दुधभेसळ प्रतिबंधक कारवाई; 11 नमुने तपासणी
औरंगाबाद, दि.
24 (जिमाका) – दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय
दुध भेसळ प्रतिबंधक समितीने दुधभेसळ विरोधी कारवाईस सुरुवात केली असून मंगळवारी व बुधवारी
केलेल्या कारवाईत 11 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हास्तरीय दुध
भेसळ प्रतिबंधक समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी श्रीमती मनिषा
हराळ- मोरे यांनी दिली आहे.
दुधात होणाऱ्या भेसळीवर पायबंद घालण्यासाठी सचिव (पदुम) यांनी
सुचित केल्यानुसार जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे
यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे
सहायक आयुक्त (अन्न) डी.व्ही.पाटील, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्रीमती मनीषा हराळ-मोरे,
अन्न सुरक्षा अधिकारी सौ.रोडे, श्रीमती जाधवर, विस्तार अधिकारी आदमाने, गलधर, पाटील, जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ.इंगळे,
उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र दराडे, पोलीस नाईक गायकवाड, निकम यांच्या पथकाने मंगळवारी
(दि.22) 11 दुध नमुन्यांची तपासणी केली.
या पथकाने शहरातील जळगाव रोडवरील, फुलंब्री - सिल्लोड तालुक्यातील
खामगाव फाटा, घाटनांद्रा, पाथ्री परिसरातील खासगी दुध संकलन केंद्र, खासगी दुध शितकरण
केंद्र, व दुध प्रक्रिया प्रकल्पांवर येथे भेट देऊन पाहणी केली. या मोहिमेत दुध पुरवठादारांमार्फत
संकलित होणाऱ्या श्रीनाथ दुध संकलन केंद्र, जोगेश्वरी दुध संकलन केंद्र, व कामधेनु
दुध प्रक्रिया प्रकल्प येथील 5 दुध पुरवठादारांचे व उर्वरित संकलन केंद्र व प्रकल्पाचे 6 असे एकूण
11 दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दुधाचे नमुने घेऊन दुग्ध विभागाने लॅक्टोमिटर
व ब्युट्रोमिटर द्वारे गुणप्रत तपासणी केली. त्यामध्ये, श्रीनाथ दुध संकलन केंद्र,खामगाव
व जोगेश्वरी दुध संकलन केंद्र, घाटनांद्रा ता. सिल्लोड येथील संकलित दुधाचे फॅट व एस.एन.एफ
ची तपासणीसाठी वापरात असलेले इकोमिल्क मशीनवर दुध पुरवठादारास दर्शविण्यात येणारी दुधाची
गुणप्रत कमी दर्शवत असल्याचे आढळुन आले. यासंदर्भात इको मशीन जप्तीची करण्याबाबत नोटीस
देण्यात आली.
जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समिती अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी
अरविंद लोखंडे, यांनी उपस्थित असणाऱ्या दुध पुरवठादारांशी साधून गुणप्रतीनुसार पुरवठा
करण्याच्या सुचना दिल्या.
वैधमापन निरीक्षक यांनी एकूण 4 वजनकाटे जप्त करण्याची कार्यवाही
केली. तसेच, अन्न औषध प्रशासन विभागामार्फत श्रीनाथ दुध संकलन केंद्र, खामगाव फाटा,
ता.फुलंब्री, जोगेश्वरी शितकरण केंद्र, घाटनांद्रा व कामधेनु ॲग्रो प्रोसेसर्स पार्थी
ता.फुलंब्री दुधाचे नमुने पंचनामे करुन एन.ए.बी.एल.लॅब कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
बुधवारी (दि.23) टोणगांव ता.जि. औरंगाबाद येथील दोन दुध संस्थांची
संकलन करते वेळी तपासणी करुन कमी प्रतीचे 58 लिटर दुध परत करण्यात आले. यापुढेही औरंगाबाद
शहराअंतर्गत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये दुध भेसळ प्रतिबंधक समिती मार्फत दुध
व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, खासगी व सहकारी दुध प्रक्रिया प्रकल्पधारक, सहकारी व
खासगी दुध संकलन केंद्र व संस्था इ. ठिकाणी दुध भेसळ तपासणीसाठी मोहिम राबविण्यात येत
आहे.
जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुध संकलन व शितकरण केंद्र,
खासगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व दुध प्रक्रिया प्रकल्प यांनी उच्च गुणप्रतिचे
भेसळ विरहीत दुध स्विकृती व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसह विक्री करण्याबाबत तसेच त्याकरीता
वापरात येणारे वजन काटे व दुध गुणप्रत तपासणी संयत्रे, नियमित प्रमाणित करुन अद्यावत
ठेवावे. त्याचप्रमाणे दुग्धजन्यपदार्थ व पशुखाद्य इ.बाबत उत्पादन दिनांक व मुदतपूर्व
वापराबाबत माहिती छापण्याविषयी सर्व विक्रेत्यांना
जिल्हा स्तरीय समितीने आवाहन केले आहे.
00000
.jpeg)



Comments
Post a Comment