हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.17 (जिमाका) – हवामान आधारीत फळपीक विमा योजना जिल्ह्यात युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्याऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकाचा विमाहप्ता राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, ग्रामीण बँक, आपले सरकार ई-सेवा केंद्राद्वारे भरावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होणे बाबत ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते आहे त्या बँकेस योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जेणे करुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी सहभागी न होण्याबाबत बँकाना कळवणार नाही असे शेतकरी योजनेत सहभागी आहे असे समजण्यात येऊन कर्ज खात्यातून विमा वजा करण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीकृत (Registerd) भाडे करार पिकविमा संकेतस्थळावर अपलोड करावा. जिल्ह्यासाठी कमीत कमी उत्पादन क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) ही मर्यादा राहील व सर्व पिके व दोन्ही हंगाम मिळून जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही 04 हेक्टर राहील.
आवश्यक कागदपत्रेः-
आधार
कार्ड, जमिनीचा 7/12, बँक पासबूक, ॲग्री स्टॅक ओळखपत्र क्र.,पिकाचे वय उत्पादनक्षम
असणे बंधनकारक, जिओ टँग केलेले फळपिकाचे छायाचित्र, भाडेतत्वावर शेती असल्यास
नोंदणीकृत भाडेकरार व योजनेच्या निकषानूसार ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
पीक निहाय (मृग बहार) समाविष्ट पिके, विमा
संरक्षित रक्कम, फळपीक वय, शेतकरी विमा हफ्ता, अंतिम तारीख, समाविष्ट धोके व
कालावधी सन 2025 याप्रमाणे-
मोसंबी-एक
लक्ष रुपये, शेतकरी हप्ता 5 हजार रुपये, उत्पादनक्षम वय 3वर्षे, विमा भरण्याची
अंतिम तारीख दि.30 जून 2025.धोके- कमी पाऊस कालावधी 1 जुलै ते 31 जुलै, पावसाचा
खंड 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
डाळींब- 1
लक्ष 60 हजार रुपये, शेतकरी हप्ता 8 हजार रुपये, उत्पादनक्षम वय वर्षे 2, विमा
भरण्याची अंतिम तारीख दि.14 जुलै 2025. धोके- पावासाचा खंड दि. 15 जुलै ते 15
ऑक्टोंबर, जास्त पाऊस दि.16 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर.
चिकू- 70
हजार रुपये, शेतकरी हप्ता 3500 रुपये, उत्पादनक्षम वय वर्षे 5 , विमा भरण्याची
अंतिम तारीख 30 जून 2025,धोके-जादा आद्रता व जास्त पाऊस दि.1 जुलै ते 30 सप्टेंबर.
सीताफळ-70
हजार रुपये, शेतकरी हप्ता 3500 रुपये, उत्पादनक्षम वय वर्षे 3, विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025, धोके-पावसाचा
खंड 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, जास्त पाऊस 1 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर.
पेरु- 70
हजार रुपये, शेतकरी हप्ता 3500 रुपये, उत्पादनक्षम वय वर्षे 3, विमा भरण्याची
अंतिम तारीख दि.14 जून 2025, धोके- कमी पाऊस दि.15 जून ते 14 जुलै, पावासाचा खंड व
जास्त तापमान दि.15 जुलै ते 15 ऑगस्ट
लिंबू- 80
हजार रुपये, शेतकरी हप्ता 4 हजार रुपये, उप्तादनक्षम वय वर्षे 4, विमा भरण्याची
अंतिम तारीख दि.14 जून 2025, धोके- कमी पाऊस दि.15 जून ते 15 जूलै, पावसाचा खंड
दि.16 जुलै ते 15 ऑगस्ट
अधिक
माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800224030, 18002004030
राजेश
चटर्जी युनिवर्सल सोम्पो मो. 8976887550 email ID rajesh.chatterjee@
तरी
शेतकऱ्यांनी आपल्या फळपिक प्रकारानुसार दिलेल्या मुदतीत विमा योजनेत सहभागी
व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment