राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम: जिल्हा कृती आराखडा विमोचन

 







छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा धोरणात्मक आराखडा (District Straegic Plan) दि.4 ऑक्टोंबर 2023 रोजी  मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कुष्ठरोगा सारख्या जुनाट रोगाला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. कुष्ठरोग हा एक सांसर्गिक त्वचारोग असुन फार प्राचीन काळापासून आस्तित्वात आहे. पूर्वी या रोगाला कोणताही उपचार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वाळीत टाकणे, रोग्यांना विद्रुपता येणे असे प्रकार समाजामध्ये सर्रास होत असत.

 सुरुवातीला एकच Dapsone नावाचे औषध आता आधुनिक शास्त्राच्या प्रगतीमुळे बहुविध औषधोपचार (MDT) पद्धतीचा वापर केल्यामुळे कुष्ठरोग बरा होतो. लवकर निदान व त्वरीत उपचार या रुग्ण प्राथमिक स्तरावर विनाविकृती बरे होऊ लागले, या सर्वासाठी आरोग्य कार्यक्रमातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्न महात्वपूर्ण आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण क्रियाशिल रुग्ण 253 असून जिल्ह्याचे दर महा हजारी प्रमाण (Prevalence Rate)0.59 इतका आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व स्थानिक उपलब्धता लक्षात घेऊन जिल्हा धोरणात्मक आराखडा (District Straegic Plan) तयार केलेला असुन नोव्हेंबर 2023 पासून कुष्ठरोगाची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये 2023-24, खुलताबाद व फुलंब्री, सन 2024-25 वैजापूर व गंगापूर, सन 2025-26, छत्रपती संभाजीनगर, पैठण व सिल्लोड सन 2026-27 कन्नड व सोयगाव या तालुक्यात कुष्ठरोगाचे दुरिकरण करावयाचे आहे.

आज देशामध्ये कुष्ठरोग झपाट्याने कमी होऊ लागला आहे. केंद्रशासनाने शाश्वत विकास ध्येय अंतर्गत 2023 पर्यंत शुन्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना देशात राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहेत. प्रथम जिल्हा नंतर तालुका व त्यानंतर गाव अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शुन्य कुष्ठरोग संसर्ग अभियान सर्व स्तरावरुन पूर्ण ताकदनिशी राबविण्यात येणार आहे.

 छत्रपती संभाजीनगर जिल्हा शुन्य कुष्ठरोग संसर्ग बनविण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणानी व जनतेने या कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे.

जिल्हा धोरणात्मक आराखडा (District Straegic Plan) चे विमोचन कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायक संचालक डॉ.शिवकुमार हलकुडे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, मनापा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वैद्यकीय पर्यवेक्षक ए.एम.खेडकर, डी.एस.परभणे, विष्णू घुगे व सांख्यिकी सहायक बी.एस.केंद्रे यांनी परिश्रम घेतेले.

00000

Comments