उष्णतेशी लढाःगुरुवारी (दि.१७) कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका):- वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य, नागरी समस्यांसंदर्भात सर्व संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची गुरुवार दि.१७ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी १० ते दुपारी साडे १२ या वेळात ही कार्यशाळा होणार आहे. उपस्थितीचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment