महात्मा गांधी मिशन येथे नवमतदार जागृती
औरंगाबाद, दि. 21
(जिमाका) –महात्मा गांधी मिशन अंतर्गत
एमजीएम महाविद्यालय तथा युनिव्हर्सिटी येथे नव मतदार जागृती कार्यक्रम व मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत
1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अध्यक्षस्थानी कुलगुरू महात्मा गांधी मिशन डॉ. विलास
सपकाळ तर प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व
विधानसभा मतदारसंघ अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे,कुलसचिव आशिष गाडेकर तसेच
109 पूर्व निवडणूक विभागाअंतर्गत येणारे पर्यवेक्षक, बीएलओ, नायब तहसीलदार उपस्थित
होते.
ऑनलाईन वोटर हेल्प ॲप द्वारे मतदार नोंदणीचे प्रात्यक्षिक राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना दाखविले. कुलगुरू
सपकाळ यांनी व्होटर ॲप चे महत्त्व व मतदार नोंदणी आवश्यक असल्याचे सांगितले. अप्पासाहेब
शिंदे यांनी सांगितले की, लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी मतदार
होणे आवश्यक आहे. उपस्थित सर्व नव मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ऑफलाईन तसेच
ऑनलाईन मतदार नोंदणी केली. 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सद्यस्थितीत
मतदार नोंदणी ऑनलाइन तसेच ऑफलाईन सुरु आहे. समन्वयक देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000
Comments
Post a Comment