वजने मापे उपयोगकर्ता आस्थापनांचे सर्वेक्षण
औरंगाबाद, दि.
21 (जिमाका) – महाराष्ट्र राज्याच्या अन्न
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त वैध मापन शास्त्र यंत्रणेने त्यांचे
परवानाधारक दुरस्तकांच्या सहकार्याने वजने मापे उपयोगकर्ता व्यापारी वर्गाचे सर्वेक्षण
करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तरी व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या दुरस्ती
परवानाधारकास सहकार्य करावे,असे आवाहन उपनयिंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी
केले आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील कार्यरत सर्व परवानाधारक दुरुस्तकांना
वजने व मापे व तोलन उपकरणे यांचा वापर करणाऱ्या आस्थापकांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यासाठी
प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच या जिल्ह्यातील संबंधित दुरस्ती परवाना धारकास वजने
मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्ता आस्थापनाचे सर्वेक्षणसाठी उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र,
जिल्हा कार्यालयाने प्राधिकर पत्र दिले आहे. त्यामुळे वजनमापे उपयोगकर्ता आस्थपनेमधील
व्यापाऱ्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या दुरस्ती परवानाधारकास सहकार्य करावे,असे
आवाहन उपनयिंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी.दराडे यांनी केले आहे. काही शंका असल्यास
व्यापाऱ्यांनी 0240- 2483818 या कार्यालयीन दरध्वनीक्रमांकावर संपर्क साधावा,असेही
कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment