Posts

Showing posts from March, 2025

सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमदेवारांसाठी  छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाची सुविधा करण्यात येते. येत्यादि.५ ते १४ मे या कालावधीत याबाबतचे प्रशिक्षण क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था निः शुल्क करण्यात येते. या संधीचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दि.३ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी   सैनिक कल्याण विभागाच्या www.mhasainik.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर जाऊन (Other – PCTC Nashik SSB-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यंचा ईमेल आयडी – training.petcnashik@gmail.com   व दूरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सएप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प...

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

  छत्रपती संभाजीनगर, दि.29(जिमाका) :-   136 च्या इन्फंट्री टेरिटोरियल आर्मी पर्यावरण, महार बटालियन मध्ये  21 ते 23 एप्रिल   2025 या कालावधीत एसआरपीएफ कॅम्प ग्राऊंड धुळे शहर, धुळे येथे माजी सैनिक व वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्याम्साठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी शारीरिक निकष आणि वैद्यकीय तपासणीसाठी सर्व कागदपत्रांसह दि.21 एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वा. भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे,असे आवाहन लेफ्ट. प्रभु  अमित सी. यांनी केले आहे. या भरतीप्रक्रियेत शिपाई जनरल ड्युटी पद -44 फक्त महाराष्ट्रातील माजी सैनिक आणि केंद्र सरकार पर्यावरण मंत्रालय, आणि वन विभाग, महाराष्ट्र सरकार निवृत्त महिला कर्मचारी यांच्या साठी; कारकून पद – 6, आचारी पद – 1, नाभीक पद – 1, मसालची पद – 1, वेटर पद – 1, लोहार पद – 1, पात्रता : माजी सैनिक आणि सेवानिवृत्त महिला(वन व पर्यावरण विभाग) वयोमर्यादा 50 वर्षापेक्षा जास्त नसावी.   माजी सैनिक (केवळ पेन्श्नधारक) साठी किमान वयोमर्यादा नाही परंतु सेवानिवृत्ती नंतर 5 झाली नसावीत.   पर्यावरण मंत्रालय, केंद्र स...

भारतीय सैन्य भरती रॅली; ऑनलाईन नोंदणीची सुविधा

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अधिसूचना अप्रकाशित करण्यात आली असून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा सैन्य दलाच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती याप्रमाणे- ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) : सर्व उमेदवारांसाठी नामांकित केंद्रांवर CEE परीक्षा होईल. अग्निवीर लिपिक/SKT श्रेणीसाठी टायपिंग चाचणी देखील घेतली जाईल. CEE उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती रॅलीदरम्यान शारीरिक चाचणी आणि मापन चाचणी होईल. ॲडाप्टेबिलीटी चाचणीसाठी उमेदवारांनी उमेदवारांनी यापूर्वीच कार्यरत असलेला स्मार्ट फोन, पुरेशी बॅटरी आणि 2GB डेटा सोबत आणणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी दि.१० एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. अग्निवीर उमेदवारांसाठी विशेष सुविधा: उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन श्रेणींसाठी अर्ज करू शकतो. दोन पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना दोन्ही गटांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतील व प्रत्येक श्रेणीसाठी वेगळी CEE परीक्षा द्यावी लागेल. मात्र, फक्त एकदाच भरती रॅली व वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल...

वैद्यकीय परिषद निवडणूक गुरुवारी(दि.३ एप्रिल)

  छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र.७२/२०२४ प्रकरणातील निकालानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर एकूण ९ (नऊ) सदस्य निवडणूकीसाठी गुरुवार दि.३ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना कळविण्यात आले आहे की, वैद्यकीय परिषद निवडणूक – २०२५ या निवडणूकीकरीता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे दि.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी झालेले व नोंदणीचे नुतणीकरण केलेले वैद्यकीय व्यावसायिक हे मतदार आहेत. मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ४३५२ मतदार या निवडणूकीमध्ये मतदान करण्यास पात्र आहेत. प्रत्येक मतदारांस एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. निवडणूक कार्यक्रमाची सुचना निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत शासन राजपत्रात दि.१७ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणूकीकरीता एकूण ४१ उमेदवार रिंगणात आहेत.जिल्ह्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची नावे समाविष्ट असलेली मतदार यादी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून पुरविण्यात येणार आहे. मतदा...

