Posts

Showing posts from March, 2026

खुलताबाद कडे जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- येत्या २ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदीर येथे हनुमन जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त तेथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे तेथे रहदारी सुरळीत रहावी यासाठी या मार्गावरील जड वाहतुक मार्गात दि.१ ते ३ एप्रिल या कालावधीकरीता बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत. बदलेले वाहतुक मार्ग याप्रमाणे- १.        कन्नड, वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने   कन्नड, वेरुळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरनापुर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील. २.       छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी,   कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील. ३.       फुलंब्री, सुलतानपुर, खुलताबाद, वेरुळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीव...

ग्रामीण भागात मनाई आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १)    व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. ३१ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान हे आदेश अंमलात राहतील , असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर , दि.३० ( जिमाका)-   घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला गॅस सिलींडर हे घरपोच डिलीव्हरीद्वारेच पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.               गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. लोकांना सिलींडर मिळविण्यासाठी हाल सोसावे लागत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी गॅस पुरवठादार संस्थांची बैठक बोलावली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान तसेच रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते. जिल्ह्यात गॅसचे बुकींग वाढले आहे. युद्धाच्या पार्श्वभुमिवर हे बुकींग वाढले असून दिलेल्या मुदतीत लोकांना सिलींडर घरपोच दिले जात आहे. मार्च, एप्रिल महिन्यात असणाऱ्या सरासरी पुरवठ्या इतकीच मागणी होत असल्याचे कंपनीचे प्रतिनिधी   यांनी निदर्शनास आणले...

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड; गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

  छत्रपती संभाजीनगर , दि.३० ( जिमाका)-   जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड करण्यासाठी  गुरुवार दि.२ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी २ वा. होणार आहे. निवड प्रक्रिया सकाळि १० वा. पासून सुरु होणार आहे,असे या सभेचे पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.             पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि.२ एप्रिल रोज ही विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यलयातील नियोजन सभागृहात होणार आहे.             या विशेष सभेचा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळात नामनिर्देशन स्विकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात. प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल. त्यानंतर समिती सभापती निवडणूकीसाठी ए...

सेवा सुधारणांचा १५० दिवसांचा कार्यक्रम; ‘सेवाकर्मी प्लस’ मध्ये जि.प. छत्रपती संभाजीनगर राज्यात अव्वल: मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत

Image
  छत्रपती संभाजीनगर , दि.२८ ( जिमाका)-   राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतांनाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल आज मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेवाविषयक प्रगतीचे मुल्यांकन करणे व सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरीता १५० दिवसांचा कार्यक्रम दि . ६ मे ते दि . २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. तथापि, राज्यातील पुरपरिस्थितीमुळे या कार्यक्रमास दि . १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती . काय होते या कार्यक्रमात? या कार्यक्रमात प्रशासकीय सुधारणांमध्ये मनुष्यबळ विषयक बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्य...

विशेष लेखः- जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरची ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

Image
           कोणतीही संस्था असो त्याचे मनुष्यबळ ही त्याची सर्वात मोठी शक्ती असते. प्रशासकीय संस्था त्यातही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या थेट लोकांना सेवा देत असतात, अशा ठिकाणी मनुष्य बळ हे मोठे बलस्थान ठरते. याच मनुष्यबळाच्या सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल आज (शनिवार दि.२८) मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. काय होता हा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम? हे या लेखाद्वारे जाणून घेऊ या. १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक , गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५०दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम देण्यात आला होता. या कार्यक्रमाचा कालावधी दि ...

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक: तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
    छत्रपती संभाजीनगर , दि.२७ ( जिमाका)-   जिल्ह्यात येणारा पेट्रोल डिजेलचा साठा हा पूर्वी इतकाच किंबहुना थोडा जास्तच आहे. असे असतांना पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत. मागणी व पुरवठा यात वितरक कंपन्या आणि पेट्रोलपंप चालक यांच्या दरम्यान असलेल्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढून वितरण सुरळीत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पेट्रोलियम वितरण कंपन्या व पेट्रोलपंप चालक यांना दिले.             जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या गेल्या दोन दिवसांपासून रांगा लागलेल्या दिसत आहेत. ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत घटकांबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती.             बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, लेखाधिकारी पी.पी. होळकर, सहा. पुरवठा अधिकारी संदीप शिंदे,भारत पेट्रोलियमचे शशांक तिवारी, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अजयकुमार सिन्हा, इंडियन ऑईलचे गणेश खेत्री त...

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ: क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

Image
    छत्रपती संभाजीनगर , दि.२७ ( जिमाका)-   कामकाजातील तणाव घालविण्यासाठी क्रीडा व कलागुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्पर्धांमधील आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केले. विभागीय क्रीडा संकूल येथे आज महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगिता राठोड, संगिता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आपल्या दैनंदिन जगण्यात   खिलाडुवृत्तीने जगायचे असते, त्या खिलाडुवृत्तीची जोपासना अशा स्पर्धांमुळे होते. त्यामुळे वातावरण सकारात्मक होऊन निकोप स्पर्धा निर्माण होते. क्रीडा...