Posts

Showing posts from April, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, रामदास दौंड, एकनाथ बंगाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. ०००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- ‘घर घर संविधान’ अभियानाचा उपक्रम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेच्य कोनशिलेचे अनावरण आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रवेशद्वारा जवळ ही उद्देशिकेची कोनशिला स्थापित करण्यात आली आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय  केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,  एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची यावेळी उपस्थिती होती. ०००००

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय  केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,  एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची उपस्थिती होती.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होईल.             राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्...

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात; शांतता अबाधित ठेवून प्रगतीकडे वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- दहशतवादाचा सक्षमतेने मुकाबला करत असतांना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करीत आहे. न्याय, समता, शांतता, बंधुता या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करत नागरिकांनी  सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.             महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.             विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, खा. संदिपान   भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक...

घर घर संविधान: राज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून आपल्या सगळ्यांना समता न्याय आणि अधिकार दिला आहे.  या राज्यघटनेबद्दल विदेशात कमालीचा आदर आहे. आपण प्रत्येकाने या राज्यघटनेचा अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात घर घर संविधान अभियानांतर्गत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत या कार्यक्रमास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, रामदास दौड तसेच सर्व विभागप्रमुख व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.    ...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज(दि.१ मे) पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे गुरुवार दि.१ मे रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होईल.             राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी १० वा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन होईल. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कक्षाद्वारे   रुग्णांना वैद्यकीय उपचारकरिता अर्थसह्याय सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या प...

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत चालविली जाते. जिल्ह्यात असे १४० लाभार्थी जोडपे होते. त्यांना प्रति जोडपे ५० हजार रुपये या प्रमाणे ७० लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी दिली आहे.             समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत जिल्ह्यात १४० लाभार्थी पात्र होते. त्यांना लाभ देण्यासाठी ७० लक्ष रुपयांची तरतूद प्राप्त झाली होती. ७२ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती. मात्र ५६ लाभार्थ्यांचे ॲप्रुव्हल दि.३१ मार्च रोजी कालबाह्य झाले होते व १२ लाभार्थ्यांना बॅंकेकडून ॲप्रुव्हल मिळाले नसल्याने ६८ लाभार्थ्यांच्या लाभाची तरतूद शासनास परत गेली होती. तथापि, प्रादेशीक उपायुक्त दीपक खरात, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना याबाबत समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शि...

महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००  

विशेष लेख अति उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सल्ला

  काय करावे? जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या (तहान लागली नसली तरीही), प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा, लिंबू, पाणी, ताक / लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये घ्यावे. टरबुज, खरबुज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या, पातळ, सैल, सुती आणि शक्य तो हलक्या रंगाचे कपडे घालावे, तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री,टोपी,टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा, उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात, रेडिओ, टीव्ही वर प्रसारीत होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) website https://mausam.imd.gov.in यावर हवामान विषयी अद्ययावत माहिती घेत राहावे, हवेशीर आणि थंउ ठिकाणी जास्त वेळ घालावा, थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात, जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि...

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३  प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो – लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उडाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.२ मे २ जून पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आदेश निर्गमित केले आहे. ०००००

प्रतिबंधात्मक आदेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) – आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी    विनोद खिरोळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून    दि.८ मे पर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील जुने निरुपयोगी साहित्य विक्रीस उपलब्ध

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- येथील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील जुने, निरुपयोगी भांडार साहित्य निर्लेखित करुन विल्हेवाट लावायचे आहे. त्यासाठी हे साहित्य धर्मादाय सह आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बाबा पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे. भांडार साहित्य दि.५ मे पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ६) वाजेपर्यंत पाहता येणार आहे. दिलेल्या कालावधीत साहित्याचे दर या कार्यालयास कळवावे. दर कळविताना लाकूड, लोखंड व फायबर, रद्दी (पुठ्ठे व कागद) यांचे दर प्रति किलोप्रमाणे व गाडीचे टायर प्रति नगाप्रमाणे दर कळवावे. जास्तीतजास्त दर असणाऱ्या फर्मचा विचार करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. साहित्य निर्लेखन व विक्री करण्याचे सर्व व रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत,असे धर्मादाय सह आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय धर्मादाय उप आयुक्त यांनी कळविले आहे. ०००००

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर या जिल्ह्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला, मुलींना इयत्ता १ ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.             योजनेचा लाभ देऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधित छायाकिंत प्रत व दारिद्रय्‍ रेषा अनुक्रमांक नमुद करावा.   पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख रुपये एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समंतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्य...