इलेक्ट्रिक वाहन रॅली उद्या (दि.२९):प्रदूषणमुक्त भविष्यासाठी पुढाकार

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) आणि ऊर्जा दक्षता ब्युरो (BEE) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२९ रोजी इलेक्ट्रिक वाहन रॅली आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता टी.व्ही. सेंटर मैदानावरून ही रॅली सुरू होईल आणि क्रांती चौक येथे समारोप होईल. या रॅलीचे उद्घाटन अपारंपारीक उर्जा मंत्रीनअतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे. जास्तीत जास्त ई- वाहनांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाट यांनी केले आहे. ई-वाहनांचा प्रसार आणि प्रोत्साहन इंधनावर असलेले परकीय अवलंबन कमी करून स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. भारत हा चीननंतर सर्वाधिक फॉसिल फ्युएल आयात करणारा देश आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ई-वाहनांना प्रोत्साहन देणे आणि चार्जिंग सुविधांचा विस्तार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, चार्जिंग सुविधा, गुंतवणूक आणि संशो...

निवृत्तीवेतनास विलंबाची शक्यता

  छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विहित कालावधीपेक्षा २-३ दिवस विलंब होण्याची शक्यता असल्याचे सहा. संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा बुरकुले यांनी कळविले आहे. तरी निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. ०००००

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना; कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्‍वाभिमान योजने अंतर्गत कन्‍नड तालुक्‍यातील ६० लाभार्थ्‍यांना सोडत पद्धतीने एकुण ९१ हे ०१ आर (२१२ एकर २६ गुंठे) जमीन वाटप करण्‍यात आली. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील दालनात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाठ, वरिष्‍ठ समाज कल्‍याण निरीक्षक श्रीमती सीमा सिंदीकर यांच्‍या उपस्थितीत नीदा नवीद खान वय ५ वर्ष या मुलीच्‍या हस्‍ते सोडत काढण्यात आली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत मागासवर्गीय संवर्गातील भुमिहिन शेतमजूरांना ही जमिन शेतीसाठी   १०० टक्‍के   अनुदानावर देण्‍यात येते. अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील दारिद्ररेषेखालील भुमिहिन कुटूंब सन २०२१-२०२२ पासुन लाभ मिळण्‍याच्‍या प्रतिक्षेत होते. त्यासाठी समाज कल्‍याण विभागाने सन २०२२-२३, २०२३-२४ व चालु वर्षात जमीन खरेदी करुन लाभार्थ्‍यांना लाभ देण्यात आला. याकामी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी आज कन्नड उपविभागीय...

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून १६२ उमेदवारांची निवड

छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय  रोजगार मेळावा आज मुकुंदवाडी येथे पार पडला. या मेळाव्यात नोकरीसाठी १६२ उमेदवारांची प्राथमिक तर ७२ जणांची अंतिम निवड झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे. मेळाव्यात उपस्थित उद्योजक प्रतिनीधींनी आपल्याकडील रिक्तपदांची माहिती देऊन कामाचे स्वरुप व यातून उमेदवारांची होणारी प्रगती याविषयी माहिती दिली.   या रोजगार मेळाव्यामध्ये रत्नप्रभा मोटर्स, बी जी ली - ईन इलेट्रिकल्स, अलंकार ग्रूप, समर्थ इलेक्ट्रोकेअर, एम.कांतीलाल क्लॉथ स्टोअर्स, धुत ट्रान्समिशन प्रा.लि., मेडिरिक्रुटर्स आणि कुशल पॅथॉलॉजी लॅब, सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., धनंजय ग्रुप, आर्म्स प्रा.लि., प्रथम एजुकेशन फांऊडेशन     इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी सहभाग दर्शवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात १६२ उमेदवारांची प्राथमिक तर ७५ उमेदवारांनी अंतिम निवड झाली. ०००००

