अनुसूचित जाती, इमाव, सफाई कर्मचाऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी पोर्टल

 छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):-भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ या तीन राष्ट्रीय महामंडळांतर्फे  सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचाऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी सुरज (SU-RAJ) हे राष्ट्रीय पोर्टल अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृहात बुधवारी (दि.१३) पार पडला. सेफ्टी टॅंक कामगारांसाठी आयुष्मान हेल्थकार्डचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे सहा. आयुक्त पांडुरंग वाबळे, मनपा उपायुक्त जाधव. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे शेख, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे पवार, मनपा आरोग्य अधिकारी  आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाची  माहिती देण्यात आली.  जिल्हा व्यवस्थापक संगिता पराते यांनी ही माहिती दिली.  महिला स्मृद्धी, लघु ऋण वित्त योजनांचे मंजूरीपत्रही यावेळी लाभार्थ्यांना देण्यात आले,असे संगिता पराते जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, लिडकॉम यांनी कळविले आहे.

Comments