ध असून  हा चारा पुढील ७-८ महिने पुरेल अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ६ लाख ३३ हजार २ इतके पशुधन असून दररोज ३३२३ मे...

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम;व्हिटीरोरेटिनल सर्जन करार पद्धतीने नेमणूकीसाठी अर्ज मागविले

        छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाअंतर्गत  जिल्हा रुग्णालयात व्हिटीरोरेटिनल सर्जरी करण्यासाठी व्हिटीरोरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. त्यासाठी एमएस/डीएनबी (ऑप्थाल्मॉलॉजी) शैक्षणिक अर्हता असणाऱ्या शल्यचिकित्सकासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  त्यांना प्रति शस्त्रक्रिया १० हजार रुपये या प्रमाणे  शुल्क अदा केले जाईल. तरी इच्छुक व्हिटीरोरेटिनल शल्यचिकित्सकाने दि.२८ डिसेंबर पर्यंत अर्ज करावा. सोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र, १०० रुपयांचा बॉण्ड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयास सादर करावा,असे जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे. ०००००

कोविड नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

        छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- कोविड च्या JN-1 हा नवीन व्हेरियंट राज्यातील काही शहरात आढळून आल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा. तसेच सर्व सुविधा, यंत्र सामुग्री, चाचणी किट, औषधीसाठा आदींबाबत खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज येथे दिले. अद्याप या व्हेरियंटचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्कता बाळगावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले. यासंर्द्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. अर्चना राणे, डॉ. लढ्ढा आदी ...

जि.प.कृषी विभागामार्फत अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी अनुदान; लाभ घेण्याचे आवाहन

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका ) –   जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत  अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. योजनांची माहिती याप्रमाणे- १)      डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचीत जाती प्रवर्गातील दिड लाख रुपयांपेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगीक बाबींचा लाभ दिला जातो. आवश्यक कागदपत्रेः-सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त जात प्रमाणपत्र,नविन विहिरींसाठी स्वत:च्या नावे किंवा सामुहीक ०.४- हे. जमीन, इतर लाभासाठी ०.२० हे. जमीन.,वार्षीक उत्पन्न दिड लाख   रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ नमुना,आधार कार्ड , बँक पासबुकच्या सत्यप्रती मिळणारा लाभः- नविन सिंचन...

हंगाम २०२३-२४ मध्ये नाफेडच्या वतीने तुर खरेदी; शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

Image
    छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका) -   हंगाम २०२३-२४ मध्ये नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत बाजाराभावाने तुर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी  करावी ,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी केले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी करण्यासाठी या जिल्ह्यात जाधववाडी,छत्रपती संभाजीनगर व गंगापूर येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या खरेदी केंद्रावरच तुर ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही नोंदणी बुधवार दि.१३ पासून सुरु आहे.  या केंद्रांवर जाऊन तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.के.पांडव यांनी केले आहे. ०००००

जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पिककर्ज नुतनीकरण करा- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

Image
        छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थकित पिककर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्याकरीता सध्या सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत एक विशेष कक्ष सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज दिले. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड तसेच सर्व बॅंक व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड, पिक कर्ज योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अशा शेतकऱ्यांना करावयाच्या अर्थसहाय्य योजनांचा आढावा घेतला.   बैठकीत माहिती देण्यात आली की, यंदाच्या खरिप हंगामामध्ये   (दि.३० सप्टेंबर पर्यंत) १४३२ कोटी रुपये उद्दिष्टापैकी १३१६ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप झाल...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

  छत्रपती संभाजीनगर दि. १५(जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग अंतर्गत १२ पोट जातीतील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी ३० लाख रुपये तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख रुपये इतके शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथील जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एन. एस. एफ. डी. सी. दिल्ली महामंडळामार्फत येत असलेल्या शैक्षणिक कर्ज योजना सन २०२३-२४ पुर्ववत सुरु झाली आहे. या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाख रुपये   व परदेशांतर्गत शिक्षणासाठी ४० लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एन.एस.एफ.डी.सी. कडून उपलब्ध करुन देण्यात येतो. देशांतर्गत व परदेशांतर्गत शिक्षणासाठी तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे. शैक्षणिक कर्ज व्याज दर व परतफेडः- देशांतर्गत...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांमध्ये नाविन्यता व सुलभता

  छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भागभांडवलात वाढ झाली असून  मंजूर भाग भांडवलापैकी २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात प्रत्येक वर्षी १०० कोटी या प्रमाणे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येत असून  त्यात अंमलबजावणी होणे व लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नाविन्यता व सुलभता आणण्यात येत आहे. या योजनांचा संबंधित समाज घटकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना ११ जुलै १९८५ रोजी झाली आहे. महामंडळाच्या भागभांडवलात भरघोस वाढ होऊन महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १००० कोटी रुपये इतके झाले आहे. मंजूर भागभांडवला पैकी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी १०० कोटी रुपये प्रमाणे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी शासनाकडून १०० कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित १०० कोटी प्राप्त होणार आहे. या पार्श्वभुमिवर महामंडळामार्फत खालीलप्रमाणे नाविन्यता आणून सुलभता   करण्यात येत आहे.   १)एन...