विशेष खर्च निरीक्षक बालकृष्णन यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ करीता महाराष्ट्रासाठी नियुक्त विशेष खर्च निरीक्षक महाराष्ट्र राज्य बी.आर. बालकृष्णन यांनी आज जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्ह्यासाठी नियुक्त निरीक्षक(खर्च) कोटापट्टी वाम्शी क्रिष्णा व सोभान सुत्रधार उपस्थित होते.
बैठकीत बी.आर. बलकृष्णन यांनी निर्देश दिले की, मतदानाच्या दिवसा आधी तीन दिवसांत आर्थिक व्यवहारांवर
लक्ष ठेवावे. त्यासाठी विविध पातळ्यांवर निरीक्षण ठेवावे. स्थिर पथकांची ठिकाणे बदलत
रहावी. जेणेकरुन अशाप्रकारे अवैध वाहतुक करणारे पाहणी स्थळे लक्षात घेऊन पर्यायी मार्ग
अवलंबण्याची शक्यता गृहीत धरुन आपले ठिकाणे बदलत रहावे. शेवटच्या ७२ तासांत गस्त वाढवा.
भरारी पथकांसोबत राज्य राखीव दलाचे जवान देण्यात यावे, या तीन दिवसांत राज्य उत्पादन
शुल्क, फिरती पथके इ. नी गस्त वाढवावी. अशा सुचना देण्यात आल्या. यासोबत संलग्न असलेल्या
जालना, बुलडाणा, बीड या जिल्ह्यांचाही आढावा घेतला.
Comments
Post a Comment