चौका येथे सिकलसेल आरोग्य तपासणी शिबिर

 




छत्रपती संभाजीनगर दि.१९(जिमाका)- जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती दिवसाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र चौका येथे सिकलसेल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर हे होते. डॉ.अभय धानोरकर यांनी उपस्थित नागरिकांना सिकलसेल आजार म्हणजे काय, आजाराची लक्षणे, तपासणी, सिकलसेल रुग्णांसाठी शासकीय योजना, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे, डॉ.ऋषी भुमकर, जिल्हा सिकलसेल कार्यक्रम समन्वयक भीमराव इंगळे, तालुका सिकलसेल सहाय्यक विकास काळे, समुदाय आरोग्य अधिकारी व आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments