Posts

Showing posts from August, 2024

अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

  छत्रपती संभाजीनगर दि. ३० (जिमाका)-    सन २०२४-२५  या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या प्रसिद्धी करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.६ सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३, चर्चपथ, पुणे-१ यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. तरी अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे. ०००००

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; सहभागाचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)-    पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात येत असून उत्कृष्ट मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने,   स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,   मुंबई यांच्या   mahotsav.plda@gmail.com   या इमेलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.             पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. दि.७ सप्टेंबर पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येक तीन व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम पुरस्कार ५ लक्ष रुपये, द्वितीय अडीच लक्ष रुपये, तृती...

महिला बचत गटाला ‘मॉल’मध्ये स्टॉल उपलब्ध करुन द्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर दि .३०( जिमाका )- महिला बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू  उपलब्ध होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.२९) बैठक पार पडली. जिल्‍हा परिषद चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी    विकास मीना , जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ,   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे, माविवेचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, डी मार्ट व्यवस्थापक अनिल जराटे, जसवंत सिंग,   फार्म फुड, देवगिरी मार्टचे   ज्ञानेश डांगे, रिलायन्स मार्टचे ज्ञानेश्वर बन्सोडे उपस्थित होते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना   म्हणले क , बचत गटांच्या महिलांना व्यवसायातून रोजगार निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार येत आहे. त्यातून महिलांचे वैयक्तिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. त्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना विस्तारीत स्वरुपात बाजारपेठ उपलब्ध करणे आवश्यक आह...

ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा मिटर दर निश्चित केले असून त्यासाठी ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दि.१५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. हे दर प्रथम दिड किमी करता २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किमी साठी १८ रुपये असे आहेत. हे दर दि.१४ सप्टेंबर २०२२ च्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्याकरीता करावयाच्या  ऑटोरिक्षा मिटर कॅलिब्रेशनसाठी प्रथम ३० नोव्हेंबर २०२२, नंतर १५ जानेवारी २०२३  अशी मुदत देण्यात आली होती. तथापि, अद्यापही ऑटोरिक्षा मिटरचे रिकॅलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. त्यामुळे आता १५ सप्टेंबर २०२४ ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीनंतर रिकॅलिब्रेशन न केल्यास दंड आकारण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. ०००००

संवाद, समन्वयातुन होईल आनंददायी गणेशोत्सव- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद, सर्व संबंधित शासकीय विभागांमध्ये समन्वय आणि समाजकंटकांवर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास यंदाचा गणेशोत्सव हा आनंददायी व निर्विघ्न होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.             लवकरच येऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक   डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा विधी अधिकारी उषा वायाळ ,पोलीस उपायुक्त महेक स्वामी, सुनील लांजेवार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.             जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कायदा सुव्यवस्था अबाधित राखून शांतता प्रस्थापित व्हावी व नागरिकांना उत्सव शांततेत अनुभवता यावा यासाठी विविध गणेश मंडळ ,पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वय...

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता; पोलीस व महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2022 या कायद्या बाबत महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.             जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक विनयकुमार, पोलीस उपाधीक्षक मेहेक स्वामी, सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना,   उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे,रामदास दौंड, एकनाथ   बंगाळे, विधी अधिकारी उषा वायाळ सर्व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी उषा वायाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२२ अंतर्गत विविध महत्त्वाची कलमे व त्या अंतर्गत देण्यात आलेले कार्यवाहीचे प्रावधान याबाबत त्यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. ०००००

जर जरी जर बक्ष दर्गाह उरूस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या - जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.29 (जिमाका) -  खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा, पाणी, वीज, एसटी बस,  स्वच्छतागृह त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जर जरी जर बक्ष उरुस यात्रेनिमित्त सुविधांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे, उरुस समिती  अध्यक्ष मोहमद याजाज, इमरान जागिरदार,  बैठकीस उपस्थित होते.                        मंत्री सत्तार म्हणाले की जर जरी बक्ष उरुसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच खुलताबाद येथील ऐतिहासिक दरवाज्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आ...

पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये - पालकमंत्री अब्दुल सत्तार

Image
  छत्रपती संभाजीनगर दि.29 (जिमाका) –   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम,   पीक विमा, पीककर्ज   यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान   कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावे, असे निर्देश पणन,अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधीना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना,वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा आढावा बैठकीमध्ये घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार,कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा महिला बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकार...

आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचा त्वरीत निपटारा करावा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छ त्रपती संभाजीनगर दि . २८ ( जिमाका )-   शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्‍दतीने करुन जलदगतीने   तक्रारी चे निराकरण करावे ,   सर्वसामान्‍य नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही.   तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्‍ये वापर करुन तक्रारीचा निपटारा त्‍वरीत करावा ,   असे निर्देश दिलीप स्‍वामी   यांनी दिले. आपले सरकार पोर्टल राज्‍यामध्‍ये प्रभावी पध्‍दतीने राबविणेकरीता   जिल्‍हाधिकारी कार्यालयात   मा . जिल्‍हाधिकारी यांच्‍या उपस्थितीत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात आले. प्रशिक्षणासजिल्‍हा परिषद चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी   विकास मीना ,     अपर जिल्‍हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे ,   निवासी उपजिल्‍हाधिकारी विनोद खिरोळकर ,   उपजिल्‍हाधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे ,   मंत्रालयातील ई   गव्‍हर्नन्‍स तज्ञ   देवांग दवे ,   हर्षल मंत्री   तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा 100 टक्‍के निपटारा व्‍हाव...