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी; 4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था

  छत्रपती संभाजीनगर,दि.26(जिमाका)- संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी आणि सीडीएस ही परीक्षा रविवार दि.13 एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षांसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर 4447 उमेदवार प्रविष्ठ होणार आहेत,अशी माहिती जिल्हा पर्यवेक्षकीय समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सामान्य श्रीमती संगीता राठोड यांनी दिली आहे. संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत जिल्हा केंद्रावर रविवार दि.13 एप्रिल रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी (एन. डी.ए.)आणि सीडीएस परीक्षा 2025 होणार आहे. एनडीए परीक्षा एकूण 12 उपकेंद्रावर होईल. ह्या परीक्षेचे पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी साडेबारा तर दुसरे सत्र दुपारी दोन    ते साडेचार वाजेपर्यंत असेल.   सीडीएस परीक्षा एकूण 2 केंद्रांवर व तीन सत्रात होईल. पहिले सत्र   सकाळी 9 ते 11 वा. पर्यंत व दुसरे सत्र    दुपारी 12 ते दुपारी 2 वा. पर्यंत तर तिसरे सत्र दुपारी 4 ते सायं.6 वाजेपर्यंत    होईल. एकूण 14 उपकेंद्रावर या दोन्ही परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण...

जिल्हा कार्यकारी समितीची बैठक: कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करा-जिल्हाधिकारी स्वामी

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- कारागृहातील कैद्यांना बंदिवासात कौशल्य प्रशिक्षण दिल्यास त्यांचे पुढील आयुष्यात पुनर्वसन करणे अधिक सुकर  होईल. त्याकरीता जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा कौशल्य विकास आराखड्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, उद्योग निरीक्षक ए.एस. जरारे, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ.अनिता जिंतुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक पी.बी. दुर्गे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा समन्वयक सुचिता खोतकर, अटल इंक्युबेशन सेंटरचे संचालक वैभव खैरनार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभिजीत अल्टे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीवास्तव, तंत्रनिकेतन विद्यालयाचे खराळ, सीपेट प्रशिक्षण संस्थेच्या मौसम चौधरी,...

सोमवारी (दि.७ एप्रिल) लोकशाही दिन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. एप्रिल महिन्यासाठी सोमवार दि.७ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.७ रोजी दुपारी १२ वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपले अर्ज, निवेदने  सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार वैयक्तिक असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ०००००

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- आधार कार्डसाठी मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट (MBU) करणे आवश्यक असून, नागरिकांनी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अद्यावतीकरण कोणाला आवश्यक ज्या बालकांचे ० ते ५ वयात आधार कार्ड तयार झाले आहे, त्यांना ५ ते ७ वर्षे वयात बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, १५ ते १७ वर्षे वयोगटातील युवकाचे देखील बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक आहे. ४ लाख ५१ हजार ५३६ जण अद्यावतीकरणास पात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण २,६६,४२९ पाच ते सात वर्षे वयोगटातील बालक आणि १,८५,१०७ पंधरा ते सतरा वर्षीय युवक   असे एकूण ४ लाख ५१ हजार ५३६ बालक व युवक आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरणासाठी पात्र आहेत. अद्यावतीकरण विनामूल्य आधारच्या नियमांनुसार, हे अद्ययावत करणे विनामूल्य असून नागरिकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यासाठी नागरिकांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन आपली बायोमेट्रिक माहिती अद्यावत करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन कर...

जीएसटी अभय योजना; लाभ घेण्याचे आवाहन; कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये जीएसटी करदात्यांसाठी मोठा दिलासा देत ‘जीएसटी अभय योजना २०२४’ जाहीर केली आहे. यानुसार, २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरीता ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजीत राऊत यांनी केले आहे. ही योजना कलम ७३ आणि १२८ अ अंतर्गत लागू केली असून, करदात्यांनी ठराविक मुदतीत रक्कम भरल्यास व्याज व दंडाची माफी मिळणार आहे. कोण लाभ घेऊ शकतो? २०१७-१८, २०१८-१९ आणि २०२१९-२० या आर्थिक वर्षांत कलम ७३ अंतर्गत कर थकबाकी असलेल्या करदात्यांसाठी ही योजना लागू असेल. ज्या प्रकरणांमध्ये कलम ७४ अंतर्गत नोटीस किंवा आदेश जारी झाला आहे आणि तो अंतिम नाही, अशा प्रकरणांसाठीही ही योजना लागू करण्यात आली आहे. महत्त्वाच्या तारखा ३१ मार्च २०२५ – जीएसटी कराची थकबाकी भरण्याची अंतिम तारीख. ३० जून ...

मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शानाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) मध्य विभाग, यांच्या सहकार्याने कारागृहातील बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा ते कारागृहात मुक्त झाल्यावर समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे या करीता मंगळवार दि.२५ ‘ जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध लोककला, भारुड, देशभक्तीपर गीत, नृत्य या सारख्या विविध कलांचा समावेश होता. या आयोजनात अधीक्षक मध्यवर्ती कारागृह दत्तात्रय गावडे, वरिष्ठ तुरंगाधिकारी प्रदीप रणदिवे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक अनिल घोगरे तसेच त्यांचा म्युझिकल ग्रुप आणि मोठ्या संख्येने बंदीजन अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. ०००००

पंडीत दीनदयाळ रोजगार मेळावा आज (दि.२६)

          छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बुधवार दि.२६ रोजी सकाळी साडेनऊ वा. संत रोहिदास आरोग्य केंद्र, संजयनगर, मुकुंदवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त वराडे यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये रत्नप्रभा मोटर्स, चिकलठाणा, बी.जी. लीन इलेक्ट्रीकल्स लि., ग्रीव्हज कॉटन प्रा.लि. शेंद्रा, अलंकार इंजिनीअरींग इक्वीपमेंट प्रा.लि., समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा.लि. एम. कांतिलाल क्लॉथ स्टोअर्स (साकला युनिफॉर्म), धूत ट्रान्समिशन प्रा.लि., मेडीरिक्रूटर्स आणि कूशल पॅथॉलॉजी लॅब, अश्फा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि., सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि. इ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांचे प्रतिनीधी ५०४ वेगवेगळ्या रिक्तपदांकरीता मुलाखती घेतील. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्य...

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ; वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- वैध मापन शास्त्र अधिनियम – २००९  अन्वये कोणत्याही प्रकारच्या वजने मापांमध्ये अचुकता असणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे अप्रमाणित वजनमापे वापरुन व्यवहार करणे म्हणजे ‘मापात पाप’. असे केल्यास शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तरी  प्रत्येक दुकानदार, पेट्रोलपंप चालक तसेच अन्य सेवा देणाऱ्या पुरवठादारांनी आपल्याकडील वजन मापे, तोलन उपकरणे आदी तपासून त्याची अचुकता पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन  उपनियंत्रक वैध मापन शास्त्र शिवहरी मुंडे यांनी केले आहे. भारताच्या संसदेने वैध मापन शास्त्र अधिनियम – २००९   अंमलात आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून वैध मापन शास्त्र अधिकाऱ्या मार्फत या अधिनियमाची व त्याखालील विविध नियमांची अंमलबजावणी केली जाते. वजन मापांची अचूक पडताळणी व आवेष्टीत वस्तू नियमांची अंमलबजावणी हे या अधिकाऱ्यांचे प्रमुख काम आहे. मापात पाप केल्यास शिक्षेची तरतूद   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली   कार्यरत असलेल्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या निरीक्षक, सहायक न...