शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्पनिदेशकांच्या नेमणूकांसाठी दि.5 रोजी मुलाखती
औरंगाबाद, दि. 23 (जिमाका)-येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड येथेशिल्प निदेशकांची तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर थेअरी व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची असून त्यासाठी दि.5 सप्टेंबर रोजी मुलाखती होणार आहेत,असे उपसंचालक औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांनी कळविले आहे.
टूल ॲण्ड डाय मेकर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक,
वेल्डर, टर्नर, शीट मेटल वर्कर, सुतारकाम,
गवंडी, मेकॅनिक मशिन टूल मेन्टेनन्स, यंत्रकारागिर,
यांत्रिक मोटार गाडी, तारतंत्री, विजतंत्री,
आरेखक स्थापत्य, सर्व्हेक्षक या व्यवसायांसाठी शिल्पनिदेशक नेमणूक करावयाची असून त्यासाठी
संबंधित शाखेतील पदवी/ पदविका/ आयटीआय व सीआयटीएस किंवा सीटीआय उत्तीर्ण या शैक्षणिक पात्रतेसह पदवीसाठी एक वर्ष अनुभव, पदविकेसाठी दोन वर्ष अनुभव
व आयटीआयसाठी तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक
असेल.
संबंधित व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधित व्यवसायाच्या शाखेप्रमाणे असेल.
एकापेक्षा अधिक पदांसाठी पात्र असणाऱ्यांचा एकाच व्यवसायासाठीचा अर्ज ग्राह्य धरण्यात
येईल. थेएरीसाठी 250 रुपये प्रति तास व प्रात्यक्षिकासाठी
125 रुपये प्रतितास मानधन अनुज्ञेय असेल. पात्र व यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी
दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस हजर रहावे,असे उपसंचालक औद्योगिक प्रशिक्षण संस्था
औरंगाबाद यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment