वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र
तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर क्र.२ येथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान वीर बाबुराव
शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त (गुरुवार दि.१२) अभिवादन करण्यात आले.सहआयुक्त सुरेश वानखेडे, उपसंचालक गणेश
इवनाते व वरीष्ठ संशोधन अधिकारी, सुरेश रामटेके तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांचा कार्याचा गौरव करत आदिवासी समाजाजासाठी त्यांनी
दिलेल्या संघर्षमय योगदानाची आठवण करुन दिली.
00000
Comments
Post a Comment