बालशक्ती व बालकल्याण पुरस्कार; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 औरंगाबाद, दि. 23 (जिमाका)- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांसाठी www.awards.gov.in ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुरस्कारांबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी दिनांक 31 ऑगष्ट पर्यंत मुदत आहे असे उपआयुक्त (बालविकास) यांनी कळविले आहे.

बालशक्ती पुरस्कार-

निकषः ज्या बालकांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षपर्यंत) शिक्षण , कला सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध , सामाजिक कार्य, व शौर्य अशा विविध क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली असेल, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कारः- हे पुरस्कार दोन गटात दिले जातात.

1)     वैयक्तिक पुरस्कार : मुलांच्या विकास, संरक्षण व बालकल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे  काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

2)     संस्था स्तरावर: बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात  किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

इच्छुक व पात्र व्यक्ती, संस्थांनी या पुरस्कारांसाठी www.awards.gov.in ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.अर्ज करण्यासाठी दिनांक 31 ऑगष्ट पर्यंत मुदत आहे असे उपआयुक्त (बालविकास) यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा