सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत सरळ मुलाखतीद्वारे रोजंदारी स्वरुपातील पदभरती
औरंगाबाद, दि. 23 (जिमाका)-येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत सरळ मुलाखतींद्वारे रोजंदारी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात पदभरती केली जाणार आहे,असे सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी कळविले आहे. या पदभरतीत भांडारपाल (एक पद) व सहाय्यक शारिरीक प्रशिक्षण निदेशक (एक पद) या दोन पदांसाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यासाठी माजी सैनिक ही पात्रता असून संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे,असेही कळविण्यात आले आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक उमेदवारांनी कागदपत्रांसह मंगळवार दि.29 रोजी सकाळी 11 वाजता सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, एन-12 सेक्टर, सिडको, औरंगाबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्रभारी संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 0240-2991370.
Comments
Post a Comment