Posts

Showing posts from January, 2024

मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंदा काळे यांचा दौरा कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे हे  आयोगाच्या कामकाजासाठी  मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत.  त्या अनुषंगाने सोमवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांसमवेत  बैठक घेणार आहेत. ०००००

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची योजनाः गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):- विभागातील व जिल्ह्यातील सहकारी दुध संघ, खाजगी प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी  प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती  प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी रि. भा. मते यांनी दिली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे ईअर टॅगींग मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दुध पुरवठा करणाऱ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगींग करुन घ्यावे,असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत   राज्यातील सहकारी   दुध उत्पादक संघ, खाजगी प्रकल्प यांना गाईचे दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय दि.५ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे.   ही योजना दि.११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने संबंधित संघ व खाजगी प्रकल्प यांनी   ३.५ फॅट/८.५ एस...

राष्ट्रीय मतदार दिवस: सर्वांगिण उन्नतीसाठी लोकशाही व्यवस्था आवश्यक- डॉ. सुधीर गव्हाणे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):-   लोकशाही व्यवस्था म्हणजे वंचितांना सत्ता, प्रतिष्ठा आणि प्रगतीची संधी देणारी व्यवस्था. आपल्या देशात महिलांचे सबलीकरण, प्रत्येक माणसाला समान मताचा अधिकार अशा अनेक अधिकारांची प्राप्ती लोकशाहीमुळेच होऊ शकली. लोकशाही व्यवस्था ही सर्वांगिण उन्नतीसाठी आवश्यक असणारी व्यवस्था आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक, माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी  प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, प्रभोदय मुळे, अर्चना खेतमाळीस, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले,  सुचिता शिंदे, प्रगती चोंडेकर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देण्यात आली. निलेश कड वर्षिप अर्थ फाऊंडेशन यांच्या वतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. मतद...

प्रजासत्ताक दिनःमुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज (दि.२६) पालकमंत्र्यांच्या हस्ते

  छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):-  प्रजासत्ताक दिनाचा  मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. देवगिरी मैदान येथे होणार आहे. राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या शुभ हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते,शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले आहे. मुख्य शासकिय सोहळ्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी ध्वजारोहणाचे कोणतेही शासकीय, अर्धशासकीय समारंभ सकाळी साडेआठ ते १० वा. दरम्यान आयोजित करु नये. अशा संस्थांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम   सकाळी साडेआठ वा. पूर्वी किंवा १० वा. नंतर आयोजित करावे असे उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी कळविले आहे. ०००००

वेरुळ अजिंठा महोत्सव कालावधीत सोनेरी महाल परिसरात ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरास मध्यरात्रीपर्यंत परवानगी

  छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):-   वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या दि.२,३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या कालावधीत  सोनेरी महाल परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत  ध्वनिक्षेपक – ध्वनिवर्धक ध्वनिची विहित मर्यादा राखून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश  प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी निर्गमित केले आहेत. ०००००

गावनिहाय पाझर तलाव, तलाव, नाले इ. जलस्रोतांची माहिती कळवा-डॉ.अरविंद लोखंडे

  छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):-   प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसेवकामार्फत  आपापल्या गावातील जलस्रोत, तलाव, पाझर तलाव, नाले, नदी इ. विषयी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  अथवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या कार्यालयास कळवावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार टप्पा २ व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजय शिंदे,   कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे घुगे आदी उपस्थित होते. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात गाळ उपलब्ध असणारे नाले, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तलाव आदी स्रोतांबद्दल ग्रामसेवकांमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात पाठवावी,असे आवाहन करण्यात आले आहे. ०००...

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४; मॅरेथॉन स्पर्धा, ग्रामसभेचे आयोजन

              छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत  ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४’ राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी पुण्यतिथी दि.३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी  दरम्यान कुष्ठरोग पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.  त्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेतून जनजागृती स्पर्श या कुष्ठरोग जनजागृती अभियानानिमित्त प्रजासत्ताक दिन दि.२६ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत ध्वजारोहणानंतर आयोजित ग्रामसभेत जिल्हाधिकारी महोदयांच्या घोषणापत्राचे वाचन,सरपंच, कुष्ठरोग निर्मूलनाबाबत शपथ, कुष्ठरुग्णाचे मनोगत. पथनाट्य आदी विविध उपक्रमाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धा स्पर्श या कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात   सकाळी ७ वा. विभागीय क्रीडा संकूल ते गजानन महाराज मंदिर, गारखेडा चौक व परत विभागीय क्रीडा संकूल अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्याना पारितोषिके व प्रशस्तीपत्रे द...

