पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (दि.२)
छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिले बालकुमार साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत द जैन इंटरनॅशनल स्कूल,संग्रामनगर उड्डाणपूल जवळ संभाजीनगर–उदगाव रस्त्याजवळ, शाहनूरवाडी, बीड बायपास येथे संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, वाचन-संस्कृती रुजवणे तसेच बालसाहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्ती व सर्जनशीलतेला चालना देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. सकाळचे सत्र : ग्रंथदिंडी व उद्घाटन कार्यक्रम सकाळी ८.०० ते ८.३० या वेळेत नाव नोंदणी होणार असून ८.३० ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडी उद्घाटन मा. डॉ. राजेंद्र कावळे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुनिता राठोड (वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण) उपस्थित राहणा...