विधानसभा निवडणूक २०२४ आचारसंहिता उल्लंघन होत असल्यास तक्रार करा
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना आचारसंहिता उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी निसंकोच तक्रार करावी, असे आवाहन आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या बाबत माहिती द्यावी. त्यासाठी खालील सुविधांचा वापर करता येईल.
टोल फ्री क्रमांक १९५०
दुरध्वनी क्रमांक-०२४०-२९९१८५८
मोबाईल ॲप- c VIGIL APP
इ-मेल- mccaurangabad2024@gmail.com
तरी नागरिकांनी आचारसंहिता भंगाबाबत जसे विनापरवानगी निवडणूक विषयक जाहिरात, प्रचार, पैशांचा अनधिकृत
वापर, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत
माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाते.
०००००
Comments
Post a Comment