छत्रपती संभाजीनगर ,दि.21 (जिमाका)- आजचा
दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिवसाचा उद्देश म्हणजे
संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सगळीकडे पसरावा असा आहे.
त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस शपथ घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी विनोद
खिरोळकर, तहसिलदार रेवणनाथ ताठे, नायब तहसिलदार संभाजी थोटे व जिल्हाधिकारी कार्यालयातील
कर्मचारी यांनी शपथ घेतली.
00000




Comments
Post a Comment