मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांचे आगमन व स्वागत

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी ११ वा. ५० मि.च्या सुमारास विमानाने आगमन झाले. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा हे ही त्यांच्या समवेत होते.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचे स्वागत केले. प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.

००००००

Comments