विशेष लेख- महिला व बालविकास विभागाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

     छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ अथवा ज्या बालकांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशा बालकांचे संगोपन करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविली जाते. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा,असे आवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केली आहे. योजनेचे स्वरुप - या योजनेअंतर्गत दि.१ एप्रिल २०२३   पासुन २२५० रुपये प्रति बालक प्रति महिना लाभ दिला जातो. हा लाभ बालकाच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत देण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी   जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच तालुकास्तरावर संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), अभय केंद्र, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे करावा. लाभार्थी निकषः- १) अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक घेणे शक्य होत नाही, अशी बालके, २) एक पालक असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर अजार, पालक रुग्नालयात असणे इ. कारणामुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटूंबातील बालके,...

शासकीय कर्मचाऱ्यांचा माहिती कोष; माहिती अद्यावत करण्याचे आवाहन

     छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडुन महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहिती कोषासाठी जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातील कर्मचअऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करावी,असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी केले आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययीआस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि. ०१ जुलै २०२३ या संदर्भ दिनांकास अनुसरून गोळा करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वकष माहितीकोष २०२३ ऑनलाईन नोंदणी केलेली माहिती संगणकीय आज्ञावली   https://mahasdb...

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल, तलवारबाजी स्पर्धा; विभागीय क्रीडा संकूल येथे दि.२८ पासून आयोजन

Image
            छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- राष्ट्रीय शालेय सॉफ्ट बॉल व राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन विभागीय क्रीडा संकूल येथे करण्यात येणार आहे. शालेय सॉफ्ट बॉल स्पर्धा दि.२८ जानेवारी ते दि.१ फेब्रुवारी या दरम्यान तर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी   बाजीराव देसाई यांनी दिली आहे.   यास्पर्धांच्या आयोजनासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस   महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी   संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या आदी उपस्थित होते. राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल (१९ वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा दि.२८ जानेवारी ते दि.१ फेब्रुवारी या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित केल्या आहेत. या स्पर्धेत...

लोकशाही दिन सोमवारी (दि.५ फेब्रुवारी)

  छत्रपती संभाजीनगर,दि.२४(जिमाका)-   जिल्हास्तरीय लोकशाही दिन   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी   आयोजित करण्यात येतो.   फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १२ वा. होणार आहे. लोकशाही दिनासाठी लोकांचे अर्ज सकाळी ११ ते १२ या वेळात स्विकारण्यात येतील. नागरिकांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यानंतर दोन प्रतित तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या अर्जाची पोहोच पावतीही    सोबत जोडावी.    जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करतांना अर्ज विहित नमुन्यात असावा.    तक्रार-निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. लोकशाही दिनी अर्ज दाखल करतांना न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक बाबी आणि लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज    याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे. ०००००  ...

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा रविवारी (दि.२८)

  छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):-     महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि.२८ रोजी  महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन परीक्षा केंद्रांवर ६२४ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी ८८ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती   उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळात होणार आहे. परीक्षा केंद्र याप्रमाणे- १.        एमजीएम पॉलिटेकनिक महाविद्यालय, एन ६, सिडको, सेंट्रल नाक्याजवळ, छत्रपती संभाजीनगर-४३१००३ येथे २८८ परीक्षाथी. २.        एमजीएम जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालय, एन ६, सिडको, छत्रपती संभाजीनगर-४३१००३  येथे ३३६ परीक्षार्थी.   परीक्षार्थींसाठी सुचनाः- परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट...

भाषा संचालनालयातर्फे आज (दि.२५) परिसंवाद

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त भाषा संचालनालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ' मराठी भाषा आणि संस्कृति विकासाच्या माझ्या कल्पना', या विषयावर गुरुवार दि.२५ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे,असे विभागीय सहायक भाषा संचालक बा. उ. जगताप यांनी कळविले आहे.   ना. गो. नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे दि.२५ रोजी सायं. साडेपाच वा. हा परिसंवाद होणार आहे. परिसंवादास उपस्थित रहावे असे आवाहन   अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, भाषा संचालक   विजया डोनीकर यांनी केले आहे. ०००००

पत्रपरिषद: येत्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – डॉ.अरविंद लोखंडे

Image
  छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):-   लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा , असे आवाहन छत्रपती संभाजीनगर चे  प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले. अंतिम मतदार यादी प्रकाशनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांचीही यावेळी उपस्थिती होती। डॉ. लोखंडे म्हणाले की, मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण , बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही , अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. मतदार यादीत नांव तपासणी साठी Voter Help Line App किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्‍थळाचा वापर करता येतो. आपले नाव , पत्ता , लिंग , जन्मदिनांक , वय , ओळखपत्र क्रमांक , मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. ८ भरावा. दिनांक २३.०१.२०२४ पासून निरंतर मतदार नोंदणी सुरू...

महासंस्कृती महोत्सव नियोजनासाठी आज (दि.२५) कलावंतांची बैठक

Image
              छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जिल्हास्तरावर महासंस्कृती हा महोत्सव आयोजित करावयाचा असून या आयोजनासाठी गुरुवार दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित बैठकीस कलावंतांनी उपस्थित रहावे,असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीने नियोजन करावयाचे आहे. महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शक विविध  कार्यक्रम,लोककलांचे सादरीकरण , पोवाडा, भरुड, गोंधळ इ. लोककलाप्रकारंना चालना देणारे कार्यक्रम समाविष्ट असणार आहेत. या महोत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी  जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंत, रंगकर्मी, दिग्दर्शक, नाटककार, संगितकार, गायक, वादक, नर्तक इ. क्षेत्रातील मान्यवरांनी , जाणकार व्यक्तिंनी गुरुवार दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अर...

रमाई आवास योजना (शहरी) साठी ८६.६० कोटी रुपयांचा निधी वितरीत- श्रीमती जयश्री सोनकवडे

Image
              छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):- रमाई आवाज योजना (शहरी) साठी  समाज कल्याण विभाग , छत्रपती संभाजीनगर मार्फत सन २०२३ -२४ वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण ८६ कोटी ६० लक्ष रुपयांचा  निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी   दिली   . यामुळे ३७४४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ होईल. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी   प्रादेशिक उपायुक्त , समाज कल्याण विभाग , छत्रपती संभाजीनगर मार्फत रमाई आवास योजना (शहरी)   १९.७७५ कोटी , जालना जिल्ह्यासाठी १० कोटी , बीड जिल्ह्यासाठी   ११.९५ कोटी तर परभणी जिल्ह्यासाठी ४४.८७५ कोटी   असा एकूण ८६ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यातून ३७४४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ होईल, अशी   माहिती श्रीमती जयश्री सोनकवडे ,   प्रादेशिक उपायुक्त , समाज कल्याण विभाग , छत्रपती संभाजीनगर   यांनी   दिली   आहे.           सामाजिक न्य...

पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात होतील सहभागी :पर्यटनमंत्री गिरीश महाजन

Image
      मुंबई,दि.१८: राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.युवा नवेली देशमुख या राज्यभरात पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी नक्कीच चांगली कामगिरी बजावतील, पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टीवल २०२४ मध्येही प्रचार व प्रसिध्दीमध्ये सहभागी आहेत   अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी   दिली.               पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले की,महाराष्ट्र राज्याला ७२० किमीचा लाभलेला समृध्द समुद्र किनारा ,उत्कृष्ट प्राचीन मंदिरे,अजिंठा वेरूळ सारखी इस.सन पूर्व दुस-या शतकात लेणी,वन्यजीव,थंड हवेची ठिकाणे,राज्यातील विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत.राज्यात देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे हाच विचार...