विधानसभा मतदारसंघस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका):- आगामी निवडणूकीसाठी निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे विधानसभा मतदार संघ स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. या प्रशिक्षणात १०० तालुकास्तरीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्हा
नियोजन समिती सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र
कटके यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, फुलंब्री
तहसिलदार कृष्णा कांगुळे, उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतिफ पठाण, तहसिलदार सिल्लोड रमेश जसवंत, सोयगाव तहसिलदार
मोहन हरणे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर
रोडगे, तहसिलदार श्रीमती प्रगती चोंदेकर, अपर तहसिलदार विजय चव्हाण, खुलताबाद
तहसिलदार स्वरुप कंकाळ,तहसिलदार तेजस्विनी जाधव, प्राचार्य आयटीआय पी.एस. म्हस्के यांनी सहभागी प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण
दिले. नामनिर्देशन , छाननी, माघारी प्रक्रिया, जिल्हा निवडणूक आराखडा, आचारसंहिता
पालन, स्वीप, मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र
इ. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
०००००
Comments
Post a Comment