अप्रमाणित वजन काटे वापरावर बंदी

 


औरंगाबाद, दि. 21 (जिमाका) – वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा व्यवहारामध्ये उपयोग करणे अवैध असून असे वजन काटे वापरु नये, असे आवाहन उपनियंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी केले आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व तोलन उपकरणे यांच्या अचुकतेबाबतची पडताळणी केलेली वजने व मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्त्यांनी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. वजने व मापे याचा वैध विक्री परवाना असलेल्या परवानाधारकाने वजने, मापे व तोलन उपकरणे यांची विक्री करणे आवश्यक आहे. असे असताना देखील काही व्यापारी विविध देशातुन आयात केलेले (चीनी बनावटीचे) किंवा इतर राज्यातुन आणलेले इलेक्ट्रॉनिक्स काटे अनधिकृत व्यक्ती त्याचे स्टिकर वजन काट्यांना लावून अनधिकृतपणे विक्री करत आहेत, असे या कार्यालयाच्या निर्दशनास आले आहे.

अप्रमाणित इलेक्टानिक्स काट्याची विक्री अथवा वापर केल्याचे आढळून आल्यास वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्यांअंतर्गतच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तरी  अप्रमाणित वजन काट्याची विक्री अथवा त्यांचा व्यवहारामध्ये उपयोग करु नये, असे आवाहन उपनियंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा